मी जेव्हा मरेन तेव्हा माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब आणि थेंब देशाला बळकट करेल

इंदिरा गांधी यांची हत्येच्या दिवशी काय घडलं होतं??????

पंतप्रधानांच्या सफदरजंग मार्गावरील निवासस्थानी शाळेत जाण्यापूर्वी सकाळी राहुल आणि प्रियांकाने आपल्या आजीचे चुंबन घेतले, तेव्हा दोघांना किंचितही अशी कल्पना की आपल्या प्रिय आजीबरोबरची ही आपली अखेरची भेट असेल. हि भेट शेवटचीच ठरली आणि सेंट कोलंबिया व जीझस अँड मेरी कॉन्व्हेंट शाळेतलाही त्यांचा आपला शेवटचा दिवस होता. 

इंदिराजींचा जणू मनोमन साक्षात मृत्युसोबतच संवाद सुरू असावा असं त्यांच वागणं होतं. आजीने राहुल आणि प्रियांकाला रोजच्या दिवसांपेक्षा आज आपल्याला अधिक घट्ट मिठी मारली, हे मात्र दोघांनाही  जाणवले होते.

जवळच्या सहकाऱ्यासोबत बोलतांना इंदिराजी म्हणायच्या. “मला आजकाल अत्यंत अस्वस्थ करणारी वाईट स्वप्ने आणि प्रसन्नतेची जाणीव करून देणारी शांत स्वप्ने अशी दोन्ही प्रकारची स्वप्ने मला पडत असतात”. 

‘त्या’ दिवशी सकाळी राहुलला आलिंगन देतांना इंदिराजी त्याच्या कानात कुजबुजल्या काही अनपेक्षित अन् विपरीत घडलेच, तर घरातल्या परिस्थितीच्या नियंत्रणाची सूत्रे तू हाती घे. 

राहुल गांधी तेंव्हा जेमतेम चौदा वर्षांचे होते. आपल्या संभाव्य मृत्युविषयी इंदिराजी काही पहिल्यांदा बोलल्या नव्हत्या. काही दिवस अगोदरच राहुलला त्या म्हणाल्या, माझे आयुष्य जगून झाले आहे. माझे अंतिम संस्कार व त्याची व्यवस्था कशी असावी, याविषयी माझ्या काही कल्पना आहेत. 

इतकंच नव्हे राहुलसाठी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी म्हटले, 

“समजा हिंसक पद्धतीने चुकून माझा मृत्यु ओढवलाच तर हिंसा माझ्या मृत्युत नव्हे तर माझे प्राण घेणाऱ्यांच्या विचारांमध्ये असेल. कोणताही द्वेष इतका गडद नक्कीच असू शकत नाही, की ज्याची छाया देश आणि देशबांधवांविषयी मला वाटणाऱ्या प्रेमावर अतिक्रमण करू शकेल. कोणत्याही शक्तीत इतका दम खचितच नाही की भारताला प्रगतीपथावर नेण्याचा माझा दृढसंकल्प आणि त्या दिशेने मी चालवलेल्या प्रयत्नांना तो मुरड घालू शकेल”.

इतकंच नाही तर आदल्या दिवशी केलेल्या भाषणात त्या म्हणाल्या,

“मी आज इथं आहे, पण उद्या नसेनही. मला याची काळजी नाही. माझं जीवन मोठं राहिलं आहे आणि मला याचा अभिमान आहे की मी माझं आयुष्य तुम्हा लोकांच्या सेवेत व्यतीत केलं आहे. मी माझ्या शेवटच्या श्वासपर्यंत तुमची सेवा करत राहीन. मी जेव्हा मरेन तेव्हा माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब आणि थेंब भारताला बळकट करण्यासाठी खर्ची पडेल.”

 

त्या दिवशी सकाळी…..नातवंडांना निरोप देऊन इंदिराजींना थोडा नाश्ता केला आणि १ अकबर रोडवर निवासस्थानाला जोडूनच असलेल्या कार्यालयाच्या दिशेने चालू लागल्या. आयरिश टीव्ही नेटवर्कसाठी विख्यात कलाकार आणि चित्रपट निर्माता पीटर उस्तिनोव्ह याला इंदिराजींची मुलाखत रेकॉर्ड करायची होती. आपल्या युनिटसह तो त्यांची वाट पहात थांबला होता.

मुलाखतीची वेळ ठीक ९ वाजता होती. उस्तिनोव्हने घड्याळाकडे पाहिले. वेळेबाबत अत्यंत वक्तशीर असणाऱ्या पंतप्रधान इंदिराजींना आज चक्क १२ मिनिटे उशीर का झाला, याचे त्याला आश्चर्य वाटले.

नारिंगी रंगाची रूंद काळ्या बॉर्डरची कॉटनची साडी परिधान करून, पिकेट गेटने इंदिराजी घराबाहेर पडल्या. डोक्यावर फेटा घातलेल्या सरदार गार्डने स्मितहास्य करीत त्यांना सलामी दिली. स्मितहास्यानेच त्या देखील त्याला प्रतिसाद देत असतांना, अचानक आपल्या बंदुकीतून इंदिराजींवर त्याने बुलेटसचा वर्षाव सुरू केला. इंदिराजींबरोबर छत्री घेऊन चालणाऱ्या अटेंडंट नारायणने भेदरलेल्या अवस्थेत हातातली छत्री फेकली आणि मदतीसाठी जोरजोरात किंचाळू लागला पण तोपर्यंत फारच उशीर झाला होता. 

६६ वर्षांच्या इंदिराजींवर ३१ बुलेटस झाडण्यात आल्या होत्या. त्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्याच्यावर होती त्यांनीच हे घृणास्पद कृत्य केले होते. इंडो तिबेटन बॉर्डर फोर्सच्या गार्डसनी आपल्या बळाचा वापर सुरू करण्याआधी, अवघ्या काही सेकंदात बेअंतचा जोडीदार सतवंतही त्याच्या मदतीला धावला. त्यानेही आपल्या बंदुकीतून पूर्णत: घायाळ अवस्थेतल्या इंदिराजींवर पुन्हा गोळ्या झाडल्या.

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान रक्ताच्याया थारोळ्यात पडल्या होत्या. एका शक्तिशाली युगाचा अंत झाला होता..

हे ही वाच भिडू:

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.