पंतप्रधानांनी ताराबाईंच्या अंगणवाड्या पाहिल्या आणि देशभरात हा उपक्रम चालू केला

एखादी योजना, उपक्रम कित्येक वर्षांपासून अविरतपणे चालू असतो. योजनेअंतर्गत प्रकल्पांतर्गत कितीतरी गोष्टी साध्य होत असतात. अशीच एक योजना म्हणजे एकात्मिक बालविकास योजना. म्हणजेच अंगणवाड्या! तुम्ही आम्ही प्रत्येक जण अंगणवाडीतल्या तो पोषक आहार खाऊन मोठे झालोय.

अंगणवाडी म्हणजे मुलांचे दुसरं घर. इथे सकाळचा नाष्टा गाणी गोष्टी गप्पा स्वच्छता दुपारचा आहार खाऊ असा दिनक्रम असतो.

मात्र या योजनेचा मूळ इतिहास काय आहे? या प्रकल्पाची निर्माती कोण आहे हे आपण जाणतो त्या म्हणजे ताराबाई मोडक !

लाखो अंगणवाड्यामार्फत माता आणि बालसंगोपनाची जबाबदारी पेलणारा देशातील सर्वात मोठा उपक्रम अशी ओळख लाभलेली एकात्मिक बाल विकास योजना. देशाच्या उभारणीत आणि वाटचालीमध्ये योगदान महाराष्ट्राने हे तितकंच दिलं त्यापैकी हे एक म्हणजे हे योगदान.

त्याचं श्रेय जातं शिक्षण तज्ञ पद्मभूषण ताराबाई मोडक यांना.

ताराबाईंनी १९३६ मध्ये पूर्वप्राथमिक शिक्षणाचे दार उघडले. ताराबाईने हे पाऊल उचलले मात्र त्यांच्यावर प्रभाव होता तो म्हणजे गांधीजींचा. कारण गांधीजींनी ताराबाईंचं लक्ष ग्रामीण आणि आदिवासी भागाच्या विकासाकडे वेधलं आणि त्यामध्ये ताराबाई खऱ्या उतरल्या.

भारताच्या शिक्षणपद्धतीत या याधी ‘बालवाडी’ ही संकल्पनाच नव्हती, यावर विश्वासच बसत नाही.
ताराबाईंच्या याच कार्यामुळे हि संकल्पना अस्तित्वात आली. लहान वयात आधी वडील आणि मग आईचा मृत्यू बघितलेल्या ताराबाईंनी समोर आलेल्या सर्व अडचणींवर मात करून आपले शिक्षण पूर्ण केले.  शिक्षण पूर्ण करून लग्नानंतर त्या अमरावती येथे स्थायिक झाल्या. श्री. मोडकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतल्यामुळे अमरावती सोडायला लागल्यावर, आपल्या एका वर्षाच्या मुलीला घेऊन त्या थेट गुजरात गाठलं. तिथे आपली प्राचार्यपदाची नोकरी केली.  हे करता करताच त्यांना गिजुभाई बधेका यांच्या शैक्षणिक प्रयोगांबद्दल माहिती मिळाली.
मग त्यांनी नोकरी सोडली आणि त्या गिजुभाईंच्या सहायक म्हणून राजकोटहून भावनगरला रहायला गेल्या.
गिजुभाई त्या वेळी बालशिक्षणावर काम करत होते. १९४५ मध्ये त्यांनी बोर्डी आणि नंतर कोसबाड होऊन काम सुरू केलं.  भारतात तेव्हा मुलांचे शालेय शिक्षण सहाव्या वर्षापासून सुरू व्हायचे. चौथ्या वर्षीच शालेय शिक्षण सुरू व्हावे, असा गिजुभाई आणि ताराबाईंचा आग्रह होता. पण एवढा मोठा बदल घडवून आणणे सोपे तर नक्कीच नव्हते, मग त्यांनी चार ते सहा या वयोगटासाठी आवश्यक तो अभ्यासक्रम किंवा दिनक्रम जास्तीत जास्त शास्त्रोक्त पद्धतीने लोकांसमोर मांडायचे ठरवले.
नऊ वर्षे भावनगरला राहून वेगवेगळे प्रयोग आणि या शिक्षणपद्धतीचा विविध अंगांनी अभ्यास करून आवश्यक ते ज्ञान घेऊन ताराबाई मुंबईला आल्या आणि १९३६ साली मुंबईत दादरला ‘शिशुविहार’ सुरु केले.  शहरांपाठोपाठ हेच वर्ग, हेच काम खेडेगावात पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यांनी त्यांचे हे बालशिक्षणाचे काम अगदी आदिवासी पाड्यांपर्यंत, आवश्यक ते बदल करत, त्या त्या आर्थिक परिस्थितीशी जुळवून घेत यशस्वीपणे पोहोचवले.

आदिवासी मुलं काय ओळख नसलेल्या शाळांमध्ये थेट येणार नाहीत. म्हणून ती मुलं जिथे जिथे जातील, जिथे खेळतील, शेळ्या बकऱ्या चरायला घेऊन जातील तिथे किंवा त्यांच्या घराच्या अंगणात ताराबाई जायला लागल्या. आणि त्यातूनच अंगणवाडी, कुरण शाळा या नवीन कल्पना साकारल्या गेल्या.

त्याचे वैशिष्ट्य म्हणजे कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी वेळेत बालशिक्षण कसं सार्वत्रीक करायचं यावर हे ताराबाईंनी शोधलेले उत्तर होतं. अंगणवाडी ची सवय लागली तर मुलांना शालेय शिक्षणाचे महत्व कळेल, आवड निर्माण होईल. त्यासाठी अनुकूल वातावरण तयार करायचा असेल तर अंगणवाडी हा उत्तम पर्याय आहे हे त्यांनी जाणलं. त्या-त्या लहान वयाच्या मुलांची भूत यांचा आरोग्य व त्यांची स्वच्छता या सगळ्या समस्यांचा विचार त्यांनी आधी केला आणि मगच शिक्षणाचा विचार केला. या मुलांचा आरोग्य ही राखला जाईल चांगल्या सवयी ही लागतील आणि शिक्षणही मिळेल या अनुषंगाने त्यांनी ही कल्पना समोर आणली.

थोडक्यात या लेकरांची पोटाची भूक आणि बुद्धीची भूक दोन्ही भागवण्यासाठी अंगणवाडी हा उत्तम मार्ग होता.

पण त्यांना पुरवला जाणारं अन्न अन्न हे स्थानिक असा व पोषक असा व स्वच्छ असावा व त्याची क्वालिटी चांगली असावी हे त्यांनी वेळोवेळी समोर ठेवलं. सोबतच्या लेकरांची आरोग्य तपासणी वेळेवर आणि नियमित व्हावी हेदेखील ताराबाईने सुरू केलं.

१९७५ मध्ये ताराबाईंचा हाच उपक्रम पाहायला एकदा इंदिरा गांधी गेल्या होत्या तेव्हा त्यांना उपक्रम एवढा आवडला की त्यांनी तात्काळ ही योजना देशभरात राबवण्याचा निर्णय घेतला. म्हणजे ज्या अंगणवाडी आज आपण गावागावात पाहतो त्या अंगणवाड्या सुरू करण्यामागचा खरं श्रेय आहे ताराबाई मोडक यांचं.

यातली विशेष गोष्ट म्हणजे १९७५ मध्ये अंगणवाड्या सुरू करतानाच शिक्षण आणि आरोग्य म्हणजेच, बालकांचा बौद्धिक – भावनिक – मानसिक – शारीरिक विकास व्हावा हे उद्दिष्ट होतंच, पण हे सगळं करण्यासाठी ज्या अंगणवाडीसेविका असतात त्या त्याच गावातल्या असाव्या हा निकष फार महत्त्वाचा ठरला.

कारण जर त्या बालकांना सांभाळणाऱ्या अंगणवाडी सेविका गावातल्याच असतील तर बालकांना अंगणवाडी चे वातावरण देखील ओळखीचं आणि घरातलं वाटेल.

हळूहळू या योजनेला लोकमान्यता मिळू लागली. चाळीस सुरुवातीपासूनच तीन ते सहा वयोगटातल्या मुलांना पोषण आहार देणे आणि शिक्षणाची तोंडओळख करून देणा-या प्राथमिक कामांचा बराच मोठा पल्ला आपल्या अंगणवाडी ने गाठलाय. अंगणवाडीमध्ये मुलांची ऍडमिशन करायची असतील तर त्या मुलांच्या घरी जाऊन त्या पालकांना विश्‍वासात घेणे, त्यांना सरकारी योजनांची माहिती देणे, आरोग्य सेविकांच्या मदतीने लसीकरण करणे, आरोग्य तपासणी करणे व कुपोषण निर्मूलनाची निगडित माहिती सांगणारा आजारी व जिवाला धोका असणाऱ्या रोगांची माहिती देणे, स्तनदा मातांची काळजी घेणे, गरोदरपणातील सुश्रुषा याबद्दलची माहिती आणि त्याही पलीकडे जाऊन विचार भान जाणीवजागृती दृष्टिकोन अंगणवाडीसेविका देत असतात.

ग्रामीण भागामध्ये बऱ्याचदा पहिली मुलगी किंवा दुसरी मुलगी झाली तर त्या आई- मुलीला नाकारणाऱ्या कुटुंबांना त्यांचं वागणं दाखवून द्यायला कुणी धजावत नाही पण अंगणवाडीसेविका ते काम करतात.

तसेच नवीन जन्मणाऱ्या  मुलाला- मुलीला लसीकरण किती महत्त्वाचं आहे त्यांचं शरीर किती कमकुवत आहे हे हे समजावण्याचे काम अंगणवाडी अंगणवाडी सेविका करत असतात. गावात अंगणवाडी सेविकांच्या शब्दाला वजन असतं त्यामुळे त्याचे परिणामही सकारात्मक दिसतात.

अजून एका मोठ्या कामगिरी मध्ये अंगणवाडी चे योगदान म्हणजे कुपोषित बालकांसाठीच्या योजना अमलात आणणे.

जगभरातील एकूण कुपोषित बालकांना पैकी एकतृतीयांश मुलं भारतात आहेत. त्यातल्या त्यात ठाणे पालघर मेळघाट अमरावती नंदुरबार गोंदिया चंद्रपूर गडचिरोली हे जिल्हे उपोषणास संवेदनशील आहेत. या जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी सेविका विविध योजना राबवतात.

बालकांच्या पूर्व प्राथमिक शिक्षणाबरोबरच अंगणवाडी राज्याच्या प्रत्येक गावातील कुटुंब ही वयोगटानुसार स्त्रिया-पुरुष मुलंही तपशीलवार माहिती सरकारला देत असतात.

अगदी अलीकडे देखील कोरोना काळात गावातल्या नागरिकांची लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाय आहे त्यांनी काळजी का घ्यावी तपासणी गोवर लसीकरण या बाबतही अंगणवाडी सेविकांनी जनजागृती केली आहे आणि अद्यापही करत आहेत. आता शासनाच्या नवीन एक उपक्रम चाललाय तो म्हणजे कोरुना काळात आपले पालक गमावलेल्या अनाथ झालेल्या मुलांची माहिती घेण्यासाठीच सर्वेक्षण करण्याची जबाबदारी देखील याच अंगणवाडी सेविकांवर दिली आहे.

हे सर्व शक्य झालं ते थोर ताराबाई मोडक यांच्यामुळे !

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.