इंदिरा गांधी व नरेंद्र मोदींनी जमिनीत पुरलेल्या “कालपात्राचं” रहस्य काय आहे

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, पतंप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी जमिनीमध्ये कालपात्र पुरून ठेवलय. कालपात्र म्हणजे टाईम कॅप्सुल. या तिन्ही नेत्यांमध्ये असणारा एक समान धागा म्हणजे तिनही नेत्यांवर व्यक्तिंकेंद्रित राजकारण करत असल्याचा आरोप केला जायचा आणि जातो.

याशिवाय या तीन नेत्यांमध्ये असणारा समान धागा म्हणजे,

ऐतिहासिक कालपात्र. 

तारिख होती ७ जून २०१० ची. तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी या दिवशी गांधीनगर मध्ये तयार करण्यात येण्यात महात्मा मंदिराच्या पायाभरणी सोहळ्यात कालपात्र ठेवलं. या कालपात्राचं वजन ९० किलो होतं. तीन फुट लांबी आणि अडीच फूट रुंद असणाऱ्या या स्टिलच्या कालपत्रामध्ये गुजरातचा १ मे १९६० पासूनचा इतिहास लिहण्यात आला होता.

आत्ता प्रश्न पडला असेल हे कालपात्र किंवा टाईम कॅप्सुल काय असत. 

कालपात्र किंवा टाईम कॅप्सुल मध्ये त्या त्या कालखंडातील महत्वाच्या गोष्टी मांडण्यात येतात. लिखित स्वरुपात अशा गोष्टी मांडून त्या कालपात्रात ठेवल्या जातात व त्या जमिनीखाली पुरण्यात येतात. याचा उद्देश इतकाच की १००० हजार वर्षांनी जेव्हा हे कालपात्र उघडण्यात येईल तेव्हा आपला इतिहास भविष्यातील व्यक्तिंना समजून यावा.

नरेंद्र मोदी यांच्यावर २०१० साली मोठ्या प्रमाणात टिका करण्यात आली. कॉंग्रेसचं म्हणणं होतं की स्वत:ची प्रतिमा गौरवशाली करण्यासाठी मोदींनी या कालपात्रात आपल्या स्तुती करणारी माहिती टाकली आहे.

आपली प्रतिमा ऐतिहासिक करण्याच्या हेतूनेच त्यांनी हे कालपात्र जमिनीत पुरलं. 

Screenshot 2020 03 16 at 12.19.48 PM

कॉंग्रेसने अस पण सांगितलेलं की,

आम्ही सत्तेत आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुरलेलं कालपात्र वरती काढू. मात्र कॉंग्रेस काय सत्तेत आलं नाही व कालपात्र काय वरती निघालं नाही.

पण नरेंद्र मोदींवर कालपात्रासाठी टिका करायची असेल तर कॉंग्रेसची अडचण होते.

 

कारण कालपात्रचा पहिला प्रयोग श्रीमती इंदिरा गांधी यांनीच केला आहे. 

भारताला स्वातंत्र मिळून २५ वर्ष झाली होती. १९७३ साली इंदिरा गांधी सत्तेत होत्या. १९७२ च्या युद्धामुळे इंदिरा गांधींना आयर्न लेडी म्हणून ओळखलं जावू लागलं होतं. इंदिरा गांधी सार्वभौम बनल्या होत्या आणि याच काळात म्हणजे,

१५ ऑगस्ट १९७३ साली इंदिरा गांधींनी देखील, “कालपात्र” पुरलं.

Screenshot 2020 03 16 at 12.23.24 PM

इंदिरा गांधींनीच टाईम कॅप्सुलला कालपात्र अस नाव दिलं.  स्वतंत्र भारताच्या पहिल्या २५ वर्षाचा लेखाजोखा यात ठेवण्यात आला होता. सोबतच भारताचा प्राचीन इतिहास या मांडण्यात आला होता. याची जबाबदारी भारतीय इतिहास अनुसंधान परिषदकडे देण्यात आली होती.

मद्रास ख्रिश्चियन कॉलेजचे इतिहासकार प्रोफेसर एस. कृष्णास्वामी यांच्याकडे कालपात्रामध्ये ठेवण्याच्या गोष्टी तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली होती.  या कृष्णास्वामींनी जी माहिती तयार केली त्यावर मत घ्यावे म्हणून ही माहिती तामिळनाडूच्या तत्कालिन आयुक्त व प्रसिद्ध इतिहासकार टि बद्रीनाथ यांना पाठवली होती.  ही माहिती वाचल्यानंतर टि बद्रीनाथ यांनी थेट माध्यमांमधून इंदिरा गांधीवर टिका केली होती.

त्याचं म्हणणं होती की,

या कालपात्रातून इंदिरा गांधींनी आपली व आपल्या कुटूंबाचे कौतुक केलं आहे.

नंतरच्या काळात आणिबाणी लादली गेली.

आणिबाणीनंतर झालेल्या निवडणूकांच्या प्रचारावेळी जनता पार्टीने इंदिरा गांधीद्वारे पुरण्यात आलेले कालपात्र वरती काढण्यात येईल अस सांगितलं. जनता पार्टी सत्तेत आल्यानंतर त्यांनी हे कालपात्र वर काढलं. हे कालपात्र पुरण्यासाठी ८ हजार तर काढण्यासाठी ५८ हजार रुपये खर्च झाले.

त्यानंतर जनता पार्टीने या इंदिरा गांधीच्या माध्यमातून पुरलेल्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी समिती बसवली. त्यामध्ये असा निष्कर्ष निघाला की इंदिरा गांधींनी स्वत:ची आणि आपले वडिल पंडित जवाहरलाल नेहरूंची प्रतिमा मोठ्ठी करण्यासाठी कालपात्र पुरलं होतं.

मात्र या कालपात्रात काय होतं याची माहिती जनता पक्षाने सार्वजनिक केली नाही. त्यानंतर पत्रकार मधु किश्वर यांनी 2012 साली PMO ला माहितीच्या अधिकारात यामध्ये कोणत्या गोष्टी होत्या याची माहिती मागितली. तेव्हा PMO ने याबाबत काहीच माहिती नसल्याची नसल्यांच सांगितलं होतं.

असाच प्रयोग मायावतींनी देखील केला होता. त्यांनी देखील आपल्या कौतुकसोहळा या कालपात्रमध्ये ठेवून पुरल्याची माहिती देण्यात येत होती. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.