सातत्याने चर्चेत असणारी एल्गार परिषद नेमकी काय असते…?   

१ जानेवारी २०१८…

वर्षाचा पहिला दिवस, पण हा दिवस उगवला तो दंगलीची आग घेवून. दिवस संपतो तोच न्यूज चॅनेलवरून दंगलीच्या बातम्या येवू लागल्या. भिमा कोरेगाव येथे दंगल सुरू झाली. गाड्या पेटवल्या, दुकाने पटवली, मारहाण झाली वगैरे वगैरे बातम्यांनी वर्षाचा पहिला दिवस सुरू झाला.

तो दिवस हा महाराष्ट्राच्या राजकारणात एक राडा ठरणारा दिवस ठरला. त्यानंतर दंगल कशामुळे झाली. दंगलीमागे कोण होते अशा अनेक गोष्टींचा तपास सुरू झाला आणि इथेच पहिल्यांदा सर्वसामान्य पांढरपेशा लोकांच्यासमोर “एल्गार परिषदेचं” नाव आलं..

झालं अस की,

एल्गार परिषदेत चितावणीखोर व प्रक्षोभक भाषणे देण्याच्या आरोपावरून पुण्याच्या विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये दोन गुन्हे दाखल करण्यात आले. पहिला गुन्हा जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांच्यावर प्रक्षोभक भाषणे देण्यावरून दाखल करण्यात आला तर दूसरा गुन्हा तुषार दामगुडे यांच्या तक्रारीवर एल्गार परिषदेशी संबधित इतर व्यक्तिंवर दाखल करण्यात आला होता.

काही महिन्यांनंतर सुधीर ढवळे यांच्यासह ५ जणांना अटक करण्यात आली. गौतम नवलाखा, सुधा भारद्वाज, वरावरा राव, अरुण फरेरा, व्हर्नोन गोन्सावलिस यांना अटक करण्यात आली होती.

भिमा कोरेगावच्या हिंसेच मुळ शोधत असताना याची पाळेमुळे एल्गार परिषदेत असल्याचा आरोप पुणे पोलीसांनी केला इतकच काय तर पोलीसांनी अटक केलेले सर्वजण कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेचे सदस्य असून एल्गार परिषद हा त्यांचा देश अस्थिर करण्याच्या कटाचा भाग होता अस न्यायालयात पुणे पोलीसांनी सांगितलं होतं.

आत्ता मुख्य मुद्दा राहतो तो म्हणजे चर्चेत असणारी व सातत्याने वादाच्या भवऱ्यात राहणारी एल्गार परिषद ही नेमकी काय भानगड आहे..

१ जानेवारी २०१८ रोजी भिमा कोरेगाव येथे झालेल्या लढाईला २०० वर्ष पूर्ण झाले होते. हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो. त्यापूर्वी १ दिवस म्हणजेच ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यातील शनिवार वाडा येथे एल्गार परिषदेचे पहिल्यांदा आयोजन करण्यात आलं होतं.  भीमा कोरेगाव शोर्य दिन प्रेरणा अभियाना अंतर्गत पहिल्यांदा एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आलं.

याच ब्रिदवाक्य होतं,

लोकशाही वाचवा, संविधान वाचवा, देश वाचवा…

एल्गार परिषदेच्या या आयोजनात सुमारे २७४ संघटना होत्या. रोहित वेम्युला यांच्या आई राधिका वेमुला यांच्या हस्ते या परिषदेचं उद्धाटन झालं. त्यांच्यासोबत भारिपचे प्रकाश आंबेडकर, माजी न्यायमुर्ती बी.जी. कोळसे पाटील, जिग्नेश मेवानी, उमर खालिद, सोनी सोरी व इतर मान्यवर व्यक्ती या परिषदेत उपस्थित होते.

ही परिषद दंगलीस कारणीभूत ठरली अस पोलीसांनी सांगितलं होतं. यामध्ये प्रत्यक्षात माओवादी कार्यकर्ते यांची विचारसरणीचा प्रचार करत होते. अस देखील पोलीसांनी न्यायालयात सांगितलं आहे. 

एल्गार परिषदेमध्ये सुधीर ढवळे आणि कबीर कला मंचच्या सदस्यांनी आक्षेपार्ह गाणी सादर केली होती, चितावणीखोर पत्रक व पुस्तिका वितरीत करण्यात आल्या होत्या अस पुणे पोलिसांचं म्हणणं होतं.

अशा प्रकारे पहिलीच एल्गार परिषद चर्चेत राहिली होती, माध्यमांमधून त्यावर आरोप करण्यात आले. मात्र एल्गार परिषदेचा नेमका हेतू काय होता, काय आहे

या संदर्भात बोलभिडूने एल्गार परिषदेशी संबधित असणाऱ्या केशव वाघमारे यांच्याशी संपर्क साधला.

त्यांनी सांगितलं,

पेशवाईच्या जुलमी इतिहासाला २०० वर्ष पूर्ण झाली होती. जातीअंताचा संदेश तो देण्यासाठी या कार्यक्रमाचा आयोजन केल होत. पण त्या अगोदर काही लोक मराठा आणि दलितांमधील संघर्ष असल्याच पसरवत होते.

पण पण हा दलित व मराठ्यांच्यातील संघर्ष नव्हता. तर मराठा आणि दलितांनी मिळून पेशवाईच्या विरोधात केलेला संघर्ष होता.

पण काही लोक चुकीचा संदेश काही लोक पसरवत होते. त्याला रोखन हा मुख्य उद्देश या परिषदेचा होता. भीमा कोरेगाव मधील ते प्रतिक हे जाती अंताच प्रतिक आहे. ती जाती अंताची लढाई दलित आणि मराठ्यांनी सोबत लढली होती. हा संदेश लोकांपर्यंत जाण्यासाठी एल्गार परिषदेच आयोजन करण्यात आलं होत.

दूसरीकडे या वर्षीची एल्गार परिषद देखील शर्जील उस्मानीच्या वक्तव्यावरून चर्चेत आलेली आहे. याबाबत या वर्षीच्या म्हणजे दूसऱ्या एल्गार परिषदेचा हेतू केशव वाघमारे यांनी स्पष्ट करताना सांगितलं की,

सरकारने जन आंदोलनाच दमन सुरू केलं आहे. शेतकऱ्यांच आंदोलन सुरु असेल, मुस्लीमांच असेल, त्यांच आंदोलन लोकशाही मार्गान सुरु आहे. पण त्यांच दमन सुरु आहे, या दमनाला प्रतिरोध म्हणून या परिषदेच आयोजन केल होत.

या वर्षीची परिषद नियोजित होती पण प्रशासनाने कोरोनाचे कारण देत परवानगी दिली नव्हती. पण नंतर ती परवानगी ३० जानेवारी रोजी मिळाली. या परिषदेला २५० लोकांच्या उपस्थितीत  करण्याची परवानगी मिळाली होती.

दिनांक ३० जानेवारी रोजी पुण्यातील स्वारगेट जवळील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे आयोजित करण्यात आली होती.

३० जानेवारीच्या एल्गार परिषदेला न्यायमुर्ती बी जी कोळसे पाटील, अरुंधती रॉय, रिटायर्ड आयएएस ऑफीसर गोपी कंदन, एन एफ मुश्रीफ, शर्जील उस्मानी यांची उपस्थिती होती. या परिषदेचे आयोजन राज्यातील अनेक संघटनेने केले होते.

यामध्ये अलिगढ विद्यापीठाचा विद्यार्थी असलेल्या शार्जील उस्मानी याने खालील विधान केले आहे,

त्याच्या या वादग्रस्त विधानावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहलं आहे. पाच दिवस झाले तरी त्यावर कारवाई झाली नसल्याने चंद्रकांत पाटील यांनी देखील यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहले आहे.

हे ही वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.