गुप्तरोगी यहाँ आके मिले असं तुम्ही वाचलंच असेल.. पण गुप्तरोग म्हणजे काय ?

मी माझे डोळे तळहातांनी झाकले आणि विचार करू लागलो की ही मी नाही, हे माझं शरीर नाही, जणू मी माझ्याच खोलीत, माझ्याच घरात पडून आहे. इथे जे काही अश्‍लील घडत आहे, त्यात मी कुठेच संलग्न नाही. यानंतर रुद्र माझ्या सर्व अंगावर आला. यावेळी माझे डोळेच नाही तर माझा श्वासही थांबला. माझे दोन्ही पाय सरकवून तो मला जवळ ओढण्याचा प्रयत्न करत राहिला. रुद्रने माझ्या शरीरावर जास्तीचा दाब टाकायला सुरुवात केली.

श्वास रोखून धरून मी माझ्या पतीचा नैसर्गिक दबाव सहन करत राहिले. नकळत माझ्या तोंडातून विव्हळण्याचा आवाज आला. रुद्रने माझे तोंड दाबून धरले. रात्रभर रुद्र नैसर्गिक नियमाप्रमाणे हळूहळू, पूर्ण मार्गाने माझ्यात शिरण्याचा प्रयत्न करत राहिला. 

या सर्व गोष्टीनंतर रुद्रने तस्लिमाला दिलेली प्रेमाची भेट म्हणजे वेश्याव्यवसायातून मिळालेला सिफिलीसचा आजार.

हे सगळं तस्लिमा नसरीन यांनी लिहिलं आहे त्यांच्या उधाणवारा या आत्मचरित्रात. कदाचित कुठल्याच स्त्रीला हे उघडपणे सांगता येत नाही की तिला गुप्तरोग झालाय. बऱ्याच घटनांमध्ये तो पुरुषांकडूनच मिळेल असतो. कारण हा गुप्तरोग बऱ्यापैकी वेश्यालयांतूनच पसरतो. 

आज आपण चंद्रावर राहायचंच तेवढं बाकी आहोत. म्हणजे जग एवढ्या पुढं पोहोचलयं. पण तरी हि सेक्स संबंधी बोलताना एक प्रकारचा टॅबू आपल्या समाजात आपण अनुभवतो. त्यातून मग सेक्स असो वा त्याविषयीच्या काही शंका कुशंका त्यांचं काही निरसन होत नाही. गुप्तरोगाबद्दल तसंच आहे. 

आपल्या गावाकडच्या भिंती ‘गुप्तरोगी यहा आके मिले’ वैगरे सारख्या विषयाने रंगलेल्या दिसतात. पण याविषयी लोक उघड उघड बोलताना दिसत नाहीत. आता हे काहीच नाही, सार्वजनिक शौचालयात गेलात तर याच पोस्टर लागलेच असतं. पण हा खरा उपाय नसतोच. आधी समजून घ्यायला पाहिजे हा गुप्तरोग कसा होतो ते…. 

वेश्येकडे गेल्यावर गुप्तरोग होतो. गुप्तरोग हा एक रोग नव्हे, तो दहा रोगांचा समुदायच  म्हणावा लागेल. हे सर्व रोग एकाच वेळी होतील असेही नाही. यातील एखाद दुसरा रोग होतो. पण आधी कोणता होईल हे आधी कळणे शक्य नसतं. या रोगाचे परिणाम मात्र रुग्णाला हैराण करून सोडतात. कुणाला लघवीला जळजळ होते, लघवी तुंबते, त्यामुळे वारंवार मूत्रमार्गात सळी घालून मूत्रमार्ग रुंद करावा लागतो. कुणाला जांघेत गाठी येऊन त्या वाहू लागतात. कुणाच्या शिश्नावर जखमा होतात, कुणाची जननेंद्रिये सुजतात व बेढब होतात. कुणाच्या शिनावर कॉलिफ्लॉवरसारखी गाठ येते. कुणाचे नाक बसके होते. कुणी लुळापांगळा, बहिरा होतो.

हा रोग नक्की होतो कसा? 

गुप्तरोग असलेल्या व्यक्तीशी संभोग घडला तरच गुप्तरोग होतो. गुप्तरोग असलेल्या व्यक्तीने हस्तांदोलन केले किंवा त्याने वापरलेली भांडी, टॉवेल, साबण वापरला म्हणून गुप्तरोग होत नाही. सार्वजनिक प्रसाधनगृहाचा वापर केल्यामुळे गुप्तरोग होत नाही. गुप्तरोग होण्याचा एकमेव मार्ग असतो संभोग, वेश्या या गुप्तरोगाचे माहेरघर असतं. परंतु केवळ वेश्यांमुळेच गुप्तरोग होतो असे नव्हे. वेश्येकडून पुरुषाला रोग होतो आणि त्या पुरुषाकडून त्याच्या पत्नीला तिच्याकडून तिला होणाऱ्या मुलाला असे हे गुप्तरोगाचे लोण पसरत जाते.

आता यात प्रकार जरी ब्रेक हा असले तरी सिफिलीस यातला प्रमुख रोग आहे. 

जननेंद्रियाच्या श्लेष्मल त्वचेतून जंतूना प्रवेश होतो. रोगट व्यक्तीशी केलेल्या संभोगानंतर तीनचार आठवडे काहीच त्रास होत नाही. तोवर शरीरात शिरलेले जंतु वाढत जातात आणि कार्यरत होतात. सुमारे एक महिन्यानंतर ज्या जागेतून हे जंतू शिरले होते तेथे एक पुळी येते आणि ती फुटते. त्यातून पाण्यासारखा द्रव येतो. पुढे तेथे एक डाग येतो. या डागाला वेदना नसतात. त्यामुळे रुग्ण कोणताही उपचार करत नाही. पुढे डाग आपोआप बरा होतो. आपण बरे झाले आहोत, अशी रुग्णाची गैरसमजूत होते. पण पुढच्या एक-दोन महिन्यात जांघेत गाठी येतात, मात्र त्या दुखत नाहीत.

हाडातून वेदना येतात, ताप येतो, केस गळतात. वृषण सुजतात आणि दुखतात, अंगावर पुरळ येते, पण खाज येत नाही. ही लक्षणे आपोआप बरी होतात. पण रोग अंगात मुरलेला असतो. पुढे पायावर आणि हातावर डाग येतात. नाकात वण उठून भोक पडून नाक बसके होते. यानंतर रोग बरीच वर्षं सुप्तावस्थेत राहतो.

दहाएक वर्षांनंतर पुन्हा रोगाचा प्रादुर्भाव होतो. 

जंतू मेंदूत शिरले तर वेड लागते किवा पक्षघात होतो. जंतूंनी मज्जासंस्थेवर हल्ला केला तर माणूस लुळापांगळा होतो. काहींना अंधत्व येते, तर काहींना मृत्यू येतो. गर्भार स्त्रीला हा रोग झाला, तर मूल मृतावस्थेत जन्मते. मूल जरी जिवंत राहिले तरी विद्रुप चेहऱ्याचे होते.

या रोगाची लागण झालेली आहे किंवा नाही हे समजण्यासाठी रक्ताची तपासणी व्ही. डी. आर. एल. चाचणी करावी लागते. पेनिसिलीन इंजेक्शनने हा रोग बरा होऊ शकतो, मात्र शक्य तितक्या लवकर उपचार करायला हवेत. योग्य मात्रेत इंजेक्शनचा संपूर्ण कोर्स केल्यासच रोग पूर्णपणे बरा होतो.

आता फक्त सिफिलिसच नाही तर गोनोऱ्हिया, लिंफोग्रॅन्युलोमा व्हेनेरियम, ग्रॅन्युलोमा इंग्वायनेल, हर्पिस जेनेटलीस, व्हेनेरिअल वॉर्ट, ट्रायकोमोनियासिस, कॅण्डीडीयासीस, नॉन्स्पेसिफिक युरेथ्रायटिस असे गुप्तरोगांचे प्रकार आहेत.

थोडक्यात गुप्तरोग घातक असतो. यावर वेळीच उपचार व्हायला हवा. 

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.