या IPS महिलेनं १५ महिन्यात १६ अतिरेक्यांना खात्मा केला होता तर ६४ जणांना तुरूगांत डांबलं होतं.

सध्या प्रत्येक क्षेत्रात महिलानं आपल्या कतृत्वानं ठसा उमटवलाय. असं कोणतचं क्षेत्र नाही जिथं महिला नाहीत. पुरूषांच्या खाद्यांला खांद्याला लावून सध्या महिला काम करतात. महिलांनी फक्त चुल आणि मुलच सांभाळायच्या या पांचट परंपरेला छेद देत अनेक महिलांनी स्वत:ला सिद्ध केलंय. आज तुम्हाला अशा एका वाघिणीची गोष्ट सांगणार आहोत. जिनं अवघ्या १५ महिन्यात १६ अतिरेक्यांना यमसदिनी धाडलं. तब्बल ६४ अतिरेक्यांना कारागृहात डाबलं.

संजूक्ता पराशर. हे नाव जरी अतिरेक्यांनी ऐकलं तरी त्यांना पळता भूई होती. या नावाचं वादळ त्यांच्यावर सतत घोघांवतंय.

संजूक्ता पराशर मुळची आसाम राज्यातील. तीची आई आसाममधील एका आरोग्य सेवेत काम करायची तर वडील सिंचन विभागात इंजिनीअर होते. लहानपणापासूनच संजूक्ता शाळेत हुशार होती. विविध खेळात तीला आवड होती. अभ्यासात हुशार असल्यामुळे  शाळेत ती पहिली यायची. त्यानंतर दिल्लीतील काँलेजमध्ये तीनं पॉलिटीकल सायन्समध्ये डिग्री मिळवली. जेनयूसारख्या नावाजलेल्या विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय संबंध या विषयात पोस्ट ग्रज्युएशन केलं. तसंच युएस फॉरेन पॉलिसी या विषयात तीने पीएचडी केली.

त्यानंतर प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी तीनं तयारी सुरू केली आणि २००६ साली लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत ती देशात ८५ क्रमांक घेत पास झाली. पहिल्या १८० उमेदवारांच्या यादीत येणाऱ्यांना आयएएस होतं येतं. संजुक्तालाही आय़एएस होता आलं असतं. मात्र पहिल्या १८० उमेदवारात येवून सु्द्धा तीनं आयपीएस पदाची निवड केली.

संजुक्ता सांगते की,

“फक्त आयपीएस ही अशी पोस्ट आहे की, ती पिडीतांना तात्काळ मदत करते. त्यांना न्याय देते. त्यामुळे मी आयपीएस ची निवड केलीय आणि त्याचा मला अभिमान आहे”

२००६ साली भारतीय प्रशासकीय सेवेत आल्यानंतर तीनं आपली चुणूक दाखवली होती. मात्र तेव्हा संजुक्ता एवढी प्रकाशझोतात आली नाही.

सालं होतं २०१४. संजुक्ताची पोस्टींग आसाममध्ये म्हणजे स्वत:च्याच राज्यात झाली. संजुक्ता ही आसाममध्ये कार्यरत होणारी पहिली आसामी महिला अधिकारी होती. आपलाच इलाका म्हणल्यावर इथलची संपुर्ण माहिती तीला होतीच. मात्र बोडो अतिरेक्यांनी जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. शेकडो लोकांचे बळी गेले होते. आसामच्या घनदाट जंगलात शिरून त्यांच्याशी मुकाबला करणं म्हणजे मृत्यूला जणू आमंत्रणच होतं. मात्र संजुक्ता घाबरली नाही धैर्यानं या सगळ्याला सामोरं गेली.

हातात एके 47 घेऊन संजूक्ता सीआरपीएफ च्या जवानांना घेऊन घनदाट जंगलात शिरायची. अतिरेक्यांना शोधून शोधून मारायची. अतिरेक्यांचे अड्डे उद्धवस्त करायची.

त्यामुळे अतिरेक्यांचे धाबे दणाणले. तीच्या नावानंही अतिरेक्यांना कापरे फुटाय़ला लागले. एका पाठोपाठ संजुक्तांना सीआरएफ जवानांच्या साथीनं अनेक मोहिमा फत्ते केल्या. त्यामुळे संजुक्ता अतिरेक्यांच्या रडारवर आली. तीला जिवे मारणारे फोन, पत्र यायला लागली. मात्र तळहातावर जीव घेऊन जगणाऱ्या संजुक्ताला या धमक्यांनी काही फरक पडला नाही.

अवघ्या पंधरा महिन्याच्या काळात तीनं १६ अतिरेक्यांचा खात्मा केला. तब्बल ६४ अतिरेक्यांना तुरूगांत डांबलं. आसामधील अतिरेकी कारवायांना कायमचा धडा शिकवला आणि आसामी लोकांना या त्रासापासून मुक्त केलं, असा या रणरागीणीच्या धैर्याला, तीच्या अफाट कर्तृत्वाला आपण सलाम केला पाहिजे.

सध्या संजुक्ता पराशर ही दिल्लीत कार्यरत आहे. तीचं लग्न झालं असून तीला एक मुलगा आहे. मात्र अतिरेक्यांच्यात तीची दहशत अजूनही कायम आहे.

हे हि वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.