जन्मठेपेची शिक्षा भोगणारा रोहन आत्ता लेखक,कवी,चित्रकार देखील झालाय !

गुन्हा करून लोक तुरुंगातच जातात, तिथं जाऊन काय खडीच फोडायचीय की.. 

असं समजणाऱ्या लोकांना कदाचित तुरुंगात जाऊन चित्रकार, लेखक आणि पदवीधर झालेल्या गोव्याच्या रोहन पै धुंगाट नावाच्या तरुणाची गोष्ट सांगितली तर पटणारच नाही. पण आज भिडू तुम्हाला त्याची गोष्ट सांगणारेय, त्याच्या गुन्ह्याचे समर्थन करता येणे कोणत्याच अँगलमधून मान्य नसले तरी त्याने तुरूंगासारख्या बंदिस्त जागेत जाऊन त्याने घेतलेली झेप तुम्हा आम्हालाही अवाक करणारी ठरते. 

जन्मठेपेची शिक्षा भोगत असणारा रोहन फक्‍त कैदी नसून लेखक, कवी, चित्रकार आणि पाच पदव्यांना धारण करणारा शिक्षित तरुणही आहे आणि हे सगळं त्याने तुरुंगांच्या चार भिंतीत राहून मिळवलं आहे.

 रोहन केवळ 19 वर्षांचा होता. प्रत्येक तरूणाप्रमाणे तोही उनाडक्‍या करीत हिंडत असे. कॉलेजमध्ये तुम्ही आम्ही करतो त्या स्किमा करताना आपल्याला तर त्याचे परिणाम कोठे माहीत असतात तसंच काहीसं रोहनचं झालं. गर्भश्रीमंत असणाऱ्या मित्राच्या वडिलांकडून पैसे उकळायचे म्हणून त्यांनी त्यांचाच मित्राचा भाऊ असणाऱ्या मंदार सुर्लकरचं अपहरण करण्याचे ठरविले. चेष्टेचेष्टेत करण्यात येणाऱ्या या अपहरणाची माहिती मंदारलाही होती आणि अपहरण केल्यानंतर मिळणाऱ्या पैशाचा वाटा त्यालाही मिळणार होता. रायन पिंटो, नफियाज, शेख, शंकर तिवारी, सनी बेग आणि मंदार सुर्लकर या पाच जणांच्या मैत्रीची ख्याती अख्खा कॉलेजला होती. 

14 ऑगस्ट 2006 रोजीचा दिवस ठरला. ठरल्याप्रमाणे रोहन मंदारला त्याच्या घरी आणण्यासाठी गेला. मंदारला रायनच्या उकसई येथे असणाऱ्या घरी नेताना रोहन मात्र त्यांच्यासोबत न जाता पणजीतच उतरला. तिथून काही तासांनी मंदारच्या मित्रांनी पैशांची मागणी करणारा फोन आल्यानंतर त्यांनी पोलिस स्थानकात धाव घेतली. 

बाकीचे लोक पुढे गेल्यानंतर खंडणीच्या पैशांची मौजमजा कशी करायची या चर्चेत रंगले असतानाच कोण किती टक्‍क्‍यांमध्ये पैसे घेणार यावरून वाद झाला आणि हा वाद टोकाला गेला आणि बेसबॉल बॅटने मारून मंदारचा खून झाला. 

अटक होईपर्यंत मंदारचा खून झाल्याची कल्पना रोहनला नव्हती.

यामध्ये असणारा सनी माफीचा साक्षीदार असल्याने न्यायालयाला या प्रकरणाचे धागेदोरे मिळाले, ज्याचा उपयोग रोहनसह त्याच्या बाकीच्या मित्रांना जन्मठेपेची शिक्षा देण्यासाठी करून घेण्यात आला. 

मित्रांनीच केलेला खून म्हणून या घटनेने सर्वत्र खळबळ माजविली. रोहनचे आईवडील डॉक्‍टर होते, तो त्याच्या वर्गात नेहमी प्रथम येत असे. खून होताना रोहन तिथे हजर नसला किंवा त्याचा या खुनात सरळसरळ सहभाग नसलातरी तो या प्रकरणाचा भाग होता म्हणून त्यालाही शिक्षा करण्यात आली.

12 वर्षे 3 महिन्यांपासून तो गोव्याच्या तुरुंगात आहे पण खडी फोडण्याव्यतिरिक्‍त त्याने अगणित चित्रे रेखाटली आहेत. फॉर बेटर, फॉर वर्स नावाचा त्याचा कवितासंग्रह प्रसिद्ध आहे. त्याने या काळात एकच नव्हे तर पाच पदव्या संपादन केल्या. इंग्रजी वाङ्‌मयात त्याने पहिल्यांदा बी.ए. केलं करून लेबर अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ, आयडीसीचा असणारा बिझनेस मॅनेजमेंट कोर्स, कम्युनिकेशन अँड आयडी स्किलचा पदव्युत्तर अभ्यासक्रम त्याने पूर्ण केला आहे. शिवाय पत्रकारिता आणि जनसंज्ञापनसह एनजीओ मॅनेजमेंट कोर्सही त्याने केला आहे. 

त्याचं पुस्तक देखील बाजारात उपलब्घ आहे.

घरातील तो सर्वांचा लाडका असल्याने घरातील अनेकजण त्याला भेटायला येत होते. एकेदिवशी तुरुंगांत माझा भाऊ भेटायला आला असता त्याने रंग ब्रश आणि वही मला भेट म्हणून दिली. शाळेत असताना चित्रं काढण्याचा छंद मला ही वही बघून आठवला. तासनतास बसून तो चित्र काढायला लागला. चित्रांमधून समाधान सापडत गेलं. हीच गोष्ट कवितांचीही आहे. रात्री चटईवर झोपलोकी भूतकाळ काटे होऊन बोचत असे, त्या बोचणाऱ्या काट्याचं रूपांतर शब्दांमध्ये केल आणि कविता तयार झाली असं सांगणारा रोहन सध्या स्वतःचे आत्मचरित्र लिहीत आहे.

आयुष्याला नवी दिशा दिल्याबद्‌दल “स्वर्गीय सिस्टर मेरी जेन” यांचे नाव रोहन माझी दुसरी आई म्हणून सतत घेतो. ज्योकिम नावाचा तुरुंग अधिकाऱ्यानं माझी चित्रे घरात नेऊन लावली, मी जातपात मानत नाही पण माझ्यावर असणाऱ्या कलंकामुळे लोक स्पर्श झाला तरी अंघोळ करावी असे वागत असता ज्योकिमने दाखविलेला मोठेपणा मला बळ देणारा ठरला. 

2011 साली भरलेल्या पहिल्या प्रदर्शनातील कविता वाचून डॉ. योगिनी आचार्य त्याला पत्र पाठवून त्याचा कविता संग्रह प्रकाशित करण्यासाठी बोलून दाखविले आणि रोहनच्या आयुष्याने स्वतःचे सकारात्मक अस्तित्व निर्माण करण्यासाठीचा सूर धरला. या सगळ्यात आईवडिलांची साथ डोळ्यासह पापण्यासारखी होती, असे रोहन सांगतो. 

बोलभिडू कायकर्त्यांशी बोलताना तो म्हणाला, 

मला मी केलेली चूक आणि त्याची पातळी माहीत असून मी आयुष्यभर त्या चुकीसाठी क्षमस्व राहीन. सतत अस्वस्थता देणारं माझं नशीब असलं तरी मी स्वस्थ राहून स्वतःची प्रगती करू इच्छितो, आणि त्यासाठी हा खटाटोप सुरू असतो. 

आता गुगलवर रोहन पै धुगांट हे नाव कैदी असल्याचं तर सांगतच पण त्यानंतर चित्रकार, लेखक, कवी अशी माझी ओळख असल्याचीही करून देते. आज लोक मला बघून बाजू काढतात, मला समोर चांगले म्हणून पुढे जाऊन कैदी म्हणतात, पुर्वी जे लोक ओळखायचे ते आता पाहून नाक मुरडतात, लोकांचे टोमणे ऐकायला मिळतात म्हणून आईवडीलांना तर सामाजिका कार्यक्रमात जाण्यात रसच उरलेला नाही, त्यांच्यासाठी मी इतकंच म्हणतो, 

कुछ तो लोग कहेंगे…लोगोंका का काम है केहना…छोडो बेकार की बातोमें…कही बित ना जाये रैना…ह

हे ही वाचा – 

Leave A Reply

Your email address will not be published.