…नाही तर धोनीऐवजी युवराज सिंग भारताचा कॅप्टन झाला असता

भारतीय क्रिकेट संघाचा कुल कॅप्टन म्हणून ओळखला जाणारा महेंद्रसिंग धोनी सगळ्यात यशस्वी कॅप्टनपैकी एक मानला जातो. ज्याच्या नेतृत्वात टीम इंडियानं अनेक ट्रॉफीज आपल्या नावावर केल्यात. धोनीचं सगळ्यात मोठं यश म्हणजे २००७ आणि २०११ चा वर्ल्ड कप. भारतीय संघानं या वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवला आणि धोनीने त्याच्या यशाकडे एक मोठे पाऊल टाकलं.

कॅप्टन म्हणून या दोन्ही वर्ल्डकपमध्ये महेंद्रसिंग धोनीनं एक बेंचमार्क सेट केला. दरम्यान जेव्हा भारतीय टीम मॅनेजमेंटने टी -२० वर्ल्ड कपसाठी कॅप्टन म्हणून धोनीच्या नावावर शिक्कामोर्तब केला, तेव्हा युवराज सिंग हैराण झाला होता. त्यानं एका मुलाखतीत बोलताना म्हंटल कि,

‘धोनीला टी- २० फॉरमॅटचा कॅप्टन बनवण्यात येईल,  याची कोणतीच अपेक्षा नव्हती.

युवराज सिंह सुद्धा सर्वोत्तम खेळाडूंच्या यादीत गणला जातो. त्याने अनेक वेळा आपल्या आक्रमक बॅटिंगने समोरच्या संघाच्या बॉलरला घाम फोडलंय. त्यामुळेच त्याला सिक्सर किंग असं म्हंटल जात. २००७ च्या टी २० वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंहने जबरदस्त परफॉर्मन्स  दिला होता. या टुर्नामेंटच्या फायनलमध्ये भारताने पाकिस्तानला हरवून किताब आपल्या नावे केला होता.  यात युवराजला प्लेयर ऑफ द सीरीज म्हणून निवडलं गेलं होत. 

युवराजला कॅप्टन बनवतील अशी अपेक्षा होती 

मुलाखतीत बोलताना युवराज सिंह म्हणाला कि,

त्यावेळी वनडे वर्ल्डमध्ये खराब कामगिरीमुळे भारतीय क्रिकेट संघात मोठी खळबळ उडाली होती. यानंतर टीम इंडियाला एका महिन्यासाठी आयर्लंड आणि साऊथ आफ्रिकेच्या दौऱ्यावर जायचं होत. त्यानंतर दोन महिन्यांच्या इंग्लंड दौऱ्यावरही जायचं होत. त्यामुळे सगळ्या खेळाडूंना ४ महिन्यांसाठी घरापासून दूर जायचं होत. याच दरम्यान टी  २० वर्ल्ड कप सुद्धा खेळला जाणार होता. आता युवराजचा मागचा परफॉर्मन्स पाहता त्याला वाटलं कि, टी -२० वर्ल्ड कपसाठी त्याला कॅप्टन बनवलं जाईल.

पण टीम मॅनेजमेंटने या टी -२० फॉरमॅटसाठी युवराजच्या ऐवजी महेंद्र सिंग धोनीच्या नावाला पसंती दिली. हे समजताच युवराज जरा हैराण झाला. कारण त्याला कॅप्टनपदी स्वतःच्या नावाची अपेक्षा होती. दरम्यान तो असही म्हणाला कि, कॅप्टन कोणालाही बनवलं असेल, त्यानंतर सगळ्यांचं काम होत पूर्णपणे आपल्या कॅप्टनला सपोर्ट करणं आणि संघासाठी चांगला परफॉर्मन्स देणं.

सचिन तेंडुलकरनं सुचवलं होत नाव

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका मुलाखतीत या कॅप्टन निवडीचा एका किस्सा सांगितला.

२००५ ते २००८ या काळात पवारांकडे  बीसीसीआयचं अध्यक्षपद होत. त्यावेळी राहुल द्रविड संघाचा कॅप्टन होता. मात्र २००७ ला इंग्लड दौऱ्याच्या वेळी राहुलने टीमचं नेतृत्व करायचं नसल्याचं सांगितलं. त्यामुळे नवीन कॅप्टन निवडणं भाग होत.

त्यावेळी पवारांनी कॅप्टन पदाची ऑफर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला दिली. पण सचिननं ही जबाबदारी नाकारली. मात्र त्यानं संघाच्या नेतृत्वासाठी महेंद्र सिंग धोनीचं नाव पुढं केलं. त्यामुळे टीम मॅनेजमेंटने यावर विचार करत आपलं एकमत बनवलं. आणि धोनी सारखा उत्कृष्ट कॅप्टन भारतीय संघाला मिळाला.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.