भारताच्या राष्ट्रीय प्राण्याबद्दल काही खास गोष्टी ज्या तुम्हाला माहिती नसतील.

वाघ हा आपल्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे हे तुम्हला माहिती असेलच. सध्या वाग दिसण दुर्मिळ आहे, झपाट्याने वाढणाऱ्या जगात सध्या प्राण्यांना वाचवण्यासाठी स्वतंत्र मोहीम उघडावी लागते हे तस दुर्द्व्य आहे. अशीच मोहीम आपल्याकडे सध्या वाघ वाचवण्यासाठी देखील चालू आहे. पण आपल्या देशाच्या राष्ट्रीय प्राण्याबद्दल आज तुम्हला काही खास गोष्टी सांगणार आहोत.

  1. प्रत्येक वर्षी २९ जुलै हा दिवस जागतिक वाघ दिन म्हणून साजरा केला जातो.
  2. वाघ हा मांजरीच्या परजातीतला सगळ्यात मोठा प्राणी आहे. तसेच हा पृथ्वीवरील तीन नंबरचा सगळ्यात मोठा मंसाहारी प्राणी देखील आहे.
  3. एक वाघ जंगलात किमान दहा वर्ष आणि एखाद्या प्राणी अभयारण्यात किमान २० वर्षच जगू शकतो.
  4. वाघिणीची गर्भधारणा ३.५ महिन्यात एकदा होते. ती एकावेळी ३ ते ४ पिल्लांना जन्म देऊ शकते.
  5. वाघाच्या डोक्याचं वजन ३०० ग्राम असत. सगळ्या मंसहरी प्राण्यात हे दोन नंबरच जड डोक आहे.
  6. एकूण ९ प्रकारचे वाघ असतात, या पैकी आता फक्त तीन प्रकारचे वाघ शिलक आहेत.
  7. एक वाघ साधारण ३०० किलो वजनाचा आणि १३ फुट लांबीचा असतो.
  8. पांढऱ्या रंगाचे वाघ जन्माला येण्याची शक्यता खूप कमी असते.
  9. वाघाच्या अंगावरील रेषा या आपल्या बोटांच्या ठ्सायाप्रमाणे युनिक असतात.
  10. २०१६ मधील एका रिपोर्टनुसार जगात फक्त ३८९१ वाघाची पिल्ल शिल्लक आहेत. ज्यातील ७०% भारतात असून कर्नाटक मध्ये सगळ्यात जास्त ४०८ आहेत.
  11. वाघाच्या कळपाला AMBUSH किंवा STREAK या दोननावांनी ओळखले जाते.
  12. एक वाघ १८ HERTZ पर्यंत आवाज निर्माण करू शकतो आणि त्याची डरकाळी तीन किलोमीटर दूर पर्यंत ऐकू जाते.
  13. प्रत्येक वाघाच्या कानापाठीमागे पांढऱ्या रंगाचे डाग असतात.
  14. वाघ सहसा ३० फुट लांब उडी आणि १२ फुट लांब झेप मारू शकतो.
  15. एका मांजरीचा आणि वाघाचा ९५.६ % DNA चा हिस्सा वाघासोबत मिळताजुळता असतो.

हे ही वाचा भिडू.  

Leave A Reply

Your email address will not be published.