विराट कोहलीचे फॅन आहात का? मग जाणून घ्या त्याच्या भन्नाट गोष्टी.

एखादा माणूस भारतात राहतो आणि त्याने क्रिकेट पहिले नाही असे जर म्हणले तर तुम्हाला पटेल का ? सहाजिकज नाही पटणार. भारत आणि क्रिकेट हे आपल्या देशाचे नवीन समीकरण आहे. त्यात सध्या टीम इंडियाचा कॅपटन आहे विराट कोहली. विराट कोहली हा आपल्या देशातील जगभरात प्रसिद्ध असणारा खेळाडू. आपल्यापैकी देखील कित्येक लोक विराट कोहलीचे डायहार्ड फॅन असणार आहात. पण या आपल्या देशाच्या आवडत्या क्रिकेट बद्दल काही विशेष गोष्टी वाचा ज्या तुम्हाला माहिती नसतील.

 • विराट कोहली चा जन्म ५ नोव्हेंबर १९८८ मध्ये झाला. त्याच्या भावाचे नाव विकास आणि बहिणीचे नाव भावना आहे. दिल्लीतील विशाल भारती पब्लिक स्कूल मध्ये त्याचे शालेय शिक्षण झाले.
 • सगळ्यात कमी वयात वनडे प्लेर ऑफ द यर हा पुरस्कार मिळवण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे.
 • विराट विराट कोहली फौंडेशनच्या माध्यमातून सामाजिक काम करतो. गरीब मुलांच्या शिक्षणासाठी ही संस्था काम करते.
 • २००८ च्या ipl मध्ये बेंगलोर संघाने विराट कोहलीला १२ लाख रुपयाची बोली लावून घेतले होते. तेच २०१८ मध्ये १७ करोड रुपये बोली लावण्यात आली.
 • विराट कोहलीने आयुष्यातली पहिली वनडे मॅच श्रीलंकेच्या विरोधात २००८ साली आणि पहिली २०-२० झिमबामबेच्या च्या विरोधात २०१० मध्ये खेळली तसेच पाहिली टेस्ट मॅच वेस्ट इंडीज विरोधात खेळली होती.
 • एका शाम्पूच्या ad शूट वेळी विराट आणि अनुष्काची पहिली ओळख झाली. त्यानंतर हे दोघे डेट करायला लागले, आणि नात्र ११ डिसेंबर २०१७ मध्ये इटली येथे लग्न केले.
 • २०१४ साली विराट कोहलीने इंडियन सुपर लीग मध्ये fc goa ही टीम विकत घेतली.
 • २०१४ साली विराट कोहली हा भारतातील सगळ्यात valueable celebrity असल्याचे फोर्ब्स ने म्हणले होते. २०१८ मध्ये फोर्ब्सने प्रकाशित केलेल्या सगळ्यात जास्त कमाई असणाऱ्या टोप १०० खेळाडूंमध्ये विराटचे स्थान ८३व्या क्रमांकावर आहे. या यादीत समावेश असणारा तो एकमेव भारतीय क्रिकेटर आहे. चिकू हे विराटच टोपणनाव आहे, हे नाव त्याला त्याचे प्रशिक्षक अजीत चौधरी हे दिल होत.
 • विराट कोहलीने आपल्या क्रिकेट करीयरची सुरवात १९९८ मध्ये वेस्ट दिल्ली क्रिकेट एसोसिएशन मधून केली होती. जुलै २००६ मध्ये अंडर १९ क्रिकेट टीम मध्ये त्याची निवड झाली आणि नोव्हेंबर २००६ मध्ये त्याने दिल्ली कडून त्याची पहिली रणजी मॅच खेळली.
 • १८ डिसेंबर २००६ मध्ये विराटच्या वडिलांचे निधन झाले पण दुसऱ्याच दिवशी विराटने कर्नाटक विरोधात ९० रन मारत अप्रतिम खेळी केली होती.
 • २००८ च्या अंडर १९ वर्ल्ड कप मध्ये विराट कोहलीने भारतीय टीमचा कॅप्टन होता, तेव्हा आपण हा वर्ल्ड कप जिंकला होता.

हे ही वाचा भिडू. 

 

Leave A Reply

Your email address will not be published.