देशात इंजिनिअर तर करोडो लोकं होऊ शकतात पण शंकर महादेवन हा एकदाच होतो…

स्कोप कशात आहे याच उत्तर भारतात इंजिनिअर कर भावा लै स्कोपय असं म्हटलं जातं. असाच एकेकाळी शंकर महादेवन इंजिनिअरिंग करत होता त्याला नंतर कळलं कि स्कोप कशात आहे आणि पुढे तो भारताचा टॉपचा संगीतकार आणि दिग्दर्शक झाला. पण शंकर महादेवन इंजिनिअरिंगवरून गाण्याकडं कसा शिफ्ट झाला त्याचा हा किस्सा.

एकदा एका पाहुण्याच्या घरी ६ वर्षाचा शंकर महादेवन वडिलांसोबत गेला असताना तिथे त्याला एका कोपऱ्यात हार्मोनियम दिसली. लहानगा शंकर त्या हार्मोनिअमजवळ गेला आणि तिला वाजवायचा प्रयत्न करू लागला. शंकरच्या वडिलांच्या ध्यानात आलं कि मुलाची गोडी कशात आहे. त्यांनी लवकरच त्याला एक हार्मोनियम घेऊन दिल आणि त्यावर शंकरचा सराव सुरु झाला. 

लहानपणीच हार्मोनियम आणि वीणा वाजवण्यात शंकर महादेवन पारंगत झाले होते. पुढे संगीताचं शिक्षण त्यांना मोठ्या लोकांकडून मिळालं आणि संगीत साधनेचं परिपूर्ण शिक्षण त्यांनी मिळवलं. टी.आर बालामणी यांच्याकडून कर्नाटकी संगीत आणि मराठी भावगीतांचं शिक्षण हे मराठीतले महान संगीतकार श्रीनिवास खळे यांच्याकडून शंकर महादेवनने मिळवले.

संगीताचं पारंपरिक शिक्षण घेत असतानाच सोबत कम्प्युटर सायन्समध्येही इंजिनिअरिंग शंकित महादेवनने केली. इतकं उत्तम शिक्षण घेतल्यावर नोकरी मिळण साहजिकच होतं. भारतात नोकरी न मिळता शंकर महादेवनला थेट अमेरीकेत नोकरी मिळाली होती.

पण जर शंकर महादेवन अमेरिकेत जाऊन नोकरी करत बसला असता तर संगीत शिक्षणाचा काहीच फायदा झाला नास्ता. अशा वेळी करियर कि संगीत अशा द्विधा मनस्थितीत तो सापडला असताना शंकर महादेवनने भारतात राहून संगीतातच करियर करण्याचा निर्णय घेतला. या कठीण प्रसंगात शंकर महादेवनच्या वडिलांनी सांगितलं होतं कि,

देशात करोडो इंजिनिअर होऊ शकतात पण शंकर महादेवन हा एकच होऊ शकतो.

शंकर महादेवनला त्याच्या घरच्यांनी फुल्ल सपोर्ट केला. यामुळे त्याला जास्त संघर्ष करता आला नाही. १९९८ साली शंकर महादेवनचा पहिला अल्बम आला ब्रेथलेस. या अल्बममुळे शंकर महादेवन हे नाव भारतभर आणि जगभर गाजलं.

हा अल्बम येण्याअगोदर शंकर महादेवन यांची जोडी एहसान आणि लॉय या दोन संगीतकारांशी झाली होती. सुरवातीला हे तिघे बँड स्वरूपात काम करत होते. यानंतर दिग्दर्शक मुकुल रॉय यांनी त्यांना बॉलिवूडमध्ये आणलं. तिघांनी मिळून एका सिनेमासाठी गाणं बनवलं पण ती फिल्म रिलीज झाली नाही मात्र त्यातलं हा गाणं आजही लोकांच्या ओठावर आहे. ते गाणं होतं  

‘सुनो गौर से दुनिया वालों बुरी नजर ना हम पर डालो, चाहे जितना जोर लगा लो…सबसे आगे होंगे हिंदुस्तानी.’

शंकर एहसान लॉय या जोडीने एकत्र बरेच सिनेमे संगीतबद्ध केले. त्यांची गाणी सुद्धा कायम सुपरहिट असतात. एकदा तारे जमीन पर या सिनेमाच्या क्लायमॅक्स वेळी शंकर महादेवन यांनी गाणं सुचवलं होतं मात्र आमिर खानने ते रिजेक्ट केलं होतं. पण शंकर महादेवन यांनी समजावून सांगितल्यावर ते गाणं खास त्या सिनेमासाठीच बनलं आहे वाटून अमीर खानने टी गाणं पुन्हा सिनेमात वापरलं.

यूं तो मैं बतलाता नहीं माँ हे गाणं फक्त रफ बनवलं होत आणि टेसिनेमात नव्हतं पण जेव्हा आमिरखानने ते गाणं ऐकलं त्याने ते रफ गाणंच सिनेमात वापरलं. शंकर एहसान लॉय यांची हि खासियत होती. सिनेमाच्या कथेला साजेशी गाणी देण्यात ते एक्सपर्ट आहेत. 

शंकर महादेवन यांचा आयटम सॉंग बनवण्यात कोणी हात धरू शकत नाही. याबद्दलचा अजून एक किस्सा आहे. कजरारे कजरारे हे गाणं त्यावेळी प्रचंड गाजलेलं होतं.

एके दिवशी सकाळी सकाळी शंकर महादेवन यांना शास्त्रीय संगीतातील महान पंडित जसराज यांचा फोन आला. शंकर महादेवन यांना वाटलं नक्कीच काहीतरी गडबड असावी पण पंडित जसराज म्हणाले शंकर काय जादू केली आहेस तू, सकाळपासून हेच गाणं गुणगुणतोय. शंकर महादेवनसाठी हि मोठी कॉम्प्लिमेंट होती.

एकेकाळी इंजिनिअर असलेला शंकर महादेवन संगीत क्षेत्रातला सगळ्यात टॉपचा गायक बनला हे हि तितकंच महत्वाचं आहे.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.