पहिल्या वर्ल्डवॉरमध्ये १९ वर्षाच्या भारतीय पायलटने दुष्मनांचे १० फ्लाईंग प्लेन पाडले होते….

युद्धात भूदल नौदल या दलांबरोबरच वायुदलालासुद्धा खूप महत्व आहे. हवाई युद्धात या वायुदलाची मोठी कामगिरी विरोधी देशाची हवा काढण्यात पुरेशी असते. वायुसेनेची ताकद म्हणजे फ्लाईंग प्लेन आणि फ्लाईंग पायलट. भारताच्या ताफ्यात अनेक शूरवीर फ्लाईंग पायलट होऊन गेले. १९६२ चं भारत चीन युद्ध असो किंवा कारगिलचा महासंग्राम असो भारताच्या हवाई दलाने मोठी कामगिरी बजावली.

या सगळ्यांव्यतिरिक्त भारताच्या एका बहादूर पायलटने असा कारनामा केला होता ज्यामुळे सगळ्या जगभरात त्याची चर्चा झाली होती. पहिल्या विश्वयुद्धाच्या काळात भारताच्या फ्लाईंग प्लेन पायलटने केलेली कामगिरी हि शूरवीरतेच प्रतिक मानण्यात आलं होतं. तर जाणून घेऊया भारताच्या या पायलटबद्दल. 

 या युद्धात महत्वाची कामगिरी बजावणाऱ्या भारतीय पायलटचं नाव होतं, इंद्र लाल रॉय.

२ डिसेंबर १८९८ साली कोलकातामध्ये इंद्र लाल रॉय यांचा जन्म झाला. वडील पियरा लाल रॉय आणि आई लॉलिता रॉय हे उच्चशिक्षित होते. इंद्र लाल रॉय यांच्यावर लहानपणापासूनच देशप्रेमाचे संस्कार होते.

१९१७ साली इंद्र लाल रॉय हे रॉयल फ्लाईंग कॉर्प्सचे महत्वाचे व्यक्ती होते. ज्यावेळी इंद्र लाल रॉय हे ब्रिटिश एअरफोर्स मध्ये सहभागी झाले तेव्हा त्यांचं वय हे फक्त १८ वर्षे होतं. त्यांची हवाईदलात निवड हि त्यावेळी झाली जेव्हा इंद्र लाल रॉय हे लंडनच्या सेंट पॉल स्कुलमध्ये शिकत होते. रॉय हे जिज्ञासू वृत्ती आणि मेहनती याने भरपूर होते. 

इंद्र लाल रॉय हे इतके हुशार होते कि एअरफोर्समध्ये भरती झाल्यावर अवघ्या तीन महिन्यातच त्यांचं प्रमोशन झालं. यामध्ये इंद्र लाल रॉय यांना सेकंड लेफ्टिनंट हि पदवी मिळाली होती. इंद्र लाल रॉय हे रॉयल फ्लाईंग कॉर्प्स तर्फे पहिल्या विश्वयुद्धात लढले होते.

या युद्धात एक मोठी घटना घडली होती ती म्हणजे इंद्र लाल रॉय हे तब्बल १७० तास विमान उडवत होते. हा त्यांचा सगळ्यात मोठा फ्लाईंग टाइम होता. 

वर्ल्डवॉरच्या या भीषण युद्धाच्या काळात इंद्र लाल रॉय यांनी १३ दिवसांत दुश्मनांचे तब्बल १० फ्लाईंग प्लेन खाली पाडले होते. या पहिल्या विश्व युद्धातच इंद्र लाल रॉय हे शहीद झाले. २२ जुलै १९१८ रोजी ते धारातीर्थी पडले. ज्यावेळी इंद्र लाल रॉय हे शहीद झाले त्यावेळी त्यांचं वय होतं फक्त १९ वर्षे.

इंद्र लाल रॉय यांच्या या पराक्रमाबद्दल आणि अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना डिस्टिंग्विश फ्लाईंग क्रॉस अवॉर्ड हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. २१ सप्टेंबर १९१८ रोजी द लंडन गॅजेट ने इंद्र लाल रॉय यांच्यावर लिहिलेला लेख छापून आला होता. या लेखात इंद्र लाल रॉय यांना शूरवीर, निर्भीड आणि बेस्ट पायलट म्हणण्यात आलं होतं. सोबतचं त्यांनी कशा प्रकारे दुश्मनांचे फ्लाईंग प्लेन पाडले याचंही वर्णन देण्यात आलं होतं.

डिसेंबर १९९८ मध्ये इंद्र लाल रॉय यांच्या १०० व्या स्मृतिदिनानिमित्त भारतीय पोस्टल सर्व्हिसने स्टॅम्प बनवला होता. भारताचे पहिले flying ace म्हणून इंद्र लाल रॉय यांना ओळखलं जातं. वर्ल्ड वॉरमध्ये इंद्र लाल रॉय यांनी केलेली कामगिरी अनेक जणांना प्रेरणादायी आहे. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.