लग्नात करवली बनलेल्या जेनेलियाला निर्मात्यांनी मंडपातच जाहिरातीसाठी कास्ट केलं होतं…
महाराष्ट्राच्या वहिनी म्हणजे जेनेलिया डिसुझा-देशमुख. बॉलिवूडमध्ये एकेकाळी जेनेलिया वहिनी यांनी साधी, सिंपल आणि चुलबुली पोरीचा ट्रेंड आणला होता. २००३ सालचा तुझे मेरी कसम रितेश भाऊ आणि जेनेलिया वहिनींचा डेब्यू सिनेमा होता. हा सिनेमा बराच काळ चालला आणि अजूनही त्याची क्रेझ तीच आहे. बॉलिवूडमध्ये जेनेलिया वहिनींची एंट्री कशी झाली त्याचा एक भारी किस्सा आहे, तो किस्सा आपण जाणून घेऊया.
लग्नसोहळ्यात नवरा नवरी कमी आणि इतर पब्लिक जास्त हवा करत असतात. नातेवाईकांची धांदल, फोटोवाले, बॅंडवाले यांचं वेगळं गाऱ्हाणं तर करवलीची तिसरीच तऱ्हा असते. तर अशाच एका लग्नात जेनेलिया डिसुझा करवली बनलेल्या होत्या. त्यावेळी त्यांचं वय १५-१६ असेल.
याच लग्नात काही फिल्म रिलेटेड लोकंसुद्धा आलेले होते. वयाच्या १५-१६ व्या वर्षी जेनेलिया डिसुझाला मॉडेल म्हणून संधी मिळाली होती. मॉडेलिंग असाइनमेंट हे आजसुद्धा खूप मोठी गोष्ट मानली जाते. लग्नात काही मेकर्स फिरत होते. त्यांना जेनेलिया डिसुझाचा चेहरा ऍड फिल्मसाठी चांगला वाटला. त्यांनी लागलीच जेनेलिया डिसूझाची भेट घेतली आणि लग्नाच्या मंडपातच ऍड फिल्मसाठी कास्टिंग फायनल केलं.
तिथे मंडपातच करवली बनलेल्या जेनेलिया डिसुझा यांनी ऍड फिल्मचं मॉडेलिंग असाइनमेंट प्राप्त केलं. आता ऍड फिल्म्सच्या मेकर्स लोकांनी जेनेलिया डिसुझा यांना निवडलं होतं ते महानायक अमिताभ बच्चन यांच्या अपोझीट.
महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यासाठी कित्येक लोकं धडपड करत असतात, पण जेनेलिया डिसुझा यांना हि संधी चालून आली होती.
अमिताभ बच्चन यांच्यासोबत जेनेलिया डिसुझा यांची जी ऍड फिल्म होती ती होती पार्कर पेनची. बऱ्याच पिढ्या पार्कर पेनवर पोसल्या आहेत. पण इथं अजून एक ट्विस्ट होता कि कॉन्ट्रॅक्ट जेनेलियाने साइन केलं होतं पण दोन दिवसानंतर त्यांची परीक्षा होती. त्यामुळे जेनेलियाने या ऍडला नकार सुद्धा दिला होता. पण मेकर्स लोकांनी त्यांना कन्व्हिन्स करत करत शेवटी परत त्यांना ऍडमध्ये सामील करण्यात आलं.
अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या पार्कर पेनच्या या ऍडमध्ये जेनेलिया डिसुझा यांची बरीच वाहवा झाली. अमिताभ बच्चन सुद्धा जेनेलिया डिसुझा बद्दल म्हणाले होते कि ती एक चांगली अभिनेत्री आहे आणि तिचे एक्सप्रेशनसुद्धा एकदम सरळ आणि सहज होते. या ऍड फिल्मनंतर जेनेलियाला बऱ्याच ऍड फिल्म्स ऑफर झाल्या. या ऍडफिल्म्सचा जेनेलियाला खूप फायदा झाला.
यानंतर त्यांचा पहिला सिनेमा आला तुझे मेरी कसम…रितेश देशमुख या मराठमोळ्या हिरोबरोबर जेनेलियाची मोठ्या पडद्यावर एंट्री झाली. प्रेक्षकांनी या सिनेमाला प्रचंड प्रेम दिलं. तुझे मेरी कसम सिनेमाव्यतिरिक्त मस्ती, मेरे बाप पहले आप, जाने तू ये जाने ना, लाईफ पार्टनर, चांस पे डान्स, फोर्स अशा सिनेमात काम केलं. तेलगू आणि तामिळ सिनेमांमध्येही जेनेलिया डिसुझाने काम केलेलं.
रितेश देशमुखसोबत लै भारी सिनेमातल्या एका गाण्यावर सुद्धा या दोघांनी एकत्र डान्स केला होता. जेनेलिया देशमुख आज घडीला निर्माता म्हणून काम करते. पार्कर पेनची जाहिरात आणि तुझे मेरी कसम या दोन्हींमधून जेनेलिया डिसुझाने आपली एक स्पेशल ओळख निर्माण केली होती.
हे हि वाच भिडू :
- मुख्यमंत्र्यांचा मुलाला गर्व असेल, असा समज जेनेलिया वहिनींनी रितेशबद्दल केला होता
- त्यादिवशी विलासराव रितेशला म्हणाले,”तू तुझ्या नावाची काळजी घे, मी माझ्या नावाची घेतो.”
- “तुझे मेरी कसम” ना थेटरातून उतरला, ना मनातून..!
- गोलमाल सिनेमानंतर गायब झालेले संजय मिश्रा रोहित शेट्टीला ढाब्यावर काम करताना सापडले