इनव्हेसमेंट बँकर गोल्डमॅन सॅकची नोकरी सोडून इडली विकतोय…

जगातील सगळ्यात प्रतिष्ठित आणि जुनी इन्व्हेन्समेंट फर्म असणाऱ्या गोल्डमॅन सॅक मध्ये नोकरी करण्याचे स्वप्न हे प्रत्येक इन्व्हेन्समेंट बँकरचे असते. पण इडली विकण्यासाठी जर कोणी गोल्डमॅन सॅक मधील नोकरी सोडली तर कोणालाही आश्चर्य होईल. 

बंगलोर मधील एका २९ वर्षीय तरुणाने इडली विकण्यासाठी गोल्डमॅन सॅकची नोकरी सोडली आहे. त्याचे नाव कृष्णन महादेवन आहे. 

नोकरीचा राजीनामा देऊन कृष्णन बंगलोर मधील विज्ञान नगर येथे इडली विकत आहेत. २००० साली त्यांच्या वडिलांची नोकरी गेल्याने त्यांनी इडलीसाठी लागणाऱ्या पिठाची विक्री करायचे. कृष्णन आणि त्यांची बहीण आपल्या वडिलांना मदत करत. त्यांच्या वडिलांनी केवळ पीठ न विकता इडली विकावी म्हणून लोकं आग्रह धरू लागले होते. 

त्यामुळे १ सप्टेंबर २००० रोजी ‘अय्यर इडली’ नावाने त्यांच्या वडिलांनी बेंगलोरच्या विज्ञान नगर येथे छोटे हॉटेल सुरु केले होते.

मात्र लोकांकडून अय्यर इडलीला म्हणावा तसा रिस्पॉन्स मिळत नव्हता.अय्यर इडली मध्ये काम करतच कृष्णन यांनी आपले पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर कृष्णन यांना जोसेफ कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये प्राध्यापक म्हणून जॉईन झाला होता.  

त्यानंतर साधारण २००५ मध्ये कृष्णन याने गोल्डमन सॅक मध्ये नोकरी लागली. त्यात इनव्हेसमेंट बँकिंग टीम जॉईन केली. सगळं काही सुरळीत सुरु असतांना २००९ मध्ये कृष्णनच्या वडिलांचे निधन झाले. सगळा व्यवसाय कृष्णन यांचे वडीलचं सांभाळायचे. 

वडिलांच्या निधनानंतर त्यांची आई अय्यर इडलीचा व्यवसाय सांभाळत होती. तर कृष्णन एकीकडे गोल्डमॅन सॅक मधील नोकरी आणि आईची मदत अशी दोन्हीकडे काम करण्याची कसरत करत होता. गोल्डमॅन सॅक मधील नोकरी सोडून पूर्णवेळ अय्यर इडली हॉटेल सांभाळावे अशी इच्छा कृष्णन यांनी आपल्या आईला बोलून दाखविली होती.

तू जर हे काम केलंस तर कुठली मुलगी तुझ्यासोबत लग्न करेल असा प्रश्न उपस्थित करत आईने विरोध केला होता. 

यामुळे गोल्डमॅन सॅक मधील नोकरी सांभाळत कृष्णन अय्यर इडली  हॉटेलचे काम करायचा. कृष्णनला  किती काम करावं लागत याची जाणीव लॉकडाऊन मध्ये त्यांचा आईला झाली. सुट्टी तर सोडा साधं जेवायला सुद्धा वेळ मिळत नसे. इतका वेळ काम करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय सांभाळावा असे बोलून दाखवत त्याला आईने नोकरी सोडण्यास सांगितले. 

२०२० मध्ये कृष्णन यांनी फुल्ल टाइम अय्यर इडलीचा व्यवसाय सांभाळायला सुरुवात केली. 

कृष्णन म्हणतात की, एवढी मोठी नोकरी सोडणे सोपं काम नव्हतं. अनेकांनी इडली विकण्यासाठी नोकरी सोडतोय का असे बोलून दाखविले होते. शेवट डिसेंबर २०२० मध्ये त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. 

गेली २० वर्ष अय्यर इडली मध्ये केवळ इडली चटणी विकली जाते. कृष्णन सांगतात की, लोकांना अय्यर मधील इडली चटणी एवढी आवडते. त्यासाठी ते काही किलोमीटर येऊन लाईन मध्ये उभे राहतात. गेल्या दोन वर्षांपासून इडली चटणी बरोबर वडा, कडी भात आणि केसरी भात मेन्यू ऍड करण्यात आला आहे. 

सकाळी साडेचार वाजता अय्यर इडली सुरु होते. ३० रुपयांमध्ये ३ इडली आणि चटणी मिळते. गेल्या ७ वर्षांपासून याच किंमतीत इडली मिळते. आई आणि मुलगा मिळवून दर महिन्याला ५० हजार पेक्षा इडली विकतात. सध्या कृष्णन सोबतीला ७ जण असून त्यांच्या माध्यमातून हे हॉटेल चालविले जाते.

दिवसाला ४०० पेक्षा जास्त लोकं इथं इडली खाऊन जातात. २० बाय १० एवढ्याशा जागेत हे हॉटेल आहे.  तर आता अय्यर इडलीची ओळख the idali king of banglore अशी  झाली आहे.     

   हे ही वाच भिडू    

Leave A Reply

Your email address will not be published.