milf xxx to love ru hentai. asian milf hot trio with pleasant babe.tamil sex

त्या वर्ल्डकप पासून इंझमामने ठरवलं कि वजन कमी करायच्या नादी लागायचं नाही..

इंझमाम उल हक पाकिस्तानच्या या एकेकाळच्या महान खेळाडूला हार्ट अटॅक येऊन गेला पण सुदैवाने त्यात तो बचावला. त्याच्या या घटनेने अनेकांच्या १९९२ च्या नंतर इंझमाम उल हक बद्दलच्या आठवणी जाग्या झाल्या. जेव्हा वजनवाढीवरून इंझमामला शेरे मिळायचे तेव्हाची हि गोष्ट.

पाकिस्तानच्या टॉपच्या क्रिकेटर्समध्ये इंझमाम उल हक हे नाव अगत्याने घेतलं जातं. जगभरातून इंझमामच्या क्रिकेटचं कौतुक केलं जायचं. पण खेळ कमी आणि वजनाच्या कारणावरून इंझमामला कायम ट्रोल केलं जायचं. बॉडी शेमिंगवरून इंझमामला जगभरातून बऱ्याचदा ट्रोल केलं गेलं. १९९२ च्या वर्ल्डकपला इंझमामची बॅटिंग बघून त्यानं शड्डू ठोकून बिगुल वाजवलं.

वर्ल्डकप झाल्यानंतर कालांतराने इंझमामचं वजन वाढू लागलं. या वजनवाढीमुळे विरोधी टीमचे खेळाडू आणि फॅन्स तर त्याला चिडवायचेच पण पाकिस्तानचे फॅन्ससुद्धा त्याची टर उडवायचे. एकदा का पीचवर इंझमाम स्थिरावला कि तो खुट्टा गाडून खेळायचा. एक एक दोन धावा काढण्याऐवजी तो चौकार षटकारांवर भर देत असे. स्लो रनिंगमुळे त्याला बऱ्याचदा चिडवलं जायचं. पण बाउंड्री मारून तो डॉट बॉलची कसर भरून काढत असायचा. 

डेब्यूच्या १० वर्षानंतर इंझमामला जाणवलं कि आता आपण वजन कमी केलं पाहिजे. मग काय गडी लागला कामाला. दिवसरात्र घाम गाळून तो स्वतःला नॉर्मल शेपमध्ये आणण्याचा प्रयत्न करू लागला. २००३ च्या वर्ल्डकपला एक वेगळा इंझमाम सगळ्यांना पाहायला मिळाला. टुर्नामेंटच्या अगोदर स्वतःवर भरपूर मेहनत इंझमामने घेतली होती.

यावर इंझमाम म्हणाला होता,

१९९२ च्या वर्ल्डकपवेळी मी जसा दिसत होतो एकदम पातळ आणि लाजरा बुजरा त्यासाठी मी या वर्ल्डकपच्या अगोदर स्वतःवर भरपूर काम केलेलं आहे. हा वर्ल्डकप फक्त माझ्यासाठी नाही तर १४ करोड पाकिस्तानच्या लोकांसाठी जिंकायचा आहे. मला विश्वास आहे कि यावेळी मला कोणी ट्रोल करणार नाही.

पण इतका सारा घाम गाळून काहीच फायदा झाला नाही उलट हे वजन घटवण्याचं प्रकरण इंझमामच्या अंगलट आलं आणि ते अपशकुन म्हणून चर्चिलं जाऊ लागलं. पाकिस्तानची टीम ग्रुप स्टेजसुद्धा पार करू शकली नाही. इंजमामने त्या वर्ल्डकपच्या ६ मॅचमध्ये फक्त १९ रन केले.

पाकिस्तानने त्या वर्ल्डकपमध्ये नेदरलँड आणि नामिबिया या दोनच संघाला हरवलं, बाकी भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड या संघाकडून त्यांना हार स्वीकारावी लागली. झिम्बाब्वे विरुद्धची मॅच ड्रॉ झाली. या टुर्नामेंटमध्ये २ झिरो इंझमामचे होते आणि ६ हा हायस्कोर त्याचा होता.

या इतक्या भयानक घटनेनंतर परत वजन कमी करण्याच्या गोष्टीवरून इंझमाम कुठंच बोलला नाही. २००६ सालच्या एका इंटरव्हिव्ह मध्ये इंझमाम सांगतो कि मी परत कधी वजन कमी करण्याच्या नादी लागणार नाही. वर्ल्डकपच्या अगोदर मी १७ किलो वजन कमी केलं होतं. १७ किलो म्हणजे माझ्यासाठी खूप मोठं टार्गेट होतं. १७ किलो कमी करूनही मला रन बनवता आले नाही त्यामुळे मला टेस्ट संघातही जागा मिळाली नाही.

वजन कमी करण्याच्या भानगडीत इंझमाम उल हक पडला आणि त्याचा परिमाण त्याच्या खेळण्यावर झाला. नंतर २००७ साली इंझमामने क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली. दुष्काळात तेरावा म्हणजे त्याच्या कॅप्टन्सी अंडर २००७ ला पाकिस्तान पहिल्याच राउंडला बाहेर फेकली गेली. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.

why not check here www.pornleader.net xxx sex vedios