आयपीएल ऑक्शन कसं पार पडतं ? मागच्या ऑक्शनमध्ये सर्वाधिक पैसे कोणाला मिळाले होते

कडक सूट, डोळ्यांवर चष्मा, हातात छोटी हातोडी आणि कानाला लय भारी वाटणारा आवाज. प्लेअर्सची नावं आणि कोटीत वाढत जाणारे आकडे. कितीही गर्दी असली, तरी प्रिती झिंटा, काव्या मारन, नीता अंबानी आणि शाहरुख खानच्या पोरावर फिरणारे कॅमेरे.

एखाद्या प्लेअरसाठी प्रचंड चढाओढ सुरू असताना, बाजी मारलेल्या फ्रँचाईजीच्या चेहऱ्यावरचं हसू. हे चित्र कुठं पाहायला मिळतं? तर आयपीएल ऑक्शनमध्ये.

सुरुवातीला प्लेअर्सवर बोली लागणार म्हणून तोंड वाकडं केलेले कार्यकर्ते आता ऑक्शनची आतुरतेनं वाट पाहत असतात. कुणाला किती पैसे मिळणार याच्या चर्चाही फार आधीपासून रंगतात. पण हे ऑक्शन होतं कसं हा प्रश्नही अनेकांना पडतो.

ऑक्शनमध्ये प्लेअर्स कसे येतात? त्यांची नावं आणि बेस प्राईज फायनल कोण करतं? ऑक्शन घेणारे कोण असतात? प्लेअर्सला नक्की किती पैसे मिळतात? आणि सर्वाधिक मालामाल झालेले प्लेअर्स कोणते? हे पाहुयात .

२०२३ च्या आयपीएल ऑक्शनसाठी ९९१ क्रिकेटरने रजिस्टर केलं होत. यानंतर ४०५ क्रिकेटरचे नाव शॉर्टलिस्ट केलं गेलं. यातील २७३ हे भारतीय आहेत तर १३२

प्लेअर्स ऑक्शनसाठी निवड कशी होते?

तर खेळाडू ज्या राज्यातले असतात त्या स्टेट क्रिकेट असोसिएशनद्वारे ऑक्शनमध्ये सहभागी होण्यासाठी फॉर्म दिले जातात. इच्छुक खेळाडू हे फॉर्म भरतात आणि त्यानंतर बीसीसीआय आणि फ्रँचाईजी मिळून खेळाडूंची नावं शॉर्टलिस्ट करतात.

ऑक्शनमध्ये सहभागी झालेले खेळाडू स्वतः आपली बेस प्राईज ठरवतात. जी २० लाखांपासून २ कोटी रुपयांपर्यंत असते. या बेस प्राईजपासून खेळाडूंचा लिलाव सुरू होतो. उदाहरणार्थ, श्रेयस अय्यरची बेस प्राईज २ कोटी असेल, तर त्याच्यावर लागणारी बोली २ कोटींपासून सुरू होईल.

महत्वाचं म्हणजे आयपीएलच्या १० टिमने १६३ प्लेअर्स रिटेन केले आहेत.

यामुळे जास्तीत जास्त ८७ प्लेअर्स बोली लागणीची शक्यता आहे. यंदा संघमालकांना २०६.५ कोटी रुपयापर्यंत खर्च करायचं बंधन आहे. यातील केकेआर जवळ ७ कोटी आहेत. त्यांच्याकडे सध्या १४ खेळाडू आहेत. त्यांना ५ ते ६ प्लेअर्स घ्यावे लागणार आहे.

प्लेअरच्या फॉर्मनुसार त्याच्याकडे जाहिरातींचे करारही असतात, त्यामुळे त्याचे पैसे वेगळे. समजा एखाद्या प्लेअरला टीममध्ये घेतलं, पण एकही मॅच खेळवलं नाही, तरीही त्याला ऑक्शनमधली किंमत आणि अलाउन्सेस मिळतात.

दुखापतीमुळे तो एकही सामना खेळू शकला नाही, तर मात्र त्याला ऑक्शनमध्ये जाहीर झालेली रक्कम मिळत नाही. पण जे प्लेअर्स आयपीएल खेळतात त्यांची बऱ्यापैकी चांदी होते, हे मात्र नक्की.

आयपीएलचं ऑक्शन म्हणलं की, दोन लोकांची हमखास आठवण येते. ज्यांच्या लय भारी आवाजात हे ऑक्शन होतं, ते रिचर्ड मॅडली आणि ह्यू एडमिड्स. आयपीएलच्या पहिल्या सिझनपासून मॅडली यांनी आयपीएल ऑक्शनची कमान सांभाळली. हॅमरमॅन या नावानं प्रसिद्ध असलेल्या मॅडली यांनी लंडन ऑक्शन हाऊसमध्ये फारशी पुसणारा मुलगा म्हणून कामाची सुरुवात केली आणि पूढे जाऊन जगभरातल्या अनेक ऑक्शन्स गाजवल्या.

ते हॉकी आणि क्रिकेटही खेळले पण त्यांची मेन ओळख बनली ती आयपीएलमुळे, २००८ ते २०१८ या काळातल्या आयपीएल ऑक्शन्स मॅडली यांच्या आवाजातच पार पडल्या. त्यांची लोकप्रियता इतकी आहे, की चेन्नईत एका भुयाराचं नाव त्यांच्या नावावरुन ठेवण्यात आलंय.

मॅडली यांच्यानंतर ही जबाबदारी ह्यू एडमिड्स सांभाळतायत. ऑक्शन इंडस्ट्रीमध्ये एडमिड्स यांची जबरदस्त हवा आहे. फक्त क्रिकेटच नाही, तर कला, चित्रपट यांच्याशी संबंधित गोष्टींचाही ते लिलाव करतात. यंदाच्या ऑक्शनमध्येही त्यांच्याच आवाजाची जादू पाहायला मिळणार आहे.

आता येऊयात आयपीएल ऑक्शनमध्ये मालामाल झालेल्या प्लेअर्सकडे. गेल्यावर्षी मुंबई इंडियन्स ने इशांत किशनसाठी १५.२५ कोटी दिले होते, ती आतापर्यंतची सर्वाधिक बोली होती. त्याचा खालोखाल दीपक चहरला चैन्नईने १४ कोटी दिले,  कोलकाता नाईट राइडर्सने श्रेयस अय्यर १२.२५ कोटी,  पंजाब किंग्सने लियाम लिविंग्स्टन ११.५० कोटी दिले होते. दिल्ली कैपिटल्सने शार्दुल ठाकुर १०.७५ कोटी, रॉयल चैलेंजर्स बैंगलोरने वनिंदु हसरंगाला  १०.७५ कोटी दिले होते.  

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.