आयर्नमॅन ते अल्ट्रॉमॅन कृष्णप्रकाश यांची ऐतिहासिक कामगिरी –

पाठीमागच्या वर्षी आयर्नमॅन किताब घेवून कृष्णप्रकाश यांनी नावलौकिक प्राप्त केला होता. यावर्षी अल्ट्रामॅन पुरस्कार घेवून कृष्णप्रकाश यांनी इतिहास रचला आहे. इतिहास असा की आयर्नमॅन आणि अल्ट्रामॅन किताब प्राप्त करणारे ते देशातील एकमेव अधिकारी ठरले आहेत. 

 

नेमका आयर्नमॅन आणि अल्ट्रामॅन किताब आहे तरी काय ? 

आयर्नमॅन चोवीस तासांची स्पर्धा असते. यात १६ तासांमध्ये ३,८६ किलोमीटर पोहणं, १८०.२० किलोमीटर सायकल चालवणं आणि ४२.२० किलोमीटर धावावं लागतं. या तिन्ही गोष्टी एका दिवसात पुर्ण करायच्या असतात. मागच्या वर्षी फ्रान्समध्ये झालेल्या या स्पर्धेत कृष्णप्रकाश यांनी हा टास्क अवघ्या १४ तास ८ मिनटांमध्ये पुर्ण केला होता. 

याउलट अल्ट्रामॅन स्पर्धा तीन दिवसांची असते आयर्नमॅन हून अधिक कठिण स्पर्धा म्हणून अल्ट्रामॅन स्पर्धेचा उल्लेख केला जातो. यामध्ये पहिल्या दिवशी १२ तासांमध्ये १० किलोमिटर पोहणे, १४६ किलोमीटर सायकल चालवणं दूसऱ्या दिवशी १२ तासांमध्ये २७५ किलोमीटर सायकल चालवणं आणि तिसऱ्या दिवशी ८४.३० किलोमीटर धावावं लागतं. या तिन्ही गोष्टी सलग पुर्ण केल्या की अल्ट्रामॅन किताब दिला जातो.  

33398280 1688577201236353 3000433869171195904 n

कृष्णप्रकाश यांनी हा किताब मिळवण्यासाठी काय केल ? 

गेल्या वर्षींच्या ऑगस्ट महिन्यात कृष्णप्रकाश यांनी आयर्नमॅनचा किताब मिळवला होता. त्यानंतरच काहीतरी अजून मोठ्ठ करायचा त्यांनी निर्धार केला. किताब मिळाल्यानंतर त्यांनी नोव्हेंबर महिन्यात आयोजित केलेल्या मुंबई गोवा सायकल स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेदरम्यान त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या एका गाडीची जोरदार धडक त्यांना बसली. खांद्याच्या हाडांबरोबरच शरिराच्या इतर भागाला देखील मोठ्या प्रमाणात मार बसला. डॉक्टरांनी त्यांना पुढच्या पाच ते सहा महिन्यात कोणत्याही स्पर्धांमध्ये सहभाग न घेण्याचा सल्ला दिला. 

याच काळात त्यांना अल्ट्रॉमॅनच्या स्पर्धेबाबत कळलं. या स्पर्धा जिंकण्याची उर्मी त्यांना स्वस्थ बसून देत नव्हती. ते या स्पर्धांची माहिती घेवू लागले. अल्ट्रामॅन किताब देखील पटकवायचा या हेतून त्यांनी रोज सकाळी धावण्याची प्रॅक्टिस करण्याचा निर्णय घेतला. मात्र हे सगळं करत असताना दुखापतीच्या कारणानं आपण हे करु शकू की नाही याबाबत त्यांच्या मनात शंका निर्माण होत होत्या. 

अहमदनगरच्या स्पर्धांमधून कॉन्फिडन्स आला.

दरम्यानच्या काळात कृष्णप्रकाश यांना अहमदनगर येथे आयोजित केलेल्या सायकल स्पर्धांच निमंत्रण आलं. त्यांनी आयोजकांना सांगितलं की, मी फक्त उद्घाटनच करणार नाही तर या स्पर्धांमध्ये सहभागी देखील होणार आहे. ते १०० किलोमीटरच्या या स्पर्धांमध्ये सहभागी झाले आणि चौथा नंबर मिळवला. इथेच त्यांनी अल्ट्रामॅन किताबाच्या दिशेनं एक पाऊल टाकलं. 

Master 2
अहमदाबाद मिरर

रात्री दिड ते सकाळी ८ रोज ४० किलोमीटर धावायचे –  

नोकरीच्या जबाबदारीतून रोज धावण्याचं प्रक्टिस करणं कृष्णप्रकाश यांच्यासाठी सर्वात कठिण काम होतं. या कामात इन्स्पेक्टर सुनिल लाहगुडे त्यांच्या कामी आले. सुनिल लाईगुडे यांनी आफ्रिकेत भरणारी डब्बल मॅरेथान पुर्ण केली आहे. हि मॅरेथॉन तब्बल ८९ किलोमीटरची असते. कृष्णप्रकाश दररोज चाळीस किलोमीटर धावू लागले. यातच सायकलिंगचा  सराव करणं देखील महत्वाचं असल्यानं कधी नाशिक तर कधी पुणे असा सायकलप्रवास त्यांनी चालू केला. 

आस्ट्रेलियातील अल्ट्रॉमॅन स्पर्धेत सहभाग –  

इतक्या प्रॅक्टिस नंतर वेळ आली ती प्रत्यक्ष सहभागी होण्याची. या स्पर्धांसाठी सायकल डोंगरदऱ्यांमधून चालवावी लागते त्यासाठी त्यांनी मित्राकडून सात लाखांची सायकल मागून घेतली. स्वत:ची सायकल नसल्याने अनेक अडथळे येत गेले. स्पर्धेदरम्यान त्यांना पुन्हा अपघाताचा सामना करावा लागला. यात त्यांच्या अंगठ्याचे हाड मोडले. सायकलचे ब्रेक आणि गियर देखील मोडले. अशा परस्थितीत देखील त्यांनी पंधरा किलोमीटरचं राहिलेलं अंतर पार करत हा किताब पटकवला. या दरम्यान त्यांनी केलेल्या काही कवितेचे चार शब्द. 

“कभी न हो लक्ष्य ओझल कभी न हो मन ये बोझल 

आने दो आंधिओं के झंझावात दो-दो हाथ खेलेंगे”

Leave A Reply

Your email address will not be published.