कानपुरमधली मॅच संपल्यावर अधिकाऱ्यानं केलेलं काम पाहून तुम्हीही त्यांना सॅल्यूट करालं

पोलीस अधिकारी आणि जवान पाहिले कि आपल्याला एकदम कसं  प्राऊड फील झाल्यासारखं वाटत. म्हणजे आपोआप आपली छाती ५६ इंच फुगल्या सारखी वाटते. अनेकांना त्यांची आदरयुक्त भीती असते तर काहींसाठी भीतीयुक्त आदर. पण कारण काहीका असेना मनातून फुल रिस्पेक्ट येतोचं येतो. आपल्या कामातून ते लोकांसाठी नेहमीच एक आदर्श बनून समोर येतात. आता असेच एक पोलीस अधिकारी समोर आलेत. ज्यांनी आपल्या कामामुळे भल्याभल्याना सॅल्यूट करायला भाग पाडलंय.

तर झालं असं कि, सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान पहिला कसोटी सामना खेळला जातोय. कानपूरच्या ग्रीन स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. अश्यात कसोटीच्या पाहिल्यात डावात भारताने ३४५ धावा बनवलेत. यांनतर न्यूझीलंडचा डाव सुरु झाला. न्यूझीलंडच्या विल यंग आणि टॉम लॅथम यांनी जबरदस्त सुरुवात केली आणि भारतावर प्रेशर टाकलंय. त्यामुळे या सामन्याची मोठी चर्चा होतेय.

आता हा सामना धावा आणि खेळाडूंसोबतचं आणखी दोन कारणामुळे चर्चेत आला. त्यातलचं पाहिलं म्हणजे ‘गुटखा मॅन’ दुसरं म्हणजे आयपीएस अधिकारी असीम अरुण. आता गुटखा मॅनविषयी आपण आधीच स्टोरी केलीये. जी वाचायची असले तर या स्टोरीच्या खाली लिंक दिलीये, त्यावर क्लिक करायचं भिडू.

तर, असीम अरुण यांची सध्या मोठी चर्चा होतेय. त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय. ज्यात ते कचरा उचलताना पहिले जाऊ शकतात. हा कचरा म्हणजे कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर मॅच पाहायला आलेल्या लोकांनी खायला आणलेल्या गोष्टी खाऊन झाल्यावर बसल्या जागीच टाकलेला कचरा. मॅच संपल्यानंतर प्रेक्षक कचरा तिथेच टाकून निघून गेले.

त्यांनतर आयपीएस अधिकारी असीम अरुण यांनी स्वछ्तेबाबत आपली जबाबदारी म्ह्णून स्वतः स्टेडियममधला तो कचरा उचलू लागले. यावेळी कचरा उचलतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

 

आता असीम अरुण यांच्याबद्दल अनेकांना माहित असेल किंवा त्यांच्याबद्दल वाचले असेल. ते १९९४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सुरक्षा दलात सुद्धा त्यांचा समावेश होता. लखनऊच्या ठाकूरगंज परिसरात लपलेल्या संशयित सैफुल्लाला २०१७ मध्ये ज्या एटीएस टीमने ठार केले होते. त्या टीमला असीम लीड करत होते. सैफुल्ला मध्य प्रदेशातील रेल्वे ब्लास्टशी संबंधित असल्याचे म्हंटले जात होते. 

महत्वाचं म्हणजे  देशातील पहिली Special Weapons And Tactics अर्थात SWAT टीम तयार करण्यामागे असीम यांचीच भूमिका आहे.  SWAT ची रचना प्रामुख्याने शहरात होणाऱ्या हायरिस्क वाल्या घटना जसे कि, किडनॅपिंग, अचानक गोळीबार यासारख्या उच्च-जोखमीच्या घटनांना सामोरे जाण्यासाठी करण्यात आली.

अशा परिस्थितीत, टीम सब्जेक्ट कंट्रोल, गोळीबार करताना दोन्ही डोळे उघडे ठेवणे, टार्गेटची कमजोरी ओळखणं, फायर आर्म टॅक्टिक्स, डबल टॅप  म्हणजेच दोनदा गोळी मारणे कव्हर फायर आणि जखमी झालेल्या आपल्या सहकार्यांना वाचवणे, मानवी हक्कांची काळजी घेणे या सगळ्याच गोष्टी ध्यानात ठेवाव्या लागतात.

SWAT टीम सदस्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाते. दिल्लीत झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुरक्षेची जबाबदारी स्वीकारणाऱ्या SWAT टीमला असीम अरुण यांच्या SWAT टीमनेचं प्रशिक्षण दिले होते.

असीम अरुण म्हणाले होते कि,  या स्पेशली ट्रेन्ड पोलिसांसाठी (SWAT) कमांडो हा शब्द वापरला जाणार नाही, कारण कमांडो हा शब्द आता सर्व प्रकारच्या पोलिसांसाठी वापरला जात आहे. आणि SWAT चे फायटर्स फक्त उच्च जोखमीच्या ऑपरेशन्ससाठी तयार केलेले आहे. त्यांना व्हीआयपी सुरक्षेत ठेवले जाणार नाही. त्यांना कमांडो नव्हे तर फायटर्स म्हटले जाईल.

असीम अरुण यांच्या या व्हायरल व्हिडिओवर युजर्स त्यांना सॅल्यूटचे सिम्बॉल टाकून अभिमानस्पद असल्याचे म्हणत आहेत. आपली एवढी प्रशंसा होतेय हे समजल्यावर अरुण यांनी स्वतः एक पोस्ट शेअर केली. ज्यात ते म्हणतात,

“ग्रीन पार्क उद्या पुन्हा चमकेल. असं बऱ्याचदा ऐकलं आणि वाचलंय कि, काही देशांचे लोक तिथले स्टेडियम स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करतात. आपणही असच काही केलं पाहिजे का ?’

हे ही वाचं  भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.