प्रफुल्ल पटेल ‘त्या’ व्यवहारांमुळे पुन्हा अडचणीत, कोण आहे हा इक्बाल मिर्ची ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल हे पुन्हा ईडीच्या कचाट्यात सापडले आहेत. त्यांच्या एका जुन्याच व्यवहारांमुळे ते पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण होतांना दिसत आहे. कारण आज त्यांना माध्यमांनी  ईडी च्या कार्यालयात जाताना दिसले आहेत. ईडीची आणखी मोठी कारवाई म्हणजे पटेल यांची काही प्रॉपर्टी ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.

गँगस्टर इक्बाल मिर्ची याच्यासोबत केलेल्या आर्थिक व्यवहारांच्या संबंधित ते चर्चेत आले होते.

नेमकं प्रकरण काय आहे ?

२०१९ मध्ये महाराष्ट्र विधासभेच्या निवडणुकीपूर्वी काही निवडक नेत्यांना ईडीने नोटीस बजावली होती. त्या नेत्यांमध्ये प्रफुल्ल पटेल, राज ठाकरे यांचा देखील समावेश होता. मुंबईमध्ये वरळी येथे एका इमारतीच्या बांधकामामुळे प्रफुल पटेल यांना या कारवाई साठी सामोरे जावे लागले होते. वरळीला सी.जे हाऊस नावाची मोठी बिल्डींग आहे. या इमारतीच्या बांधकामाआधी त्या जागेवर एक जुनी बिल्डींग होती जी गँगस्टर इक्बाल मिर्ची याच्या मालकीची असल्याची माहिती समोर आली होती.

या जुन्या बिल्डींगचं रीकन्स्ट्रक्शन प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीने केलं होतं.

तर याबद्दल चे व्यवहार असे झाले होते कि, प्रफुल पटेल यांनी इक्बाल मिर्चीच्या बिल्डींगचं रीकन्स्ट्रक्शन करायचं आणि त्याची मालकी घ्यायची. त्याबदल्यात  प्रफुल्ल पटेल यांनी इक्बाल मिर्चीच्या कुटुंबियांना एका ठिकाणची जागा आणि रोख रक्कम द्यायची. हि दिल कम्प्लीट झाली देखील मात्र या व्यवहारात काहीतरी गैरप्रकार झालाचा ईडीला संशय आहे.

त्या संशयाच्या आधारे ईडीने प्रफुल पटेल यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता.

जेंव्हा याबाबत प्रफुल्ल पटेल याचं नाव समोर आलं आणि त्यावेळी प्रफुल्ल यांनी हे व्यवहार खरे असल्याचं प्रसारमाध्यमांसमोर कबूल केलं होतं. ते बोलले कि, 

“हो मी मिर्ची परिवारासोबत आर्थिक व्यवहार केला. मी काहीही चुकीचे केलेले नाही. हा जो काही व्यवहार झाला तो कायदेशीररित्या झाला”,

प्रफुल पटेल आणि इक्बाल मिर्ची यांच्यामध्ये झालेल्या व्यवहारांची सगळी कागदपत्रे पब्लिक डोमेनमध्ये आहेत. आमच्या दोघांमध्ये झालेला व्यवहार हा कोणत्याही स्वरुपात अवैध नसून कोर्टाच्या आदेशानुसार ती जागा मिळाली आहे असं पटेल यांनी सांगितलं आहे. बाकी इक्बाल मिर्ची यांच्या प्रॉपर्टीशी माझा आणि माझ्या कंपनीचा काहीही सबंध नाही.

“इक्बाल मिर्ची हे भारताचे नागरिक असून, ते नियमित टॅक्स भरतात. मी २००७  मध्ये सगळी पार्श्वभूमी तपासून त्यांच्याबरोबर व्यवहार केला मात्र कोणत्याही कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची खात्री केली आणि मगच कागदपत्रांवर सह्या केल्या होत्या. त्यामुळे हा गैरव्यवहार ठरत नाही असंही त्यांनी माध्यमांना सांगितलं आहे.

इक्बाल मिर्ची कोण आहे ?

इक्बाल मिर्ची हा भारताचा नागरिक असून कथित अंडरवर्ल्ड होता. इक्बाल मिर्चीचे काही वर्षांपूर्वी  लंडनमध्ये निधन झाले होते. १९८६ मध्ये पहिल्यांदाच इक्बाल मिर्चीला ठाणे येथील फार्म हाऊसमधून ९  कोटी रुपये किमतीच्या ६०० किलो हेरॉईनसह महसूल गुप्तचर विभागाने पकडले होते. पण त्यातून तो सहीसलामत सुटला.

इक्बाल मिर्ची हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा राईट हॅन्ड होता. 

१९९३ नंतर तो भारताबाहेर पळून गेला.  इंटरपोलने १९९५ मध्ये लंडनमध्ये त्याला अटक केली होती पण ब्रिटनमध्ये ठोस पुराव्याअभावी त्याची  निर्दोष मुक्तता केली आली. त्यानंतर २००१ मध्ये त्याला तेथे राहण्याचा परवानाही मिळाला होता. पण त्याने भारतात असतांना वरळी एका ट्रस्टच्या तीन बिल्डींग  केल्या होत्या. त्या ट्रस्टच्याकडून खरेदी केल्या तरी त्याने बिल्डींगवर स्वतःची मालकी न दाखवता बराच काळा पैसा कमवला होता. असा ईडीचा आरोप आहे.

घटनेतील नव्या कायद्यानुसार, १०० कोटी रुपयांहून जास्त मोठा आर्थिक गुन्हा करून आरोपी देशाबाहेर पसार झाला असला तर आणि खटल्याला सामोरे जाण्यास नकार देत असेल तर त्याला परागंदा आर्थिक गुन्हेगार घोषित करून त्याची संपत्ती जप्त करण्याची कारवाई सुरू होते. जी इक्बाल मिर्ची ला त्याच्या कुटुंबाला देखील परागंदा आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केले आहे.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.