इराणचा कसाई तिथली राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकायच्या तयारीत आहे…

इराणमध्ये येत्या १८ जुनला राष्ट्रपती पदासाठी  निवडणुक होणार आहे. ज्यात ७ उमेदवारांना आपलं नशीब आजमावण्याची संधी देण्यात आलीये.  या उमेदवारांपैकी पाच जण ‘कट्टरपंथी’ तर बाकीचे  दोन ‘उदारमतवादी’ आहेत. निवडणुकीत जिंकणारा उमेदवार  सध्याचे राष्ट्रपती  हसन रुहानी यांच्या जागी ऑगस्टमध्ये  पदभार स्वीकारेल.

दरम्यान, निवणुकीत शेकडो लोकांनी उमेदवारी अर्ज  दाखल केला होता. पण, गार्डियन काउंसिलने निवडणुकीच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवणारी संस्था गार्डियन काउंसिलने अपात्र म्हणून इतरांना डावलले. या सात जणांमध्ये मिलिट्री मॅन  मोहसिन रेजाई, जुन्या पिढीचे नेते साईड जलिली, सुधारवादी मोहसीन मेहरालीजादेह, अब्दुल नासिर हिमती, कट्टर धर्मगुरू इब्राहिम रईसी, कट्टरपंथी खासदार अमीर हुसेन हाशमी, अली रजा जकानी यांचा समावेश आहे. 

मात्र, या सगळ्या उमेदवारांत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कट्टर धर्मगुरू इब्राहिम रईसी यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय. जे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामनेई  यांच्या आवडते आहेत. संसदेच्या संशोधन केंद्राचे प्रमुख अलीरेजा जकानी हे राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्याने इब्राहिम रईसी  यांची उमेदवार आणखीनच मजबूत झालीये.  पण रईसी यांना अत्यंत क्रूर स्वभावाचं मानलं जात, अश्यात राष्ट्रपतीच्या खुर्चीवर बसल्यानंतर त्यांचं आणखी भयानक रूप पाहायला मिळायची शक्यता  आहे.

गर्भवती महिलांवर अत्याचार 

कट्टरपंथी धर्मगुरू इब्राहिम रईसीने  क्रूरतेच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्यात. त्याच्या मनात येईल असे वाट्टेल ते आदेश तो सोडतो. कधी  कैद्यांना डोंगरावरुनच फेकायला लावतो तर कधी  निर्दोष लोकांना विजेच्या तारांनी मारहाण करतो. यात तो  महिलांची सुद्धा गय  करत नाही.  काही वर्षांपूवी त्याने गर्भवती महिलांवर अत्याचाराचे आदेश दिले होते.

यातलीच एक पीडिता फरिद गौदरझीने एका वृत्तसंस्थेला आपल्यासोबत झालेल्या क्रूरतेची माहिती देताना सांगितलं कि, ती आठ महिन्यांची गरोदर होती, तेव्हा इराणच्या अधिकाऱ्यांनी तिला  PMOI च्या समर्थनाच्या आरोपात अटक केली होती. यादरम्यान तिच्यावर अनेकवेळा अत्याचार काण्यात आले.  त्यावेळी ती फक्त २१ वर्षाची होती. कोर्टात जेव्हा तिला फरफट नेत होते त्यावेळीच तिने इब्राहिमला पहिल्यांदा पाहिलं होत.

फरीदने संगितलं कि,  तिला कोर्टच्या बेसमेंटमध्ये बनवलेल्या टॉर्चर रूममध्ये नेण्यात आलं होत. जिथल्या भिंती रक्तानं माखला होत्या. ती गरोदर आहे, हे माहित असूनही तिच्यावर  दररोज अत्याचार केले जात होते.  फरीदच्या नवरा आणि भावाला सुद्धा पोलिसांनी एक केलं होत, ज्यांना नंतर फाशीवर लटकवण्यात आलं. फरीदा इब्राहिम रईसीला कसाई म्हणते, तिच्यामते रईसी राष्ट्रपती बनला तर इराणमध्ये मानवाधिकार उल्लंघनाच्या घटनांमध्ये वाढ होईल.

१९८८ सालच्या हत्याकांडाशी संबंध 

१९८८ सालच्या इराणमधल्या  हत्याकांडाच्या  निर्णयाशीही रईसीचा संबंध असल्याच म्हंटल जातंय, ज्यात त्यानं महत्वाची भूमिका साकारली होती.  १९८० मध्ये वयाच्या २० व्या वर्षी रईसीला तेहरानच्या पश्चिमेस कारजच्या क्रांतिकारक कोर्टाचे वकील म्हणून नियुक्त केले  होते आणि १९८८ मध्ये त्याला प्रमोट करून  डेप्युटी प्रॉसिक्युटर बनवलं गेलं होत.

त्यानंतर त्याला चार सदस्यीय समितीचा सदस्य बनविण्यात आलं. ज्यांच्यावर   इराणच्या पीपल्स मोझाहेडिन ऑर्गनायझेशन (पीएमओआय) च्या कैदेत असलेल्या कार्यकर्त्यांना ठार मारण्याची जबाबदारी सोपवली होती. ज्याअंतर्गत काही महिन्यांच्या कालावधीत इराणच्या कारागृहात बंदिस्त सुमारे ३० हजार लोकांवर गोळ्या झाडून ठार मारण्यात आले, ज्यात महिला आणि मुलांचा सुद्धा  समावेश होता. या प्रकरणानंतर  इराणला जगभरातून टीकेला सामोरं जावं लागलं होत. 

असं असलं तरी राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत त्याच नाव आघाडीवर आहे. त्यात न्यायपालिकेचे प्रमुख अयातुल्ला अली खामनेई यांच्यासोबतच्या चांगल्या संबंधांमुळे इराणमध्ये  रईसीचा चांगलाच दबदबा आहे. काही लोक तर असेही म्हणतात कि, सुप्रीम लीडर खामनेई यांचा पुढचा वारसही तोच असेल.  दुसरीकडे,   मानवाधिकार कार्यकर्तेसुद्धा हेच म्हणतायेत कि,  रईसी देशाचा राष्ट्रपती झाल्यावर परिस्थिती आणखी बिघडेल.
 

रईसीचं जिंकणार असं का म्हटलं जातंय?

दरम्यान  इब्राहिम रईसीनं याआधीही  २०१७ मध्ये   हसन रूहानी विरुद्ध निवडणूक लढविली होती , ज्यात  त्याचा पराभव झाला होता. त्या निवडणुकीत रूहानी यांनी इशारा दिला होता  की,  जर रईसी निवडणूक जिंकला, तर इराणींवर  कट्टरपंथी इस्लामिक निर्बंध लादले जातील.  या निवडणुकीत सर्वात कट्टरपंथी उमेदवार असल्याने त्याला सर्वात लोकप्रिय म्हंटलं जातंय. हा इशारा यावरूनही समजतोय कि, गार्जियन काउंसिलनं  पहिल्यांदा मोठ्या संख्येने सुधारवादी उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई केलीये.

इराणची निवडणूक प्रक्रिया

इराणमध्ये दर चार वर्षांनी फ्रेंच निवडणूक प्रणालीच्या धर्तीवर निवडणुका घेतल्या जातात. मतदानाच्या पहिल्या टप्प्यात कोणत्याही उमेदवाराला ५० % पेक्षा जास्त वोटिंग  मिळाली नाहीत तर दुसर्‍या टप्प्यात सगळ्यात जास्त वोट मिळवणाऱ्या दोन उमेदवारांसाठी वोटिंग केलं  जात.  सध्या राष्ट्रपती हसन रूहानी २०१७ मध्ये दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर आपला दुसरा कार्यकाळ संपवत आहे. त्यामुळं तिथल्या संविधानानुसार ते तिसऱ्यांदा  निवडणूक लढवू शकत नाही.

 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.