कित्येक शहरांच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त मुडदे या कब्रस्थानात दफन आहेत…

जगभरात अनेक नवनवीन गोष्टी असतात ज्या आपल्याला माहिती नसतात किंवा आपण त्या पर्यंत पोहचलेलो नसतो. स्मशान म्हटल्यावर जळणारी प्रेतं, तिथलं भयावह वातावरण डोळ्यासमोर येतं. असही आपल्याकडं स्मशान हे गावाच्या बाहेरच बांधलेलं असतं. त्यातही भरीस भर म्हणून भुतांची जोड त्याला दिलेली असते. पण आजचा किस्सा आहे जगातल्या सगळ्यात मोठ्या कब्रिस्तानचा. तर जाणून घेऊया जगातल्या सगळ्यात मोठ्या कब्रिस्तानबद्दल.

इराकच्या नजफ प्रदेशात जगातील सगळ्यात मोठी स्मशानभूमी/कब्रिस्तान आहे. ज्याला वादी-अस-सलाम सुद्धा म्हटलं जातं. ज्याचा अर्थ आहे वॅली ऑफ पीस. आता जगातलं सगळ्यात मोठं कब्रिस्तान म्हणल्यावर त्याची जागा किती मोठी असेल याची आपण कल्पना करू शकतो. १ हजार ४८५ एकरात हे कब्रिस्तान पसरलेलं आहे.

या जागेत शिया इमाम आणि चौथे खलिफा इमाम अली इब्न अबी तालिब यांची दर्गा सुद्धा आहे. सगळ्या कब्र या दगड आणि मातीने तयार करण्यात आलेल्या आहेत आणि यात सिमेंट वापरण्यात आलेलं नाही. वादी-अस-सलाम कब्रिस्तान हे जगातलं सगळ्यात प्राचीन कब्रिस्तान मानलं जातं. या ठिकाणी लोकांना दफन करण्याचं काम सुमारे १४०० वर्षांपासून सुरु आहे.

हे कब्रिस्तान शिया मुस्लिम लोकांमध्ये जास्त प्रसिद्ध आहे. असं बोललं जातं कि जगभरातले शिया लोकं स्वतःला या ठिकाणी दफन करण्यास जास्त भाग्याचं मानतात. या कब्रिस्तानात दररोज जवळपास २०० प्रेतांना दफन केलं जातं. एका जागतिक रिपोर्टच्या अनुसार आयएसआयएसच्या आतंकागोदर या ठिकाणी १००-१५० लोकांचे मृतदेह दफन केले जायचे. पण पुढे हि संख्या वाढत गेली.

या कब्रिस्तानमध्ये एक मकबरा सुद्धा बांधण्यात आलेला आहे. या मकबऱ्याबद्दल आख्यायिका आहे कि आयएसआयएसच्या विरोधात लढणारे लोकं या मकबऱ्यात येऊन मन्नत मागतात कि जर त्यांना मरण आलं तर त्यांचा दफनविधी या कब्रिस्तानात होवो. युनेस्कोने या कब्रिस्तानाची नोंद वर्ल्ड हेरिटेजमध्ये केलेली आहे.

या कब्रिस्तानाची लांबी जास्त असल्याने एका जागेतून दुसरीकडे जायचं असल्यास कब्रिस्तानमध्ये रस्ते बनवण्यात आलेले आहेत. दररोज या कब्रिस्तानात गर्दी असते, अनेक लोकं भेट द्यायलासुद्धा या ठिकाणी येतात. किंवा ज्या लोकांना दफन केलेलं आहे अशा लोकांच्या आठवणी जाग्या करण्यासाठी सुद्धा लोक इथे येतात.

या भागात राहणाऱ्या लोकांची मान्यता आहे कि इथे दफन झालेला प्रत्येक माणूस त्याच्या जवळच्या लोकांच्या हृदयात कायम जिवंत असतो. इतकी मोठी जागा असल्याने लोकांची गर्दी होणे स्वाभाविकच आहे. त्यामुळे इथे कायम  पोलीस फौज तैनात असते. आजवर जवळपास या स्मशानात ५ मिलियनहून अधिक लोकांना दफन करण्यात आलेलं आहे.

इराकच्या नजफ भागात असलेल्या कब्रिस्तानला पवित्र मानण्यात येतं. इथे कायम लोकांची रेलचेल असते. इथल्या मकबऱ्याला भेटी असो किंवा दफन झालेल्या लोकांच्या कबरीला भेट देणे असो अशा सगळ्या प्रकारामुळे शिया मुस्लिम लोकांसाठी हे कब्रिस्तान पवित्र आणि उच्च दर्जाचे मानले जाते.

युनेस्कोने वॅली ऑफ पीस घोषित करुन इराकच्या या कब्रिस्तानला जगभरात प्रसिद्ध केलं होतं.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.