स्त्रीची कामेच्छा पुरुषाच्या दसपट असते का ?

आपल्या देशात समाजात ‘सेक्स’ हा शब्दच उच्चारणचं मुळी निषिद्ध आहे. पण कसं असतंय ना भिडू, जे निषिद्ध म्हणून झाकलं जातं त्याची चर्चा बोल भिडूवर झडतेच झडते! राहून राहून आम्हाला एक प्रश्न विचारला गेला तो म्हणजे,

स्त्रीची कामेच्छा पुरुषाच्या कामेच्छे च्या दसपट असते हे खरे का ?

त्यावर लिहिण्याआधी बांग्ला देशाची सुप्रसिद्ध साहित्यिक तस्लिमा नसरीनची ही कविता वाचायलाच हवी…..

रोज रात्री माझ्या अंथरुणावर येऊन झोपतो एक ‘नपुंसक’ पुरुष

डोळ्यांची ओठांची, हनुवटीची चंचल चुंबन घेता घेता दोन्ही हाताच्या मुठीत तो धरतो स्तन, तोंडात कोंबतो, चोखतो तहानेन माझी रोमरंध्रे जागी होतात, समुद्रभर पाणी मागतात, कण्हतात!

केसाच्या जंगलात त्याची अस्थिर बोट, बोटाची आग मला मुळापास्नं धगधगीत करून टाकून उडवत खेळत राहातात
माझ निम्म अर्ध शरीर तेव्हा
त्या पुरुषाच अंग मोडून चुराडा करून पाणी मागत, कण्हतं!

उशाशी पौषची पौर्णिमा
रात्र जागत बसून राहाते, तिच्या मांडीवर डोक ठेवून
मला तापवून सोडून, मला पेटवून टाकून, नपुंसक बेशुद्ध झोपतो
माझं संबंध शरीर तेव्हा तीव्र तहानेन
झोपलेल्या पुरुषाच बधिर शरीर स्पर्शून थेंबभर पाणी मागतं,

आक्रोशतं!

समस्त स्त्रियांचे गाऱ्हाणे तस्लिमा नसरीनने या कवितेत निर्भीडपणे मांडले आहे. आता या कवितेतून ही तुम्हाला समजलं नसेल तर उत्तर ‘नाही’ आहे. म्हणजे पुरुषाची कामेच्छा स्त्रीच्या कितीतरी पटीने अधिक असते. तिच्या शरीरातील हार्मोन्स, तिची निसर्गदत्त मातृत्वाची जबाबदारी तिच्या जननेद्रियांची संवेदनशीलता या सर्वांचा विचार केल्यास स्त्री ही क्षणाची पत्नी व अनंतकाळजी माता असते हे सुभाषित योग्यच आहे.

संभोग हे स्त्रीचं साधन असतं प्रेमासाठी आणि मातृत्वासाठी. आणि पुरुषासाठी ते साध्य असतं. स्त्रीची कामेच्छा पुरुषाच्या एकचतुर्थांश देखील नसते. इतकी तिची कमी इच्छा असूनही पुरुष समागमात आपली कामतृप्ती घाईघाईत लवकर आटपून झोपी जातो आणि स्त्री अर्ध्यावरच राहते.

वर वर पाहता स्त्रीची इच्छा दीर्घकाळ असते असा गैरसमज होतो. पण तसं नसतं. स्त्री ही इस्त्री प्रमाणे सावकाश गरम आणि सावकाश थंड होते. पुरुषाला याची कल्पना नसल्यामुळ आणि केवळ स्वतःच्या तृप्तीकडे लक्ष केंद्रित केल्यामुळे ती अतृप्त राहते.

संभोगपूर्व प्रणयाराधनात स्त्रीची तृप्ती प्रेम आणि स्पर्शाद्वारे होते. हे पुरुषाला माहीत नसतं. पुरुष शक्यतो घाईत असतो. त्याच्या तृप्तीनंतर तो तात्काळ बाजूला सरून झोपी जातो. असं न करता संभोगानंतरही त्याने तिच्या बाहुपाशात राहावं. तिची तृप्ती झालेली नसल्यास शिश्नाच्या व स्तनाच्या स्पर्शाने तृप्ती होऊ द्यावी. बहुसंख्य स्त्रिया कामतृप्तीसंबंधीची तक्रार व्यक्त करीत नाहीत. तसे करणे त्यांना स्त्रीसुलभ संकोचामुळे अवघड वाटते किंवा कामतृप्तीची फारशी गरज वाटत नाही.

संभोग ही बाब नैसर्गिक आहे. आणि त्यामुळे ते नैसर्गिकच राहायला हवं.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.