थंडीवर रामबाण उपाय म्हणून खरंच दारू चालते का…?

प्रश्न साधाय पण उत्तर डिपाय.

‘डिप’ म्हणजे एकदम डिप. जणू काही ९० मिली लीटर डिप. तर तुम्ही खोलात जाऊन  विचार करु लागता तेव्हा तुम्हाला असे प्रश्न पडतात. आमच्या भिडूला देखील हाय होऊन हा प्रश्न पडला. खरंच पावसाळ्यात, हिवाळ्यात दारू प्यावी का ?

दारू पिल्यानंतर थंडी वाजायची कमी होते का ?

आर्मीमध्ये दारू दिली जाते याचा अर्थ खरंच दारूने थंडी थांबते का ?

मुळात असे प्रश्न पडतात ते दारू पिल्यानंतरच.

दारू पिल्यानंतर माणूस खोटं बोलत नाही. ते तर आम्ही दारू पिल्यानंतर माणसं खरं का बोलतात ? याठिकाणी कधीच सिद्ध केलंय.

आत्ता दूसरा प्रश्न,

दारू पिल्यानंतर थंडी वाजायची थांबते का ?  

तर काही प्रमाणात हो.

काही प्रमाणात हो म्हणजे जसं तुमची मैत्रीण ‘यु आर गुड फ्रेन्ड, पण मी तसा विचार कधीच केला नाही’ म्हणत तुम्हाला डच्चू देते त्यातील हो. या ‘हो’चा डिप अर्थ येतो नाही. कसा तर डिटेल सांगतो. दम काढा.

दारूमध्ये काय असतं ? तर अल्कोहल.

अल्कोहल तुमच्या पोटात जातं. पोटातून रक्तात जातं. रक्तात गेलं की ते आपली ताकद दाखवण्यास सुरवात करतं. आत्ता काय होतं तर अल्कोहल तुमच्या रक्ताला पातळ करतं. पातळ म्हणजे किंचित प्रमाणात. जास्त टेन्शन नका घेऊ. यामुळे काय होतं तर पुर्वी शिरा, धमन्या , रक्तवाहिन्या वगैरे वगैरे मधून वाहणार रक्त पातळ होऊन मनमोकळे पणान दौड करु लागतं.

याचा अर्थ असा की ते त्वचेच्या वरच्या भागातून वाहू लागतं. अगदी मनमोकळेपणानं. या दरम्यान काय होतं तर त्वचेच्या वरच्या थरावर असणारे  ‘हीट सेंसिटिव न्यूरॉन्स’ (थर्मोरिसेप्टर्स) सक्रिय होतात. ते इतके सक्रिय होतात की आपल्या मेंदवाला सांगतात थंडी वाजयची कमी झालेय.

परिणामी आपल्या डोक्याला आज्ञा मिळते आत्ता गरम होतंय. ठिक वाटतय वगैरे वगैरे.

थंडीवर रामबाण उपाय म्हणून दारू पिणं शहाणपणा आहे का ?  

तर नाही नाही नाही.

वरती जे हो म्हणून सांगितलेलं आणि त्यामध्येच नाही असं उत्तर लपलय हे जे आम्ही गुढ वाक्य तयार केलं ते त्यासाठी.

आत्ता याचं कारण काय तर थर्मोरिसेप्टर्स तुमच्या डोक्याला अंग गरम होतंय म्हणून सुचना पाठवतात. याचा अर्थ असा नाही की तुमच्या बॉडीचं टेम्प्रेचर खरोखरच वाढतय. तो तर केवळ एक छलावा आहे. त्याचं कारण असं की रक्त पातळ होऊन  दौडू लागतं तेव्हा रक्ताचा विस्तार वाढतो. त्यामुळे रक्ताचं तापमान मेन्टेन करण्यासाठी शरिरातली अतिरिक्त उष्णता खेचून घेतली जाते. या दरम्यान काय होतं तर ‘कोअर बॉडी टेम्प्रेचर’ कमी होतं. अशा वेळी जास्त दारू पित राहिला तर हळुहळु बॉडीचं टेम्परेचर कमी होत जाऊन ‘हायपोथर्मिया’ होण्याचा धोका वाढतो.

 

Leave A Reply

Your email address will not be published.