तुम्हीच सांगा स्टिव्ह जॉब्स गेल्यानंतर ॲप्पलच्या फोनमध्ये तुम्हाला काय नवीन दिसलंय

Think Different

 एकेकाळी ॲप्पलचं हे घोषवाक्य होतं. १९९७ ते २०११ पर्यंत असाच विचार करून स्टिव्ह जॉब्स यांनी इनोवेशनची परंपरा कायम जपली. जेव्हा जेव्हा स्टिव्ह जॉब्स स्टेज वर येत होता तेव्हा तेव्हा त्यानं लोकांना नवीन जादू दाखवली होती. सुरवात झाली i-Mac कंप्युटरपासून. मग २००१ मध्ये आणला iPod ज्यानं लोकांची गाणी ऐकायची पद्धतच बदलून टाकली.  मोबाइलचा कॉल सोडून इतर कारणासाठी वापरयाची सवय लावली ती ॲप्पलच्या २००७ मध्ये आलेल्या iPhone नं.

Stay Hungry Stay Foolish

या तत्वाला जागत जॉब्स कंपनी यशस्वी होतं असतानाही स्वस्थ बसला नव्हता, प्रत्येकवेळी त्याला लोकांना नवीन काहीतरी द्यायचं होतं. अगदी ॲप्पलचे प्रोडक्ट्स विकण्यासाठी जी दुकानं आहेत त्याची डिझाइन सुद्धा तो स्वतः लक्ष घालून करून घेत होता. त्याचा कार्यकाळात iPhoneची जेवढी पण नवीन मॉडेल आली त्या सर्वांमध्ये त्यानं काहीतरी नवीन दिलं होतं. 

मात्र आता तुम्ही तुमच्या कोणत्याही मित्राला विचार आयफोन का घेतला तर त्याचं एकंच म्हणणं असतं. 

ॲप्पल आहे विषय संपला

 मग त्याला पुढं जाऊन विचारा. जास्तीत जास्त काय सांगेल कॅमेरा भारी दिलाय, एक्सट्रा कॅमेरा दिलाय, स्क्रीन वाढवलेय कमी केलेय. झालं! ह्याच्या पुढे त्याला काय सुचत नाहीये. त्याचं पण काय चुकत नाहीये. अनेक जणांचं हेच म्हणणं आहे की आहे त्यात सुधारणं करण्याशिवाय ॲप्पल काय नवीन देत नाहीये. ॲप्पलचे नवीन प्रोडक्ट पण बाजरात येत नाहीयेत.स्टिव्ह जॉब्सनंतर ॲप्पलचे दोन चाललेली उत्पादने म्हणजे एयरपॉड आणि ॲप्पलची वॉच. आता हे फक्त आम्ही म्हणतोय असं नाहीये. 

फास्ट कंपनी जी सगळ्यात जास्त इनोव्हेटिव्ह कंपन्यांची रँकिंग लावते. त्यांनी २०११ मध्ये ॲप्पल जगातली सगळ्यात इनोव्हेटिव्ह कंपनी असल्याचं म्हटलं होतं त्यांनी २०२१ च्या यादीत ॲप्पलला स्थान पण दिलेलं नाहीये.

एवढंच काय तर अनेकवेळा ॲप्पलचे जे फिचर आहेत ते चाईनेज स्मार्टफोन्समध्ये आधी आलेले आहेत.

अप्पलचं मागं पढण्याचं पाहिलं कारण आहे ॲप्पलची एवढा मोठा ब्रँड म्हणून असलेली प्रतिमा.

सुरवातीला जेव्हा लहान कंपनी होती तेव्हा ॲप्पल पटापट आपले प्रोडक्ट बाजरात आणत होता. आता मात्र एवढा मोठा ब्रँड झालं आहे कि त्यांना प्रत्येक गोष्ट सांभाळून आणावी लागतेय. ॲप्पलने त्यांची वायरलेस चार्जिंग मॅट एयरपॉवर आणण्याची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर त्यांना यामुळे फोन जास्त गरम  होत असल्याचं लक्षात आलं आणि त्यांनी एअरपॉवर आणण्याचा निर्णय पुढे ढकलला. 

सॅमसंगनं घाई घाईमध्ये फोल्डेबल फोन लाँच केला आणि लवकरचं ते मॉडेल गंडलं. ॲप्पलला ती रिस्क घ्यायची नसते. त्याबरोबरच ॲप्पलची रिसर्च आणि डेव्हलपमेंट करणारी टीम आता पहिल्यासारखी नाहीये अशी टीकाही अनेकवेळा केली जाते. आणि यामुळेच ॲप्पलचे इंनोवेशन लेट होतात असं सांगण्यात येतं.

सध्याच्या प्रॉडक्टमध्ये अजून इनोव्हेशन करण्यास  असलेला कमी स्कोप.

आता आयफोनमध्ये अजून काय नवीन द्यायचं हा प्रश्न ॲप्पलपुढे पण पडलेला असतो. यामागील अजून एक कारण म्हणजे जेव्हा कंपनी जुनी होत जाते तेव्हा त्यांनी ज्या कारणांसाठी कंपनी चालू केली होती त्या प्रश्नांची उत्तर मिळतात आणि नवीन प्रश्न शोधून त्यांची उत्तर शोधणं कंपनीला अवघड होऊन बसतं.

बिझनेस की इनोवेशन

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार स्टिव्ह जॉब्स यांच्यानंतर आलेल्या टीम कूक यांनी ॲप्पलच्या बिझनेस वाढवण्यात  जास्त लक्ष घातलं आणि त्यात त्यांना यशही आलं आहे. आज कंपनींने  ३ ट्रिलियन डॉलरचा जो टप्पा घातला तो कुक यांच्या बिझनेस स्ट्रॅटेजीमुळेच.

काही जण तर ॲप्पल गंडली आहे हेच मानायला तयार नाहीयेत. 

त्यांचं म्हणणं आहे ॲप्पलने उत्पादने  डेव्हलप करण्याचा वेगळा मार्ग निवडला आहे. त्यांचं म्हणणं आहे की दिवसेंदिवस वाढणारी ॲप्पलच्या कॅमेरांची क्वालिटी हा त्याचाच भाग आहे, तसेच इतक्या दिवस इंटेलच्या चिप वापरणारऱ्या ॲप्पलने काढलेली M-1 चिप हे ॲप्पलच्या इनोव्हेशनचंच उदाहरण आहे. 

त्यामुळे फीचरच्या बाबतीत इतर मोबाइल कंपन्यांकडून तगडी स्पर्धा सहन करणारी ॲप्पल सध्या तरी ब्रँडमुळे घोडदौड करतेय. आणि पुढच्या काळात कशी काम करेल हे स्टिव्ह जॉब्स ने म्हटल्याप्रमाणे कंपनी किती इनोवेटिव राहते यावर अवलंबून असणार आहे.  

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.