विकासाची चक्रे गतिमान केल्यामुळेच नॉर्थ ईस्ट मोदींच्या ताब्यात आलाय ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या नॉर्थ ईस्टच्या दौऱ्यावर होते. मणिपूर आणि त्रिपुरा यांच्या येऊ घातलेल्या निवडणुका पाहता त्यांचा हा दौरा महत्वपूर्ण असल्याचं म्हटलं गेलं. नॉर्थ ईस्टला आपण भरभरून दिल्याचं मोदी म्हणतायत.

आपल्या HIRA (हायवे,इंटरनेट,रेल्वे ,एअरपोर्ट )मॉडेलमुळं स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच नॉर्थ ईस्टच्या विकासाची चक्र हालत असल्याचा दावा मोदींकडून केला जातो.

डबल-इंजिन गव्हर्नमेंटमुळं दिल्ली नॉर्थईस्टच्या दारात आल्याचही मोदींनी म्हटलंय. आज नॉर्थ ईस्ट मध्ये सगळ्या राज्यात एकतर भाजपाची सत्ता आहे किंवा भाजप पुरस्कृत NEDA या युतीत सहभागी असलेल्या पक्षांची सत्ता आहे. त्यामुळं खरंच  मोदी नॉर्थ ईस्टमध्ये विकास होतोय का? हे भिडूला बघायचं होतं म्ह्णून म्हटलं बघावं जरा जिथं भारतात सूर्य पहिल्यांदा उगवतो तिथं नेमका किती उजेड पडलाय?

तर भिडू लोक नॉर्थ ईस्टचे प्रश्न आणि मग तिथलं राजकारण फिरतं प्रामुख्यानं तीन मुद्यांवर. विकास, अस्मिता आणि सुरक्षा. तर आता हे तीन मुद्दे जरा विस्कटून बघू.

विकास-

नॉर्थ ईस्टचा एक मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे भारताच्या मेनलॅन्डशी असलेला त्यांचा मर्यादित संपर्क आणि त्यातल्यात त्यात डोंगराळ प्रदेशामुळं या सेव्हन सिस्टर्स राज्यांचा एकमेकांशी असलेली  कमी कनेक्टिव्हिटी. यामुळं नॉर्थ ईस्टकडं संसाधन असूनही त्यांचा विकास मर्यादित राहिला.

भाजपनं पण हा मुद्दा बरोबर ओळखला होता आणि त्यानुसार त्यांनी आपल्या २०१४च्या आणि २०१९च्या दोन्हीही निवडणूक जाहीरनाम्यात भाजपनं याला स्थान दिलं होतं.

मोदी सरकार आल्यांनतर लूक ईस्टचं रूपांतर ऍक्ट ईस्ट मध्ये करून त्यांनी नॉर्थ ईस्टमध्ये काहीतरी भरीव करण्याचा मनोदय बोलून दाखवला होता.

रस्ते पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी, ईशान्येतील विशेष प्रवेगक रस्ते विकास कार्यक्रमांतर्गत सरकार रु.८०,००७ पेक्षा जास्त गुंतवणूक करतंय आणि भारतमाला प्रकल्पांतर्गत अतिरिक्त ३०,००० कोटी रुपये खर्च करण्यात येणारआहेत. त्याचप्रमाणे, भारतीय रेल्वे विभागातील रेल्वे नेटवर्क सुधारण्यासाठी ७४,४८५ कोटी रुपये खर्च करत आहे.त्याचबरोबर नॉर्थ ईस्टमधील प्रत्येक राज्याची राजधानी राष्ट्रीय रेल्वे ग्रीडशी जोडण्याचा सरकारचा विचार आहे.

भारतातील सर्वात लांब पूल लोहित नदीवरील धोला सादिया पूल, बोगीबील पुलाचे बांधकाम जो भारतातला रेल्वेमार्गतील सगळ्यात लांब ब्रीज आहे ही दोन महत्वाची कामं मोदी यांच्या कार्यकाळात पूर्ण झाली.

म्हणजे तरतूद तर सरकारनं मजबूत केलीय त्यातले प्रोजेक्ट पण लवकर पूर्ण होतायत. मात्र अजूनही नॉर्थ ईस्टला  कनेक्टिव्हिटीसाठी भरपूर करण्याची गरज असल्याचं जाणकार सांगतायत. विशेषतः चिकन नेक म्हणजे दार्जिलिंगच्या वरचा जो निमुळता भाग आहे त्याला चीन कडून असलेला धोका पाहता या मार्गाला पर्याय निर्माण करण्यासाठी विमान वाहतूकीवर अजून भर द्यवा लागणार आहे असं तज्ञ सांगतायत.  

अस्मिता – 

अस्मितेपेक्षा ओळख म्हणजेच आयडेंटिटी हा नॉर्थ ईस्ट मधला एक नाजूक मुद्दा. बांगलादेशतुन येणारे घुसखोर, या आधी आलेली अनधिकृत नागरिक यामुळं आपली संस्कृती धोक्यात  आहे असं  इथल्या नागरिकांना वाटतं. मोदी सरकारंन CAA-NRC आणून अनधिकृत नागरिकांवर कारवाई करणार असं म्हटलं. मात्र ह्यातून आम्हला नक्की काय भेटणार, अनधिकृत घुसखोरांना कुठ पाठवणार याची उत्तरं अजूनही तिथल्या नागरिकांना मिळाली नाहियेत.

सुरक्षा-  

नॉर्थईस्टच्या सगळ्या राज्यांना आंतरराष्ट्रीय सीमा आहेत. त्यामुळं बाहेरून असणारा सुरक्षेचा धोका विशेषतः चीनकडून असंलेला धोका या राज्यांना जास्त आहे. 

तसेच नागा बंडखोर,आसाम मधील उल्फा अतिरेकी आणि इतर बंडखोर संघटना यामुळं अंतर्गत सुरक्षेचा ही धोका आहे. 

मोदी सरकारनं केलेल्या नागा शांतता करार तसेच बोडो शांतता करार यामुळं अंतर्गत सुरक्षेचं कायमचं उत्तर शोधण्याच्या दृष्टेनं महत्वाचं पाऊल टाकलं गेल्याचं जाणकार सांगतायत. 

मात्र AFSPA चा मुद्या आणि त्यामुळं होणार हिंसाचार ,तसेच त्रिपुरा सारख्या राज्यांत वेगळ्या राज्यसाठी होणारी आंदोलनं यामुळं अंतर्गत सुरक्षेचा मुद्दा पुन्हा उभा राहतो. विशेषतः AFSPA उठवण्याची मागणी राज्यांकडून सारखी केली जातेय.

याचबरोबर नॉर्थ ईस्ट मधला कमी औदयोगिक विकास ,तिथली बेरोजगारी, नॉर्थ ईस्ट मधल्या नागरिकांशी भारतात इतरत्र होणारा वर्णद्वेष या मुद्यांवर काम करण्याची गरज आहे असं जाणकार सांगतायत. तसेच नॉर्थ-ईस्टचं पर्यटन सेक्टरचा ही अजून विकास करण्यास वाव आहे.

आता ह्या सगळ्याचा सार म्हणजे मोदींच्या सरकारमध्ये नॉर्थ-ईस्टला तसं चांगलं स्थान मिळतंय पण त्याच बरोबर या प्रदेशांकडं अजून लक्ष देणं गरजेचं आहे. बाकी तुम्हाला मोदींच्या नॉर्थ-ईस्ट पॉलिसी बद्दल काय वाटतं हे खाली कंमेंट करून नक्की सांगा.

हे ही वाच भिडू :

 

1 Comment
  1. नितीश क्षीरसागर says

    ‘मेनलॅन्ड’ हा शब्द खटकला भिडू.
    नॉर्थ ईस्ट हा देखील ‘मेनलॅन्ड’ च आहे .हे प्रत्येक भारतीयाला जितकं लवकर कळेल तितके ते आपल्याशी लवकर जोडले जातील.

Leave A Reply

Your email address will not be published.