कुठलंही प्रोडक्ट घेताना ज्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो तो म्हणजे ISO

दोन दिवसांपूर्वीचीचं गोष्ट कधी नव्हे ते आजीसोबत छोट्या मार्टमध्ये जाण्याचा योग आला. फार काही घरातला किराणा माल आणि काही बाकीच्या वस्तू घ्यायच्या होत्या. घरातून तशी यादीचं बनवून आणलेली. सामान घ्यायला सुरुवात करणार तेवढ्यात आजी म्हणाली सामान घेताना त्याच्यावर तो नंबर बघून घेऊ बरं का..

मला आधी वाटलं एक्सपायरी डेट बद्दल बोलत असेल. पण आजीनं तिथलं एक पाकीट उचलून त्यावरच्या ISO  नंबरवर बोट ठेवून एकदम शिस्तात सांगितलं. हा नंबर बघून घे… आपल्या चेहऱ्यावर जरा स्माईल आली. पण नवल वाटलं नाही. कारण टिव्ही सिरीयल बघताना आजीला जाहिराती बघायची सुद्धा सवय.

असो… तर विषय हा ISO नंबरचा. लहानपणी जेव्हा टिव्हीवर जाहीराती बघायचो, तेव्हा या नंबरचा मॅटर काय कळायचा नाही पण नंतर मोठं झाल्यावर कळालं की, ISO म्हणजे दर्जा.

कुठलीही कंपनी आपल्या प्रॉडक्टची जाहीराती करताना या नंबरच्या हवाल्यानंं मार्केटींग करतेचं. त्यामुळे ISO सर्टीफाइड हे नाव आपल्या कानावर पडलेलचं असतं. म्हणजे तो नंबर एक प्रकारचं आश्वासन असतं की, आमच्या कंपनीच्या उत्पादनांचा आणि सर्विसचा दर्जा चांगला आहे.

 ISO म्हणजेच इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ स्टँडर्डायझेशन. 1947 साली लंडनमध्ये या संघटनेला सुरुवात झाली. जी एक नॉन – गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे. या संस्थेसोबत सध्या जगातील 165 देश जोडले गेलेत. ISO चं हेडक्वार्टर स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा इथं असून ते इंग्लिश, फ्रेंच आणि रशियन या तीन भाषांमध्ये ऑपरेट होते.

तर पाहिलं तर ISO ने 1920 च्या दशकात इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ द नॅशनल स्टँडर्डायझिंग असोसिएशन (ISA) या नावाने काम सुरू केल होत. पण 1942 साली दुसऱ्या महायुद्धानंतर बहुतेक पाश्चात्य देश उध्वस्त झाले त्यामुळे कामकाज बंद झालं आणि संस्था स्थगित करण्यात आली. 

पुढे युद्ध झाल्यांनतर, संयुक्त राष्ट्र मानक समन्वय समिती (UNSCC) ने ISA ला एक नवीन जागतिक मानक संस्था तयार करण्याचा प्रस्ताव दिला. त्यांनी एक संस्था तयार करायला सांगितली जी जगभरातील मानकांवर विचारपूर्वक आणि निर्णय घेईल. ऑक्टोबर 1946 साली ISA आणि UNSCC लंडनमध्ये ISO तयार करण्यासाठी भेटले आणि 23 फेब्रुवारी 1947 ला ऑपरेशन सुरू झालं.

ISO चं काम काय तर कंपनी किंवा संस्थेची तपासणी करणं. जसं की कंपनीची क्वालिटी, प्रोडक्ट क्वालिटी, ग्राहकांचं समाधान, शुद्धता आणि मॅनेजमेंट सिस्टीम. या सगळ्या गोष्टी तपासल्यानंतर जेव्हा ISO  संस्था प्रमाणित करते की, ही कंपनी किंवा संस्था योग्यरीत्या चालतेय आणि तिचे उत्पादन सुद्धा चांगल्या दर्जाचे आहे, तेव्हा ISO कडून कंपनी आणि संस्थेला त्या कॅटेगरीतलं सर्टिफिकेट दिलं जात. 

मानकांचा वापर एखाद्याने खरेदी केलेले उत्पादन सुरक्षित आणि हव्या त्या गुणवत्तेचे असल्याचे सुनिश्चित करण्यात मदत करते. मानके व्यवसायांना उत्पादकता वाढविण्यास मदत करतात कारण ते त्रुटी कमी करतात.  ISO  विविध बाजारपेठेतील उत्पादनांची थेट तुलना करण्यासही मदत करते. ज्यामुळे बाकीच्या कंपनी  परदेशी बाजारात प्रवेश करू शकतात आणि प्रामाणिकपणे स्पर्धा करू शकतात. जगभरातला कुठलाही ग्राहक ISO मानकामुळे स्वतःला सुरक्षित समजतो.

तस ISO अनेक प्रकारची सर्टिफिकेट देते, जी प्रोडक्ट आणि सर्व्हिसच्या क्वालिटी संदर्भांत असतात. आता जसा काळ बदलतो तशी गरज आणि मानके सुद्धा बदलतायेत आणि अपडेट होतायेत. म्हणजे  ISO सुद्धा 9000 पासून ISO 9001 पर्यंतचे अपडेट करण्यात आलेत. जगभरातल्या प्रत्येक क्षेत्रात ISO सर्टिफिकेट महत्वाचं असतं. आता प्रत्येक सर्टिफिकेटसाठी वेगवेगळी मानके आहेत आणि त्यानुसार अटी आणि शर्तीही ठरवल्या जातात. 

 आता या ISO सर्टिफिकेटमुळे होत काय, व्यवसायाची विश्वासार्हता वाढायला तसंच व्यवसायात सुधारणा होण्यास मदत होते. त्यामुळे कुठलीही कंपनी आपल्या उत्पादनांची किंवा सर्विसची जाहिरात करताना ठळक अक्षरात त्यांच्या ISO नंबर डिस्प्ले करते. ज्यामुळे कुठलाही ग्राहक ISO सर्टिफाईड वस्तूंवर आणि सर्व्हिसवर पटकन विश्वास ठेवतो आणि ती खरेदी करतो. 

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.