म्हणून भाजीपाला विकत घेतल्यासारखं अमेरिकेत बंदुका विकत घेता येतात…
अमेरिकेत गोळीबार होऊन लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या सतत येतच असतात. साधारण २ दिवसांपुर्वी अमेरिकेतल्या लॉस एंजल्स या ठिकाणी मास फायरींग म्हणजे लोकांच्या समुहावर फायरींग झाली होती ज्यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला होता.
आता पुन्हा अमेरिकेत गोळीबार झालाय. यावेळी एकाच ठिकाणी नाही तर, १२ तासात ३ वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार झालाय. आधी कॅलिफॉर्निया मग आयोवा आणि त्यानंतर शिकागो या ठिकाणी गोळीबार झालाय. या १२ तासात झालेल्या ३ गोळीबारांमध्ये ११ जणांचा मृत्यू झालाय.
त्यामुळं अमेरिकेतल्या गण व्हॉइलन्सचा म्हणजेच बंदुकांनी केल्या जाणाऱ्या हिंसाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
अमेरिकेत बंदुकांचं प्रमाण प्रति १०० माणसांमागे १२.५ बंदुका असं आहे.
जगात दुसऱ्या कोणत्याही देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात बंदुका नाहीयेत. अमेरिकेचं बंदुकांच्या बाबतीत असलेलं धोरण त्यात असलेले लूपहोल्स यामुळं देशात मोठ्या प्रमाणात बंदुका पसरल्या जातात त्याचमुळं अशा हिंसाचाराच्या घटना वाढतात असं सांगण्यात येत आहे.
१९६७ ते २०१७ च्या दरम्यान अमेरिकेत १५ लाख लोकांचा बंदुकीमुळे मृत्यू झाला आहे.
अमेरिकेच्या ऐतिहासिक सिव्हिल वॉरमध्ये देखील एवढी लोकं मारली गेली नव्हती. त्यामुळं अमेरिकेत एवढया मोठ्या प्रमाणात बंदुका का आहेत? त्यावर निर्बंध घालण्यात का येत नाहीत? देशाचे राष्ट्राध्यक्ष जो बायडनसुद्धा बंदुकीच्या कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचा बाजूने असताना तसं का होत नाही? याचीच कारणं एक एक करून बघू.
याची सुरवात होईल अमेरिकेच्या संविधानापासून.
संविधानाच्या दुसऱ्या दुरुस्तीमध्ये अमेरिकन नागरिकांना स्वरक्षणासाठी बंदुका बाळगण्याचा मूलभूत अधिकार देण्यात आला आहे.
त्यामुळं बंदूक बाळगणं हे अमेरिकेत असं काय वेगळी गोष्ट नाहीये. त्यामुळं सुरवातीपासूनच लोकांकडे बंदुका असायचा. सिविल वॉरचा हिंसक इतिहासही यामागील एक कारण होतं. १९६८ मध्ये राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी, सिनेटर रॉबर्ट केनेडी आणि डॉ. मार्टिन ल्यूथर किंग जूनियर यांच्या हत्येनंतर अमेरिकन काँग्रेसने गन कंट्रोल कायदा मंजूर केला. ज्याद्वारे एखाद्याला बंदूक विकताना त्याचं बॅकग्राऊंड चेक करण्याबाबत कडक कायदे करण्यात आले.
त्यानंतरही हिंसाचार थांबला नसल्याने सुधारणा करण्यात येत होत्या मात्र त्या अनेकवेळा वरकरणी असल्याचं दिसून येतं त्यात अनेक त्रुटी सोडल्याचाही आरोप करण्यात येतो.
उदाहरण द्यायचे झाल्यास गण शो लूपहोलचं देता येईल.
अमेरिकेच्या फेडरल कायद्यानुसार बंदुकीच्या दुकानांना बंदुकीची विक्री करताना ग्राहकाचं बॅकग्राऊंड चेक करणं कम्पलसरी आहे. त्यानुसार त्यांना ग्राहकाची सगळी माहिती घेऊन FBI च्या डेटाबेसमध्ये ती चेक करावी लागते.
मात्र प्रायव्हेट डिलरसाठी अशी कोणती अट नाहीये. म्हणजे ज्याच्याकडे बंदूक आहेत त्याला एखाद्या दुसऱ्या नागरिकाला ती विकायची असेल तर त्यासाठी माणसाची पार्श्वभूमी बघितली जात नाही. त्यामुळं अमेरिकेत जे गण शो आयोजन केले जातात तिथं या त्रुटींचा चांगलाच फायदा उचलला जातो. गण शो म्हणजे बंदुकीचा बाजार.
जसं भाजी मार्केट मध्ये जाऊन आपण भाजी घेतो त्याचप्रमाणे या गण शोमध्ये बंदुका विकल्या आणि घेतल्या जातात.
अजून एक गोष्ट म्हणजे अमेरिकेलतल्या बंदुकांच्या उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचं लॉबिंग. नॅशनल रायफल असोशिएशन ही अमेरिकेतल्या बंदूक उत्पादक आणि विक्रेत्यांची एक पॉवरफुल लॉबी आहे. नॅशनल रायफल असोशिएशन सर्व प्रकारच्या बंदुक नियंत्रन कायद्यांविरोधात जोरदार लॉबिंग करते. अमेरीकेत जेवढया जास्त बंदुका असतील तेवढा अमेरिका देश सुरक्षित राहील असं त्यांचं म्हणणं आहे. सेकंड आमिंडमेंटनुसार अमेरिकन नागरिकांना कोणत्याही निर्बंधांशिवाय बंदुका वापरण्याचा अधिकार आहे असा दावा या संघटनेकडून केला जातो.
नॅशनल रायफल असोसिएशन संघटनेच बजेट दरवर्षी सुमारे २५० मिलियन डॉलरच्या घरात जातं.
लॉबिंगच्या दृष्टीने ही संघटना अधिकृतपणे बंदुकीच्या धोरणावर प्रभाव टाकण्यासाठी दरवर्षी सुमारे ३ मिलियन डॉलर खर्च करते. याद्वारे मोठ्या आणि प्रभावशाली सिनेटर्सना आपल्या बाजूने ओढणे, त्यांच्या इलेक्शन कॅम्पेनमध्ये मदत करणे अशी कामं य संघटनेकडून केली जातात. त्याचबरोबर लोकांनाच जण मत सुधार बंदुकांच्या बाजूने तयार करण्यासाठी हि संघटना मोठ्या प्रमाणात पैसा ओतते.
या कारणांमुळे महासत्ता म्हणून जगासमोर उभी असलेल्या अमेरिकेत बंदुकांवर नियंत्रण आणणं शक्य नाहीये.
हे ही वाच भिडू :
- अमेरिका रशियाच्या राड्यात पेप्सी कंपनी जगातली सहावी मोठी नेव्ही झाली होती
- अमेरिका केवळ अफगाणिस्तान मध्येचं नाही तर वेळोवेळी तोंडावर पडली आहे
- अमेरिका जगाचा बाप कसा झाला त्याची ही गोष्ट…