म्हणून भाजीपाला विकत घेतल्यासारखं अमेरिकेत बंदुका विकत घेता येतात..

अमेरिकेत पुन्हा एकदा नागरिकांवर गोळीबाराची घटना घडली आहे. मंगळवारी टेक्सासच्या एका  प्राथमिक शाळेत झालेल्या गोळीबारामध्ये अठरा लहान मुले आणि तीन प्रौढांचा मृत्यू झाला झाला आहे.

ज्या लहान मुलांचा या शूटिंगमध्ये मृत्यू झाला आहे त्यांचं वय ७-१० वयोगटात असल्याचं सांगण्यात येत आहे.

ज्या हल्लेखोराला पोलिसांनी ठार केलं आहे त्याचं नाव साल्वाडोर रामोस असून हा हल्लेखोर अवघ्या १८ वर्षाच्या मुलगा आहे. गेल्या १० दिवसातली अमेरिकेतील ही दुसरी मास शूटिंगची केस आहे. 

हल्ल्याच्या दोनच दिवस आधी हल्लेखोराने दोन AR -१५ रायफल्सचे फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर टाकले होते. 

मंगळवारची घटना सोडून अमेरिकेत २०२२ मध्येच शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये कमीतकमी ३९ गोळीबार झाले आहेत त्यामध्ये किमान १० मृत्यू आणि ५१ जखमी झाले आहेत.

त्यामुळं अमेरिकेतल्या गण व्हॉइलन्सचा म्हणजेच बंदुकांनी केल्या जाणाऱ्या हिंसाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

अमेरिकेत बंदुकांचं प्रमाण प्रति १०० माणसांमागे १२.५ बंदुका असं आहे.

जगात दुसऱ्या कोणत्याही देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात बंदुका नाहीयेत. अमेरिकेचं बंदुकांच्या बाबतीत असलेलं धोरण त्यात असलेले लूपहोल्स यामुळं देशात मोठ्या प्रमाणात बंदुका पसरल्या जातात त्याचमुळं अशा हिंसाचाराच्या घटना वाढतात असं सांगण्यात येत आहे.

१९६७ ते २०१७ च्या दरम्यान अमेरिकेत १५ लाख लोकांचा बंदुकीमुळे मृत्यू झाला आहे.

अमेरिकेच्या ऐतिहासिक सिव्हिल वॉरमध्ये देखील एवढी लोकं मारली गेली नव्हती. त्यामुळं अमेरिकेत एवढया मोठ्या प्रमाणात बंदुका का आहेत? त्यावर निर्बंध घालण्यात का येत नाहीत? देशाचे राष्ट्राध्यक्ष जो बायडनसुद्धा बंदुकीच्या कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचा बाजूने असताना तसं का होत नाही? याचीच कारणं एक एक करून बघू.

याची सुरवात होईल अमेरिकेच्या संविधानापासून.

संविधानाच्या दुसऱ्या दुरुस्तीमध्ये अमेरिकन नागरिकांना स्वरक्षणासाठी बंदुका बाळगण्याचा मूलभूत अधिकार देण्यात आला आहे. 

त्यामुळं बंदूक बाळगणं हे अमेरिकेत असं काय वेगळी गोष्ट नाहीये. त्यामुळं सुरवातीपासूनच लोकांकडे बंदुका असायचा. सिविल वॉरचा हिंसक इतिहासही यामागील एक कारण होतं. १९६८ मध्ये राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी, सिनेटर रॉबर्ट केनेडी आणि डॉ. मार्टिन ल्यूथर किंग जूनियर यांच्या हत्येनंतर अमेरिकन काँग्रेसने गन कंट्रोल कायदा मंजूर केला. ज्याद्वारे एखाद्याला बंदूक विकताना त्याचं बॅकग्राऊंड चेक करण्याबाबत कडक कायदे करण्यात आले.

त्यानंतरही हिंसाचार थांबला नसल्याने सुधारणा करण्यात येत होत्या मात्र त्या अनेकवेळा वरकरणी असल्याचं दिसून येतं त्यात अनेक त्रुटी सोडल्याचाही आरोप करण्यात येतो.

उदाहरण द्यायचे झाल्यास गण शो लूपहोलचं देता येईल.

अमेरिकेच्या फेडरल कायद्यानुसार बंदुकीच्या दुकानांना बंदुकीची विक्री करताना ग्राहकाचं बॅकग्राऊंड चेक करणं कम्पलसरी आहे. त्यानुसार त्यांना ग्राहकाची सगळी माहिती घेऊन FBI च्या डेटाबेसमध्ये ती चेक करावी लागते.

मात्र प्रायव्हेट डिलरसाठी अशी कोणती अट नाहीये. म्हणजे ज्याच्याकडे बंदूक आहेत त्याला एखाद्या दुसऱ्या नागरिकाला ती विकायची असेल तर त्यासाठी माणसाची पार्श्वभूमी बघितली जात नाही. त्यामुळं अमेरिकेत जे गण शो आयोजन केले जातात तिथं या त्रुटींचा चांगलाच फायदा उचलला जातो. गण शो म्हणजे बंदुकीचा बाजार.

जसं भाजी मार्केट मध्ये जाऊन आपण भाजी घेतो त्याचप्रमाणे या गण शोमध्ये बंदुका विकल्या आणि घेतल्या जातात.

अजून एक गोष्ट म्हणजे अमेरिकेलतल्या बंदुकांच्या उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचं लॉबिंग. नॅशनल रायफल असोशिएशन ही अमेरिकेतल्या बंदूक उत्पादक आणि विक्रेत्यांची एक पॉवरफुल लॉबी आहे. नॅशनल रायफल असोशिएशन सर्व प्रकारच्या बंदुक नियंत्रन कायद्यांविरोधात जोरदार लॉबिंग करते. अमेरीकेत जेवढया जास्त बंदुका असतील तेवढा अमेरिका देश सुरक्षित राहील असं त्यांचं म्हणणं आहे. सेकंड आमिंडमेंटनुसार अमेरिकन नागरिकांना कोणत्याही निर्बंधांशिवाय बंदुका वापरण्याचा अधिकार आहे असा दावा या संघटनेकडून केला जातो.

नॅशनल रायफल असोसिएशन संघटनेच बजेट दरवर्षी सुमारे २५० मिलियन डॉलरच्या घरात जातं.

लॉबिंगच्या दृष्टीने हि संघटना अधिकृतपणे बंदुकीच्या धोरणावर प्रभाव टाकण्यासाठी दरवर्षी सुमारे ३ मिलियन डॉलर खर्च करते. याद्वारे मोठ्या आणि प्रभावशाली सिनेटर्सना आपल्या बाजूने ओढणे, त्यांच्या इलेक्शन कॅम्पेनमध्ये मदत करणे अशी कामं य संघटनेकडून केली जातात. त्याचबरोबर लोकांनाच जण मत सुधार बंदुकांच्या बाजूने तयार करण्यासाठी हि संघटना मोठ्या प्रमाणात पैसा ओतते.

त्याचबरोबर अमेरिकेचे जे दोन प्रमुख पक्ष आहेत त्यांच्यामध्येही गण कंट्रोलवरून मतभेद आहेत.

 

जो बायडन यांची डेमोक्रॅटिक पार्टी बंदुकीच्या वापराबाबत कडक कायदे असावेत या मताची आहे. कालच्या घटनेनंतर राष्ट्राध्यक्षांनी पॉवरफुल गण लॉबीच्या विरोधात उभं राहून बंदुकीच्या वापराबाबत कडक कायदे करण्याचं आवाहन संसदेला केलं आहे.

मात्र रिपब्लिकन पार्टी मात्र बंदुकांविरोधातील निर्बंधांच्या विरोधात राहिली आहे. टेक्सासचे  रिपब्लिकन पार्टीचे गव्हर्नर यांनी कालच्या गोळीबारबद्दल दुःख व्यक्त केलं आहे तेच २०१५ मध्ये टेक्सास बंदुका खरेदीच्या बाबतीत मागे आहे असं म्हणत नागरिकांना बंदुका खरेदी करण्याचं आव्हान करत होते. याच्यापुढे जाऊन शाळेतील गोळीबाराच्या वाढत्या घटना पाहता शाळेतील मुख्याध्यापकांना बंदुका देण्यात याव्यात अशी सूचना करतात.

त्यामुळं आता तरी अमेरिका वाढत्या हिंसाचारावर उपाय म्हणून बंदुकांवर निर्बंध आणणार की अजून बंदुका वाटणार हे बघण्यासारखं असणार आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.