भारतात ३६ लाख कोटी गुंतवण्यासाठी मोदींची मिटींग पाहीजे म्हणून जाहिरात दिलेय पण

भारतातल्या काही प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये २४ मे म्हणजेच आजच्या दिवशी एक जाहीरात प्रसिद्ध झाली. या जाहीरातीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

कारण जाहीरात पण तशीच होती. 

ही जाहीरात दिलेय ती  LANDOMUS REALTY VENTURES  या कंपनीने. या जाहीरातीतून त्यांनी सांगितलय की आमची LANDOMUS REALTY VENTURES कंपनी भारतात ५० हजार कोटी डॉलर म्हणजे अंदाजे ३६ लाख कोटी रुपये इक्विटी गुंतवणूक करण्याच्या तयारी आहे. किंवा करण्याची इच्छा आहे.

या जाहीरातीतून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडेच अपील केलेली आहे. त्यांनी म्हटलय की हे ५०,००० कोटी डॉलर भारताच्या नॅशनल इंफ्रास्ट्रक्चर पाईपलाईन साठी गुंतवणूक करण्याची इच्छा आहे. 

कंपनीने हेच आपल्या वेबसाईटवरती पण पोस्ट केली आहे. त्यात डिटेल्स देताना सांगितलय की बिल्ड इंडिया कॅम्पेनची ही फेज १ ची गुंतवणूक असेल. संपुर्ण फेजची गुंतवणूक ही २ लाख डॉलर ची असणार आहे. 

साहजिक ही काही छोटी गुंतवणूक नाही, त्यामुळे फ्यूजा तर उडणारच.. 

पण एक नाय अनेक घोळ आहेत.

https://landomus.com

पहिली म्हणजे इतक्या मोठ्या कंपनीची वेबसाईट. या कंपनीची वेबसाईटवर फक्त एका पेजची आहे. आणि होस्टिंग पण गो डॅडी वर आहे. आत्ता त्यात काय एवढं तर अहो आम्ही बोलभिडूचं होस्टिंग पण गो डॅडीवर ठेवलं नाय. इतकं ते बंडल असतय. 

असो तर यातच कंपनीच्या डायरेक्टर आणि ॲडवायझरची माहिती देण्यात आली आहे. बेवसाईडवरच्या माहितीनुसार CEO प्रदीप कुमार सत्यप्रकाश यांच्यासह ४ डायरेक्टर आणि ५ ॲडवायझर आहेत. 

कंपनी बंगलोर मध्ये रजिस्टर असून आपला कारभार अमेरिकेत चालत असल्याचं सांगण्यात आलय. शिवाय ही कंपनी रियल इस्टेट मधली असून जागा-फ्लॅट खरेदी विक्री च्या धंद्यात असल्याचं सांगण्यात आलय. 

झूम इंन्फो च्या माहितीवरून कंपनीत फक्त १९ लोकं काम करतात. आणि त्यांचा रेव्ह्यून्यू ५० लाख डॉलर आहे. पेडअप कॅपिटल १ लाख आणि ऑथोराईज्ड कॅपिटल १० लाख रुपये आहे. कंपनीच्या वेबसाईटवर एक कॉन्टॅक्ट नंबर आहे जो की न्यू जर्सी अमेरिकेतला आहे. 

आत्ता या सगळ्या घडमोडींच्या बद्दल हेलियास कॅपिटलचे समीर अरोडा यांनी ट्विट केलय, 

फेको तो लंबी फेक

संशय घेण्याची अनेक कारणं आहेत त्यातली प्रमुख गोष्ट म्हणजे बडी बडी बातां, दूसरी गोष्ट म्हणजे इतकी मोठ्ठी इन्व्हेस्टमेंट असल्यावर प्रॉपर चॅनेल थ्रू PMO कार्यालयाशी संपर्क करण्याऐवजी अशी जाहिरात देवून जागतिक करणं हेच आहे.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.