नवा वाद : आत्ता टिपू सुलतानाने बांधलेल्या मशिदीच्या आधी हनुमान मंदिर असल्याचा दावा

बनारसमधील ज्ञानवापी मशीद वादाने संपूर्ण देशात खळबळ उडाली असतांनाच यात आता नव्याच वादाची भर पडली ती म्हणजे कर्नाटकातल्या जामा मशीदच्या वादाची…

हिंदुत्ववादी संघटनेच्या टार्गेटवर आता कर्नाटकातील मांड्या येथे बांधलेली जामा मशीदीकडे असल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे श्रीरंगपट्टणात बांधलेली ही मशीद आता नव्या वादाचे कारण बनू शकते.

नरेंद्र मोदी विचार मंचच्या सदस्यांनी मांड्याच्या जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर करून मशीद हनुमान मंदिरावर बांधली असून ती हिंदूंच्या ताब्यात द्यावी अशी मागणी केली असून, टिपू सुलतानने हनुमानाचे मंदिर पाडून ही जामा मशीद मशीद बांधली होती, असा त्यांचा दावा आहे. 

कर्नाटकात जामा मशीद म्हणून ओळखली जाणारी ही मशीद जवळपास २३६ वर्षे जुनी असल्याचे सांगितले जाते. 

हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांच्या सांगण्यानुसार, ही मशीद हे एकेकाळी हिंदूंचे मंदिर होते हे सिद्ध करणारे भक्कम पुरावे आहेत. त्यापैकी काही दावे असे की,

 • १९८२ मध्ये हनुमान मंदिर पाडल्यानंतर टिपू सुलतानने मशीद बांधली होती.
 • टिपू सुलतानचे कागदोपत्री पुरावेही तेथे मंदिर असल्याचे स्पष्ट करतात.
 • टिपू सुल्तानानाने पर्शियाच्या शासकाला लिहिलेल्या एका पत्रात हनुमान मंदिर पाडून ही मशीद बांधल्याचे सांगितले होते. 
 • मशिदीच्या आत तत्कालीन होयसाळ साम्राज्याची चिन्हे आहेत.
 • तसेच मशिदीच्या स्तंभांवर शिलालेख आढळतात त्यावर हिंदू श्लोक लिहिलेले आहेत हाच एक मोठा पुरावा असल्याचं देखील मंजुनाथ सांगतात.

याशिवाय काली मठातील ऋषी कुमार स्वामी नावाच्या आणखी एका व्यक्तीने दावा केला आहे की, १७८४ मध्ये मूळ असलेले हनुमान मंदिर मंदिर पाडण्यात आले आणि त्या जागेवर टिपू सुलतानने मशीद बांधली. या ऋषी कुमार नावाच्या व्यक्तीने टिपू सुलतानच्या काळात हनुमान मंदिराचे मशिदीत रूपांतर झाले दावा करत मशीद पाडण्याची धमकी दिली होती त्यामुळे त्यांना तुरुंगवास झाला होता सद्या ते जामिनावर आहेत. 

असो तर या सगळ्या पुराव्यांच्या आधारे या मशिदीच्या आवारात हिंदूंना पूजा करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी या हिंदुत्ववादी संघटनांनी केलीय तर यांच्यापासून संरक्षण मिळावं यासाठी मशिदीच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे संपर्क साधलाय.

या मशीदबाबत अशी माहिती मिळतेय, 

ही मशीद मस्जिद-ए-आला श्रीरंगपट्टनच्या किल्ल्यात बांधलेली आहे. विजयनगर साम्राज्याच्या काळात येथे हिंदू मंदिर बांधले गेले होते असे मानले जाते. सध्या येथे मदरसा सुरू आहे. 

कर्नाटकचे माजी मंत्री के ईश्वरप्पा यांचं म्हणणं आहे की, येथे बांधलेली ३,६०० मंदिरे मुघल राजवटीत पाडण्यात आली होती आणि त्याजागी त्यांच्या मशिदी बांधल्या गेल्यात. त्यामुळे ही सर्व मंदिरे हिंदूंच्या ताब्यात द्यावीत, असा दावा ईश्वरप्पा यांनी केलाय.

आता याची राजकीय बाजू पाहूया, कर्नाटकात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहेत.

श्रीरंगपट्टण म्हणजे कर्नाटकातील अयोध्या….

जिथे या मशिदीचा वाद सुरु झाला ते भाजपसाठी श्रीरंगपट्टण महत्त्वाचे आहे. श्रीरंगपट्टण हे कर्नाटकातील अयोध्या म्हणून ओळखले जाते. कारण येथे जनता दल पक्षाचे प्राबल्य आहे. त्यात मांड्या जिल्ह्यातील श्रीरंगपट्टण हा वोक्कलिगा समाजाचा बालेकिल्ला आहे. 

इथे म्हणावं तितकी भाजप स्ट्रॉंग नाहीये. या भागात भाजप आपला पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्षाचे कार्यकर्ते येथे प्रचाराचे मुद्दे निर्माण करण्याच्या कामाला लागलेत. त्याचमुळे आता जामा मशिदीच्या प्रकरणाच्या वादाचा संबंध काही जण आगामी निवडणूकीच्या प्रचाराशी जोडत आहेत.

काहीही असो मात्र आता ज्ञानवापी मशिदीच्या वादानंतर एक-एक मशिदीच्या अन मंदिरांच्या वादाची भर पडतेय अन देशातील धार्मिक अन् सामाजिक अखंडतेला सुरुंग बसतोय हे ही तितकंच खरंय.

हे ही वाच भिडू :

 

2 Comments
 1. Kishor misal says

  बोल भिडू इसवी सन जरा नीट टाका 1982/1784नेमका इतिहास काय आहे…..???8788590751

 2. Kishor misal says

  Hi

Leave A Reply

Your email address will not be published.