विरोध म्हणून रेल्वे जाळातायेत, १ रेल्वे जाळली की सरकारचं किती नुकसान होतं माहिताय का.?

आपल्या इथे कोणतं पण आंदोलन असुदया, सरकारवर राग काढायचं म्हणलं की सार्वजनिक आस्थापणांची तोडफोड ठरलेलीये. आणि यातही पहिला नंबर लागतो तो म्हणजे आपल्या भारतीय रेल्वेचा..

भारतात कुठेपण, कधीपण काहीपण मॅटर घडू द्या लोकांचा राग पहिला निघतोय तो या रेल्वेच्या डब्यांवर. आत्तापर्यंत अशा कित्येक दंगली आणि आंदोलनं झाली ज्यात रेल्वेचं अतोनात नुसकसान झालय..

देशात यावर्षी झालेल्या कोणकोणत्या आंदोलनात किती रेल्वे जाळल्या गेल्या आणि या रेल्वेमुळे भारतीय रेल्वेला कसा आणि किती तोटा झाला. 

2022 च्या सुरुवातीलाच रेल्वे भर्ती बोर्डाच्या नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज (RRB NTPC) परीक्षेचा निकाल आला आणि या निकालातील कथित अनियमिततेच्या तसेच यात झालेल्या अफरातफरीच्या विरोधात निदर्शनं सुरू असताना बिहार येथील आरा, पटना, नालंदा आणि गया येथे रेल्वे वर दगडफेक करून रेल्वे जाळण्यात आल्या. 

आणि आत्ताचं ताजच उदाहरण घ्या ना.. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या  अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध होतोय. वेगवेगळ्या ठिकाणी तरुण रस्त्यावर उतरलेत आणि सरकार विरोधातला आपला राग व्यक्त करतायेत. बर्‍याच ठिकाणी रेल्वे जाळन्यात आल्या आहेत. या आंदोलनात आत्ता पर्यन्त जवळपास 11 ते 12 रेल्वे देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जाळल्या गेल्या आहेत.

रेल्वे जाळण तसं लय सोप्पय पण त्या बनवण्यासाठी  त्या मागं किती खर्च येतो हे पण एकदा पाहिलं पाहिजे ना भिडू..

 रेल्वेच्या एका डब्याची काय किम्मत असतेय. रेल्वेची किम्मत त्याच्या इंजिन आणि डब्यांच्या प्रकारानुसार बदलत असते.

इंजिन चे तसे 3 प्रकार असतात.

डिझेल लोकोमोटीव्ह, इलेक्ट्रिक लोकोमोटीव्ह आणि स्टीम लोकोमोटीव्ह. 

आणि डब्यांचे 2 प्रकार असतात..

एक असतं ICF म्हणजे ‘इंटीग्रल कोच फॅक्टरि’ म्हणजेच आपले सर्वसाधारण डब्बे आणि दूसर असतं LHB म्हणजे ‘लिंक होफमान बच’ हे थोडेसे भारी क्वालिटीचे डब्बे असतात. जे राजधानी आणि शताब्दी सारख्या स्पेशल गाड्यांमध्ये वापरले जातात. 

डबे प्रवाशांच्या सोयीनुसार वेगवेगळ्या प्रकारचे असतात. या वैशिष्ट्यांनुसार त्यांची किंमत ठरते. ट्रेनमध्ये स्लीपर, एसी आणि जनरल हे स्वतंत्र डबे असतात.

आता आपण या साध्या डब्यांची किम्मत काय असते ते बघूया.. 

आयसीएफ च्या एका साध्या डब्याची किम्मत ही जवळपास 80 ते 90 लाखाच्या घरात असते.

तर स्लीपर कोच ची किंमत जवळपास 1 कोटीच्या वर जाते. 

आणि एसी कोच ची किंमत दीड कोटीच्या आसपास जात असते. 

तेच आता LHB प्रकारातल्या डब्यांची किंमत पाहूया..

यातल्या एका साध्या डब्याची किंमत असते जवळपास 1.80 ते 2 कोटी पर्यंत.

तर स्लीपर कोच 2 कोटी ते 2.20 कोटी पर्यंत आणि AC कोच ची किंमत जाते जवळपास 2.50 ते 3 कोटी पर्यंत.

आता ह्या झाल्या फक्त एका डब्याच्या किमती, आता आपण इंजिनच्या किमती सर्वसाधारण काय असतात ते पाहू.. 

ड्युअल मोड लोकोमोटिव्ह इंजिनची किंमत सुमारे 18 कोटी रुपये असते, तर 4500 हॉर्स पावर डिझेल लोकोमोटिव्ह इंजिन ची किंमत सुमारे 13 कोटी रुपये असते. इंजिनची किंमत त्याच्या क्षमतेवर अवलंबून असते.

आता एका आख्या ट्रेन ची किंमत काय असते ते बघू..

एका साध्या ICF रेल्वेला साधारण 18 डब्बे असतात

ह्या साध्या ट्रेन ची किंमत काढायची झाली तर ती इंजिन आणि डबे मिळून जवळपास 35 ते 40 कोटींच्या घरात जाते.

आणि थोड्या भारी म्हणजे एक्स्प्रेस ट्रेन ची किंमत काढायची झाली तर ती  इंजिन आणि डबे पकडून साधारणपणे जाते 65 ते 70 कोटींच्या घरात..

तर अशा ह्या कोटींच्या घरात जाणार्‍या रेल्वेच्या किमती असतात. आणि कोणत्याही आंदोलनाच्या वेळी  ह्या रेल्वेलाच पहिलं लक्ष केलं जातं,2020 21 ह्या आर्थिक वर्षात रेल्वे जवळपास 35,421 चा तोटा सहन करतीये. आधीच तोट्यात असणारी ही रेल्वे वरवर होणार्‍या अशा आघातांमुळे आणखीनच तोट्यात चाललीये, ह्याच भान प्रतीक भारतीयाला जेव्हा येईल तेव्हा तो सुदिन असेल..!

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.