असं म्हणतात की नेहरुंच्या बहिणीला पण सुभाषबाबू जिवंत असल्याची माहिती होती

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आझाद हिंद फौजेचं नेतृत्व करणाऱ्या सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू आजसुद्धा एक रहस्यच आहे. या मुद्द्यावरून वारंवार राजकीय विश्लेषक आणि विचारवंतांमध्ये वादविवाद होताना दिसतात. नेताजी सुभाषचंद्र बोस नेमक्या कोणत्या परिस्थितीत गायब झाले? त्यांचा मृत्यू कसा झाला? त्यांच्या मृत्यूच्या बातमीवर अनेक जण विश्वास का ठेवत नाहीत? त्याबद्दल अनेक थियरी सुद्धा अस्तित्वात आहेत.

बऱ्याचदा नेताजींच्या मृत्यूबाबत नेहरूंना ब्लेम केल्याच दिसतं. नेहरूंच्या बहीण विजयालक्ष्मी पंडित यांना ही नेताजींच्या मृत्यू बाबत काहीतरी माहीत होतं अस सांगितलं जातं.

या थियरीला सुरुवात होते दिनांक १८ ऑगस्ट १९४५ रोजी. या दिवशी सुभाषचंद्र बोस यांचा हवाई दुर्घटनेत मृत्यू झाल्याची बातमी देण्यात आली. या बातमीवर संशय घेण्यात आला. त्याच मुख्य कारण म्हणजे दुर्घटनेत सुभाषबाबूंच शव मिळालं नाही. दूसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा अपघात तैवान नजिक झाल्याच सांगण्यात आलं पण तैवान सरकारच्या कागदपत्रांमध्ये कुठेही त्या दिवशी हवाई अपघात झाल्याची नोंद नाही.

या घटनेचे एकमेव साक्षीदार होते कर्नल हबीबूर रेहमान. ते या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सोबत होते. अपघाताची बातमी समजताच ते अपघात झाल्याच्या ठिकाणी गेले. तिथे काढण्यात आलेले फोटो त्यांनी पुरावा म्हणून दाखल केले. एकूण सहा फोटो जमा करण्यात आले. ज्यामध्ये फक्त विमानाचा कचरा होता. जो भाग फोटोमध्ये होता तो डोंगराळ होतो व ज्या ठिकाणी अपघात झाल्याच सांगण्यात येत होतं तिथे डोंगराळ भाग नव्हता. एका फोटोत खुद्द कर्नल हबीबूर रेहमान खुर्चीवर बसल्याचं दिसत होतं. त्यांच्या शेजारी जे शव होतं ते सुभाषचंद्र बोस यांच असल्याचा दावा त्यांनी केला.

एकमेव साक्षिदार म्हणून त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूची माहिती आझाद हिंद सरकारचे सुचना मंत्री एस ए नायर, रशिया आणि अमेरिकेचा गुप्तचर विभाग आणि शाहनवाज समितीला दिले. विशेष म्हणजे या सर्व ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या साक्षी दिल्याने त्यांच्याबद्दल संशय व्यक्त केला जातो.

नेमका काय संशय व्यक्त केला जातो.

नेताजींचा मृत्यू झाला नसेल तर त्यामागे ब्रिटीश गुप्तचर संस्थेचा हात असावा किंवा रशियाच्या मदतीने त्यांना रशियात नेवून फाशी देण्यात आली असावी अशी थेअरी मांडण्यात येते. त्याचबरोबरीने कोणालाही कळून न देता तेच गुमनामी बाबा या नावाने फैजापूरला येवून राहिले होेते असही सांगण्यात येत. तांश्कद कराराच्या वेळी शास्त्रींसोबत खुद्द सुभाषचंद्र बोस उपस्थित होते आणि त्यांची माहिती शास्त्रींना झाल्यानंतर त्यांचा देखील रहस्यमय पद्धतीने खून झाल्याची थियरी मांडण्यात येते.

पहिला प्रश्न हा निर्माण होतो की जर गुमनामी बाबा हेच सुभाषचंद्र बोस होते तर ते समोर का आले नाही ?

याबद्दल अस सांगण्यात येत की त्यांना जिवितेचा धोका होता. हा धोका दूसऱ्या तिसऱ्या कुणाकडून नाही तर भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडून होता. सुभाषचंद्र बोस जिवंत असतील तर ते आपल्या नेतृत्वाला स्पर्धक ठरू शकतात अशी भिती नेहरूंना असल्याने त्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्यावर पाळत ठेवली होती. अस सांगितलं जातं पण याला कोणत्याच गोष्टींचा आधार नाही.

२०१५ साली IB अर्थात इंटेलिजन्स ब्युरोच्या दोन फाईल सार्वजनिक झाल्या. यामध्ये IB मार्फत स्वातंत्र्यानंतर वीस वर्ष सुभाषचंद्र बोस यांच्या कुटूंबाची हेरगिरी केली होती हे स्पष्ट झालं. यानंतर मोठ्ठा वाद निर्माण झाला. नेताजींच्या कुटूंबाची हेरगिरी करण्याची गरज काय असा प्रश्न पडला.

याला आधार म्हणून नेहरूंना नेताजी परत येण्याची भिती होती म्हणून त्यांनीच नेताजींच्या कुटूंबावर पाळत ठेवली असल्याचं सांगण्यात आलं.

२०१५ सालच्या फेब्रुवारी मध्ये RTI कार्यकर्ते सुभाष अग्रवाल यांनी नेतांजीच्या मृत्यूसंबधित फायली सार्वजनिक करण्याची मागणी केली. त्यावर हे कागदपत्रे उघड झाल्यास दोन देशांमधील संबध ताणले जावू शकतात अस सरकारकडून सांगण्यात आलं. हा देश कोणता असेल?

याबद्दल सुब्रम्हण्यम स्वामी असा दावा करतात की,

आझाद हिंद सेनेच्या पराभवानंतर नेताजी रशियात गेले तेव्हा स्टॅलिनने त्यांना बंदी केलं. त्यांना अटक करण्यात आली. नेहरूंच्या सांगण्यावरुन स्टॅलिनमार्फत त्यांना रशियाच्या सायबेरिया प्रांतात फाशी देण्यात आली. मात्र नेहरूंचा स्टॅलिनवर विश्वास नव्हता. स्टॅलिन सुभाषबाबूंना सोडून देईल अशी भिती वाटत असल्यानेच त्यांनी नेहरूंच्या घरावर पाळत ठेवल्याचा दावा सुब्रम्हण्यम स्वामी करतात.

पण नेहरु चर्चेत आले त्याला कारण होत विजयालक्ष्मी पंडित. असं बऱ्याच मीडिया रिपोर्टस मध्ये म्हंटल जातं.

विजया लक्ष्मी पंडित १९४७ ते १९४९ दरम्यान रशिया मध्ये भारताच्या राजदूत म्हणून काम करत होत्या. रशियाची राजधानी मॉस्को मध्ये रामकृष्ण मिशन कार्यरत होते. त्यावेळी मिशनचे रशिया मधले प्रमुख होते स्वामी ज्योतिरूपानंद. एकेठिकाणी त्यांनी म्हंटल्याप्रमाणे,

विजयाला काही रशियन अधिकारी घेऊन गेले होते. त्या अधिकाऱ्यांनी विजयाची भेट सुभाष बाबूंशी घालून दिली. एक दरवाजाच्या छोट्या छेदातुन विजयाने सुभाषला बघितलं.

त्यानंतर जेव्हा विजयालक्ष्मी भारतात आल्या. त्यांनी याबाबत भारत सरकारला माहिती ही दिली होती. मात्र त्यावर कोणतीच ऍक्शन घेतली गेली नाही. शेवटी तेव्हा म्हंटल्या की,

माझ्याकडे अशी एक बातमी आहे ज्यामुळे भारतात मोठी खळबळ माजेल. कदाचित भारताच्या स्वातंत्र्यापेक्षा ही मोठी खळबळजनक बातमी ठरु शकते.

पण असं म्हंटल जात की ही बातमी बाहेर पडू नये म्हणून नेहरूंनीच त्यांना मनाई केली होती. ही बातमी कधी बाहेरच आली नाही. नक्की ती सुभाष बाबूंशी संबंधितच होती का याबाबत ही काही माहिती कळायला मार्ग नाही.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.