युट्युब व्हिडीओ पासून सुरु झालेली कंपनी आज ऑनलाईन एज्युकेशन सेक्टर मध्ये टॉपला आहे

यवतमाळ जिल्ह्यातील एका खेड्यात केम्ब्रिज अफिलेटेड शाळा सुरु झालीये. तेव्हा जरा विचार करायला लागलो. आता पालक आपल्या मुलांच्या शिक्षणाबाबत किती जागृत झाले आहेत. आपल्या मुलांना चांगलं आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण मिळावे यासाठी किती आग्रही आहेत.

अशा मुलांसाठी ऑनलाईन एज्युकेशन सेक्टर मध्ये मोठ्या कंपन्या उतरल्या आहेत. बायजुच बघा ना. फुटबॉल वर्ल्डकपसारख्या मोठ्या इव्हेंटला कंपनी स्पॉन्सर करतीये. ऑनलाईन एज्युकेशन देणाऱ्या अनेक फ्लॅटफॉर्मचे पर्याय तुमच्या आमच्या समोर उभे आहेत.

अनअकॅडमी पहा ना,

त्याचा  फाउंडर हा काही मोठ्या उद्योजकाच्या घरातून येत नाही किंवा आयआयटी सारख्या मोठ्या कॉलेज मधून सुद्धा शिकलेला नाही. मुंबईतील एका सध्या इंजिनियरिंग कॉलेज मध्ये शिक्षण घेऊन अनअकॅडमी सारखा प्लँटफॉम उभा केलायं.

देशातील ऑनलाईन एज्युकेशन देणाऱ्या टॉपच्या कंपनीत अनअकॅडमी नाव घेतलं जातंय. फेसबुक, बन्सल बांधव यासारख्या मोठ्या कंपन्यांनी अनअकॅडमीत इन्व्हेस्टमेंट केलीये. एका युट्युब चॅनल पासून सुरु झालेला कंपनीचा प्रवास हा आता ११ हजार कोटींपर्यंत येऊन पोचला.

गौरव मुंजाल या तरुणाच्या डोक्यातून आलेली संकल्पना म्हणजे

अनअकॅडमी,

२०१० मध्ये गौरवने आवड म्हणून आपल्या युट्युब चॅनेलवर ग्राफिक्स संदर्भात एक व्हिडीओ उपलोड केला होता. आपण केलेलं काम मित्रांपर्यंत पोहचविण्यासाठी गौरवने हा प्रयोग केला होता. तेव्हा गौरव इंजिनीयरींगचे शिक्षण घेत होता.

गौरवचा हा व्हिडीओ युट्युबवर चांगला चालला. त्यामुळे गौरवाने अजून व्हिडीओ आपल्या चॅनेलवर टाकायला सुरुवात केली. त्याला कळलं खरं मार्केट तर इकडे आहे. हे व्हिडीओ तयार करतांना गौरवने अजून डोकं लढवला आणि रियल इस्टेट एक कंपनी सुरु केली. ती लगेच म्हणजे २०१४ ला कॉमनफ्लोर कंपनीला विकून टाकली.

ग्राफिक्सच्या व्हिडीओला मिळालेला प्रतिसाद पाहून गौरवने एज्युकेशन टेक्नॉलॉजी कंपनी सुरु करायचा विचार सुरु केला. ही गोष्ट त्यांनी आपला मित्र रोमन सैनी ला बोलून दाखवली. रोमन सैनी हे २०१३ मध्ये आयएसएस बनले होते. उत्तरप्रदेश मधील जबलपूर येथे त्यांना उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली होती.

आपल्या देशात आयएएस होणं सोपं नाही. अवघ्या २२ व्या वर्षी रोमन सैनी हे परीक्षा पास झाले होते. सैनी हे मुंजाळ यांच्या संपर्कात होते. मुंजाळ याने अनअकॅडमीची संकल्पना सैनी यांना बोलून दाखविली. मुंजाल ही कन्सेप्ट सैनी यांना आवडली.

जबलपूर येथे असतांना सैनी यांनी शिक्षणाची परिस्थिती जवळून पाहिली होती. यात काही तरी करावं अशी इच्छा असणाऱ्या सैनी यांनी आयएएस पदाचा राजीनामा दिला आणि गौरव मुंजालसोबत २०१५ अनअकॅडमीची सुरुवात केली. सैनी आणि मुंजाल सोबत त्यांचा अजून एक इंजिनिअर मित्र होता. हिमेश सिंग.

कंपनीकडे एखाद्या लहान राज्याच्या लोकसंख्येपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची नोंद आहे. त्यांची संख्या साधारण ४ कोटींच्या जवळपास आहे. इथं कमी अधिक नाही तर १४ भाषांमध्ये शिकवले जाते. देशातील ५ शहरातील मुलं अनअकॅडमीला जोडली गेली आहेत.

एका युट्युब चॅनेलपासून सुरु झालेल्या कंपनीचं व्हॅलूवेशन हे साधारण ११ ते १४ हजार कोटी असल्याचे सांगण्यात येत.

इथपर्यंत अनअकॅडमीने पोहचली कशी. तिचं आर्थिक मॉडेल कसं चालत

  • कंपनीचा मुख्य आर्थिक स्रोत हे पेड सबस्क्रिप्शन आहे. मर्यादित सराव चाचण्या फ्री आहेत. त्यानंतर त्या सराव चाचण्यासाठी पैसे पेड करावे लागतात.
  • अनअकॅडमीने २०२१ मध्ये Releve नावाचा एक प्लँटफॉर्म तयार केला होता. त्यात अर्ज केल्यानंतर १५ दिवसात नोकरीची हमी देण्यात आली होती. त्यांनी क्लेम केला आहे की, Releve चा वापर करून त्यांनी २ लाख ३५ हजार तरुणांना नोकरी मिळवून दिली आहे. १०० टक्के प्लेसमेंट रेट राहिला आहे.

 

  • युट्युब चॅनल
  • अनअकॅडमीचे २० पेक्षा जास्त युट्युब चॅनेल आहेत. त्यातील काही चॅनेलचे सबस्क्रायबर हे १० लाखांपेक्षा जास्त. सगळ्या चॅनेलचा विचार केला ३ अब्ज सबस्क्रायबर आहेत. यातून अनअकॅडमी मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होतो.

२००१ मध्ये कोण बनेगा करोडपतीच्या शोचा होस्ट शाहरुख खान होता. एका १० वर्षांच्या मुलाने चिठ्ठी पाठवून भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याला शाहरुख खानला काही भेटता आलं नाही. त्यावेळी त्या १० वर्षांच्या मुलानं मनोमन ठरवलं होत. कर्तृत्वाने मोठं नसल्याने आपल्या आज शाहरुखला भेटतात आलं नाही. मोठं होऊन शाहरुख नक्की भेटू. मध्ये १०-१५ वर्ष गेली. गौरव मुंजाल शाहरुख खानाला भेटला आणि हा किस्सा त्याला सांगितलं.

मोठ्या व्यक्तीची भेट घ्यायची असेल तर ती कर्तृत्वाने मिळते हे अनअकॅडमीचा फाउंडर असणाऱ्या गौरव मुंजाल याने दाखवून दिले आहे.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.