हेमा मालिनीच्या गालाची तुलना रस्त्याबरोबर करायचा पॅटर्न खुद्द लालू यादवांचा आहे.. !

कह तो दें हम उनके कान में राज की बाते सभी

पर कान के पास उनके वो गुलाबी गाल भी तो है। 

गुलाबी गालांवर भाळणारे अनेक शायर असतात. ते या हे गुलाबी गालांना कशाची उपमा देतील  सांगता यायचं नाही. आणि मग अशा उपमा आणि उपाध्यांमुळे गोत्यात यायला वेळ लागत नसतो. आता या गुलाबी गालांनी आमच्या गुलाबरावांना पण गोत्यात आणलंय. आणि हे गुलाबी गाल साधे सुधे नाहीत बरं का ! हे गुलाबी गाल आहेत साक्षात 

स्वप्नसुंदरी हेमा मालिनी यांचे..

त्याच झालं असं होत कि,

जळगाव जिल्ह्यातल्या नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीला जोर आलाय. तिथंच असणाऱ्या बोदवड नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेच्या गुलाबरावांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. भाषण करताना असताना भावनेच्या भरात गुलाबराव पाटील 

माझ्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनींच्या गालासारखे केलेत. आणि हेमा मालिनीच्या गालासारखे रस्ते दिसले नाहीत तर राजीनामा देईन. 

यावरुन आत्ता वादंग सुरु असला तरी भिडूंनो ही हेमा मालिनीच्या गालांची गोष्ट इसवीसन २००५ च्या काळातली आहे. आणि या गोष्टीतले मेन हिरो आहेत लालूप्रसाद यादव. 

full

त्यांनी हेमा मालिनीच्या गालाची तुलना रस्त्याबरोबर केली होती ते पण तिच्यावर असणाऱ्या प्रेमाखातर. भले ही लालू प्रसाद यादव आज राजकारणात सक्रिय नसतील. पण त्यांच्या राजकारणाचे किस्से बिहारच्या गल्यागल्यांमध्ये चवीचवीने सांगितले जातात. त्यातलाच एक किस्सा हेमा मालिनीवरच्या प्रेमाचा आणि तिच्या गालाची उपमा रस्त्याला दिल्याचा. 

२००५ मध्ये लालू प्रसाद यांच्या मतदारसंघात रस्ते पूर्णपणे खड्डेमय झाले होते. खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे हे समजायला मार्ग नव्हता. त्यावेळी त्यांच्या मतदारसंघातल्या एका नेत्याने टीका केली होती की, 

लालूंच्या कृपाशीर्वादाने बिहारचे रस्ते ओमपुरींच्या गालासारखे झाले आहेत. 

यावर लालू आपल्या खास शैलीत उत्तर देताना म्हंटले की, 

आपण हे खड्डेमय रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे करू. 

झालं तेव्हा हा रस्त्यांचा वादच रंगला. दुसरं विशेष असं काही घडलं नाही. पण २०१६ मध्ये एका कार्यक्रमात लालू हेमा मालिनींन समोर लाजत म्हंटले, 

हेमा मालिनी मेरी फैन हैं तो मैं उनका एयरकंडीशनर हूं।

आणि तेव्हापासून लालू हेमा मालिनीवर किती जीव ओवाळून टाकतात याचे किस्से समोर यायला लागले. २०१६ मध्ये बिहार चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचा एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात परफॉर्मन्स सादर करण्यासाठी हेमा मालिनीला आमंत्रण धाडण्यात आलं. त्यांच्यासोबत शत्रुघ्न सिन्हा यांना सुद्धा कार्यक्रमात बोलावलं होतं. 

कार्यक्रमात हेमा मालिनीचा डान्स झाला. डान्स बघून लालू जाम चेकाळले. त्यांनी कार्यक्रमाच्या शेवटी मंचावर सत्काराला जाऊन हेमा मालिनीवर आपण किती प्रेम करतो हे सगळ्यांदेखत सांगून टाकलं. ते म्हंटले, 

मैं आपसे प्यार करता हूं और इसी प्यार के कारण मैंने अपनी बेटी का नाम भी हेमा रखा है। और अगर धर्मेंद्र हम लोगों के भइया हैं तो आप हमारी भाभी हुईं।

आणि हे सगळं बोलणं लाजत लाजत सुरू होत. हेमा मालिनी यावर खळखळून हसल्या. लालूंची पोर पण मंचावर होतीत. पोरं लाजेने चक्काचूर झाली होती. काय करणार शेवटी पप्पा आहेत म्हणत गप बसली. 

आता हे उघड उघड झालं काय ! तरी पण लालू म्हणे की मी काय रस्त्याची तुलना हेमा मालिनीच्या गालाशी काय केली नाही. त्यात त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर ब्लेम ढकलला. न्यूज 24 चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ते म्हंटले की,  

अटल बिहारी वाजपेयी चुटकी लिया करते थे। ये अटल जी का बयान था। अटल जी ने चुटकी लेते हुए उत्तरप्रदेश में कहा था कि लालू यादव बोलते हैं कि बिहार में सड़क हेमा मालिनी के गाल जैसा बना देंगे।

 पण आता काय ? किती जरी म्हंटल तरी हेमा मालिनी आणि रस्ते हे समीकरण बनलेलं आहेच. त्यामुळे या गुलाबी गालांच्या नादात बरेचसे नेते टीकेचे धनी झालेत एवढं मात्र खरं.  

Leave A Reply

Your email address will not be published.