प्लेबॉय मॅगझिनवर इंडियन मॉडेलला बघण्याची तरुणांची इच्छा शार्लिन ने पूर्ण केली

‘थ्री इडियट्स’ चित्रपट माहितीये ? असो, ज्याला हा चित्रपट माहित नाही असा तरुण भारतात शोधायला जाणं म्हणजे निव्वळ वायफळ गोष्ट, मूर्खपणा. आता हा चित्रपट म्हटल्यावर मैत्री, कॉलेज लाईफ, प्रेम अशा सगळ्या गोष्टी जाणवतात सोबतच ‘तारुण्य’ ही गोष्टही तेवढीच प्रकर्षाने जाणवते. यामध्ये ‘चतुर’ हा पोरांचा मसीहा दाखवलाय, जो ऐनपरीक्षेच्या रात्री अभ्यासाने डोळे नाही तर ‘बेड’ ओले करण्याचं काम करतो. मसीहा यासाठी म्हटलं की, जरी पोरांना भरकटवुन तो टॉप करणार असतो तरी सेक्सी पोरींचे फोटो असलेल्या मॅगझिन्स पोरांना फुकट वाचायला मिळाल्याने चांदी तर होतेच ना!

आता या मॅगझिन्समध्ये काय असतं ? हे काही नवीन सांगण्याची गरज नाय. कारण या गोष्टीची मुळात ओळखच अशी हाय, करायचं सगळं पण बोलायचं काहीच नाय. प्रत्येकानेच आयुष्याचे हे क्षण अनुभवले असतीलच आणि काही तर अनुभवत असतील. ही मॅगझिन्सची दुनियाच अशी असते राव!

अशा सेक्सी मॅगझिन्सचं नाव घेतलं आणि त्यात ‘प्लेबॉय’चं नाव आलं नाही ते तर अशक्यच.

अनेकांचा एकाकीपणा आणि आयुष्यातली कोरड दूर करत ‘आयुष्यात ओलावा’ निर्माण करण्यात या प्लेबॉय मॅगझिनच्या मोठा वाटा आहे. कित्येक दशकं या मॅगझिनने ‘जनहिताचं’ कार्य केलं होतं. मॅगझिनच्या कव्हर पेजपासूनच याची सुरुवात व्हायची. प्लेबॉयच्या कव्हर पेजवर येणं म्हणजे खूप मानाची गोष्ट. हा मान मिळवण्यासाठी मॉडेल्समध्ये एक गोष्ट असणं बंधनकारक, ती म्हणजे ‘न्यूड फोटोज देण्याची तयारी’. 

आता जगभरात फेमस असलेल्या या मॅगझिनमध्ये नेहमीच परदेशी मॉडेल दिसायच्या. पण एखाद्या भारतीय मॉडेलला यावर बघण्याची सुप्त इच्छा प्लेबॉयच्या प्रत्येक भारतीय चाहत्यात होती. 

या सगळ्यांची ही इच्छा पूर्ण केली ती ‘शर्ल‍िन चोप्राने’. 

नावात काय ठेवलंय असं आपण म्हणतो पण शर्ल‍िन चोप्राचं नावचं पुरेसं आहे. आजही अनेकांच्या ‘कसंकसं होतं’ या शब्दाचा अर्थ म्हणजे शर्ल‍िन चोप्रा असं उत्तर देता येऊ शकतं. अशा या शर्ल‍िनने प्लेबॉयच्यासाठी न्यूड फोटोज देऊन देशभरात चांगलीच खळबळ माजवली होती. २०१२ चं ते वर्ष होतं, जेव्हा शर्लिनने अनेक वैचारिक पाश तोडत, समाजाच्या शब्दांशी बेधडक भिडत भारताच्या इतिहासात आपलं नाव कोरलं आणि प्लेबॉय मासिकासाठी न्यूड पोज देणारी ‘पहिली भारतीय मॉडेल’ बनली.

शर्लिन काही नेहमीच अशी बिंदास नव्हती. लहानपणी आत्मविश्वासाची खूप कमतरता तिच्यात होती आणि कळायचा तो फक्त अभ्यास. तिला पार्ट्यांमध्ये जाण्यात किंवा प्रवासात रस नव्हता. डोळ्यावर जाड चष्मा असलेल्या मुलीला एकही मुलगा पसंत करायचा नाही. अशा या शर्लिनच्या जीवनात टर्निंग पॉईंट आला जेव्हा ती फक्त १५ वर्षांची होती. या वयात शर्लिन चोप्राने स्वतःचा मेकओव्हर करण्याचा निर्णय घेतला.

तिने तिच्या फिगरवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. नेहमी स्वतःला कमी लेखनाऱ्या मुलीत तिच्या  फिगरवाल्या शरीराने आत्मविश्वास आला. हळूहळू तिने आपला दृष्टीकोन बदलला आणि १९९९ मध्ये ‘मिस आंध्रा’ची पदवी घेतली. मात्र, त्यानंतर तिची वाचन-लेखनाची आवड निघून गेली. हे जेतेपद शर्लिनसाठी मॉडेलिंग जगतात एक पाऊल टाकणारे ठरले. फोटोशूट, रॅम्प-वॉक आणि ब्रँड एंडोर्समेंटद्वारे स्वतःसाठी एक स्थान निर्माण केलं. त्यानंतर शर्लिनने फिल्मी दुनियेत नाव कमवायचं ठरवलं.

२००२ मध्ये शर्लिनने ‘वेंडी मब्बू’ या तेलुगु चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर ती इतर अनेक तेलुगु आणि एका इंग्रजी चित्रपटात दिसली. तर २००५ साली शर्लिनने ‘टाईमपास’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच सिनेमात तिने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. यानंतर ‘नॉटी’ आणि ‘दोस्ती’ सिनेमे केले. या सिनेमातही तिने दमदार अभिनय केला होता. शर्लिन चोप्राला यश चोप्रांनी पसंत केलं आणि ‘दिल बोले हडिप्पा’ हा चित्रपट साईन केला. पण हा चित्रपट चालला नाही, मात्र या चित्रपटामुळे लोक ओळखू लागले.

सोबतच बी-ग्रेड चित्रपटांतही ती झळकली होती. 

मग उजाडलं ते साल जे शर्लिनच्या करिअरमधील सर्वात बंडखोर भूमिकेसाठी आजही ओळखलं जातं. २०१२. याच वर्षाने शर्लिनला अजरामर ओळख देखील मिळवून दिली. शर्लिन चोप्रा आंतरराष्ट्रीय मासिक प्लेबॉयसाठी ‘न्यूड’ (नग्न) फोटोशूट करणारी पहिली भारतीय ठरली. त्यानंतर केवळ भारतातच नाही तर जगभरातील तिच्या चाहत्यांची यादी तयार झाली.

या घटनेनंतर शर्लिन चोप्रावर बराच वाद झाला होता. मात्र शर्लिनने त्याला फुल कॉन्फिडन्सने तोंड दिलं. यावेळी तिचा अनुभव सांगताना ती म्हणाली होती, “कॅमेरासमोर नग्न होणं आणि त्याच वेळी चांगलं दिसणं हे सोपं काम नाही. प्रसिद्ध प्रौढ मासिकासाठी कपडे काढणं हे रूढीवादी परंपरेपासून मुक्त होण्यापेक्षा कमी नाही”, असं शर्लिन म्हणाली होती.

मात्र याचा एक वाईट परिणाम झाला. या घटनेनंतर शर्लिन तिचं फिल्मी करिअरही सांभाळू शकली नाही आणि मग ती तिच्या बोल्ड फोटोशूट आणि व्हिडिओंद्वारे चर्चेत येऊ लागली. सोबतच अनेक चित्रपटांमध्ये छोट्या-छोट्या भूमिका करताना दिसली. रुपेश पॉल दिग्दर्शित कामसूत्र 3D या चित्रपटात शर्लिन चोप्राला मुख्य भूमिका मिळाली होती. मात्र दिग्दर्शकासोबत वाद झाल्याने तिला रिप्लेस करण्यात आलं.  

त्यानंतर ती चोप्राने बिग बॉस  (सीझन ३)आणि स्प्लिट्सविला सारख्या टीव्ही शोमध्ये देखील दिसली होती. मात्र इथेही ती वादात सापडली. तिने बाथरूममध्ये कॅमेरा बसवण्याची मागणी केली होती, ज्याला निर्मात्यांनी नकार दिला होता. शोच्या २७ व्या दिवशी तिला शोमधून बाहेर काढण्यात आले. मात्र बिग बॉसच्या घरात तिची एंट्री म्हणजे तिला घराघरात नाव मिळालं. 

तरुणांपासून ते वयोवृद्धांमध्ये आपल्या कामुक अदांनी सर्वांना मोहित करणाऱ्या शर्लिनने खऱ्या आयुष्यातही अनेकांना ‘स्वर्गसुख’ दिलं असल्याचं तिने सांगितलंय. एका मुलाखतीत तिने सांगितलं होतं की, पैसे घेऊन अनेकांच्या रात्री तिने रंगवल्या आहेत. तिला ‘वॉलपेपर क्वीन’ म्हणूनही ओळखलं जातं. तिचे बरेच फोटोही डाउनलोड केले जातात.

अशी ही वादग्रस्त राणी नुकतंच ३८ वर्षांची झाली. सध्या ती मुंबईमध्ये राहात असून नेहमीच आपल्या चाहत्यांना तिच्या कामुक फोटोजने खुश करत असते. इंस्टाग्राम, ट्विटर अशा सोशल प्लॅटफॉर्म्सवर तिला मोठ्या प्रमाणात फॉलो केलं जात असून अजूनही तिची क्रेझ कायम आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.