न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी आपल्या जनतेला ‘सॉरी’ म्हणायची हिंमत दाखवलीय !
सॉरी! हा जगातला सगळ्यात अवघड शब्द असल्याचं अनेकांनी म्हंटलंय. तेही खरचं आहे म्हणा. कारण एखाद्याने चुकी केली तर आपण भलं मोठं भाषण त्याला झाडतो. पण जर तीच चूक आपण केली तर साधा सॉरी शब्द म्हणायला सुद्धा आपली जीभ कतरते. पण इथं एका पंतप्रधानानचं आपल्या देशाच्या जनतेला सॉरी म्हटलंय.
ऐकायला थोडं विचित्र वाटेल पण, हो न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा अर्डर्न यांनी आपल्या देशातल्या अल्पसंख्याक लोकसंख्येची माफी मागितलीये.
आता थेट पंतप्रधानान सॉरी म्हटलंय म्हणल्यावर काहीतरी मोठं कारण जरूर असणार.
तर जॅसिंडाने तिच्या देशात राहणाऱ्या पॅसिफिका लोकांची सत्तरच्या दशकात झालेल्या अत्याचाराबद्दल अधिकृतपणे माफी मागितलीये. न्यूझीलंडमध्ये पॅसिफिका लोक फक्त ७.४ टक्के आहेत. पण तरीही जॅसिंडाने आपल्या जुन्या नेत्याच्या चुकांसाठी या जनतेची माफी मागितलीये.
काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडची राजधानी ऑकलँडच्या टाऊन हॉलमध्ये एक कार्यक्रम आयोजित केला, ज्यात जहरी लोकांची उपस्थिती होती. यावेळी पंतप्रधान जॅसिंडाने १९७० च्या दशकात झालेल्या ‘dawn raids’ प्रकरणासाठी सगळ्यांना ‘सॉरी’ म्हंटल.
काय आहे नेमकं प्रकरण ?
आता पॅसिफिका लोक म्हणजे ते अनेक वर्षांपूर्वी पॅसिफिक बेटांवरून न्यूझीलंडमध्ये स्थलांतरीत झालेले लोक. सत्तरच्या दशकात त्यांच्या विरोधात ‘डॉन रेड्स’ नावाची मोहीम सुरू झाली.
व्हिसापेक्षा जास्त काळ न्यूझीलंडमध्ये राहण्याच्या नावाखाली त्यांना पहाटे घरातून बाहेर काढण्यात येत होतं. त्यानंतर पोलिसांकडून छळ सुरू व्हायचा, त्यांना तुरुंगात टाकण्यात यायचं. इतर देशांच्या स्थलांतरित नागरिकांपेक्षा त्यांच्याशी अधिक गैरवर्तन केले जायचे. यातल्या काही लोकांना जबरदस्तीने हद्दपार केल्यामुळे त्यांचे कुटुंब त्यांच्यापासून दुरावले.
अश्या प्रकारची रेड न्यूझीलंडच्य दोन मोठ्या पक्षांच्या सरकारमध्ये पोलिसांकडून टाकली जायची. याची सुरुवात लेबर पंतप्रधान नॉर्मन कर्क यांच्या कार्यकाळात झाली, जी नॅशनल पार्टीच्या रॉबर्ट मुलदून यांच्या सत्तेपर्यंत सुरु होती.
१९७४ मध्ये सुरू झालेल्या अश्या रेडच्या दरम्यान न्यूझीलंड पोलीस आपल्या श्वानपथकासह या पॅसिफीका लोकांच्या घरी जायचे, जे व्हिसाच्या वेळेपेक्षा जास्त काळ राहायचे. अश्या ठिकाणी सकाळ – सकाळ जाऊन पोलीस त्यांना जागं करायची, जबरदस्तीने पोलीस व्हॅनमध्ये डांबायची. त्यांना मारहाण केली जायची. यावेळी अनेकांना तर हद्दपार करण्यात आले आणि त्यांच्या मुलांना न्यूझीलँडमध्येच सरकारी केयर होममध्ये ठेवण्यात यायचे.
तर जॅसिंडा यांनी याच प्रकरणाबद्दल जनतेची माफी मागितलीये. त्यांनी फक्त इंग्रजीतच नाही तर माओरी, तोंगन आणि सामोआन भाषेतही ही माफी मागीतली. या तीन भाषा ओशिनियामध्ये बोलल्या जातात.
न्यूझीलंड सरकारने ‘डॉन रेड्स’च्या त्या घटनांचा इतिहासाच्या पुस्तकांमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतलाय. सोबतच तिने पॅसिफिका विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्याची घोषणा केलीये.
‘मी इथं त्या लोकांची प्रतिनिधी म्हणून उभी आहे, ज्यांनी तुम्हला नुकसान पोहोचवलंय. कोणताही पाऊस समुद्राच्या पाण्यातून मीठ काढून घेऊ शकत नसला तरी, आम्हाला तुमच्या वेदना कमी करू द्या आणि हा दिवस क्षमासाठी ठेवा. “
जॅसिंडा आर्डर्न म्हणाल्या की, या छाप्यांमुळे थेट प्रभावित झालेल्यांच्या आठवणींमध्ये प्रत्येक गोष्ट कैद आहे. अधिकाऱ्यांचा गमावलेला विश्वास आणि पॅसिफिक लोकांच्या तक्रारींमध्ये सगळं काही जिवंत आहे. त्यामूळेच मी आज न्यूझीलंड सरकारच्या वतीने पॅसिफिका समुदायावर इमिग्रेशन कायद्याला भेदभावपूर्ण पद्धतीने लागू करण्याबद्दल औपचारिक माफी मागते.
अर्डर्नने म्हंटल कि, तिला पॅसिफिका समुदायासाठी “नवीन पहाट” आणायचीये. तिने न्यूझीलंडमधील पॅसिफिका विद्यार्थ्यांसाठी ३.१ न्यूझीलंड डॉलरची स्कॉलरशिप जाहीर केलीये. सोबतच पॅसिफिका कलाकार आणि इतिहासकारांना गैरव्यवहाराचे अधिकृत रेकॉर्ड तयार करण्यासाठी मदत करेल.
याआधीही अनेक राजकीय नेत्यांनी मागितलीये माफी
दरम्यान, मागच्या चुकांबद्दल माफी मागणारी जेसिंडा ही पहिली राजकारणी नाही. या वर्षी, अनेक नेत्यांनी अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात वाईट तुलसा हत्याकांडाबद्दल माफी मागितली. तसेच काही वर्षांपूर्वी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनीही कोमागाटा मारू घटनेबद्दल माफी मागितली होती.
हे ही वाचं भिडू :
- न्यूझीलंड पासून ते भाजपचे खासदार सगळ्यांची मदत फक्त युथ कॉंग्रेस करत आहे..
- मोरारजींच्या शेंगा न्यूझीलंडच्या पंतप्रधानांच्या बायकोने चखणा समजून संपवल्या आणि..
- खरच सूर्यकुमार न्यूझीलंडकडून खेळू शकतो का..? यापूर्वी कोणते खेळाडू दूसऱ्या देशाकडून खेळलेत.