जडेजाने एकच ओव्हर टाकली पण त्या ओव्हरनं चमत्कार घडवला !   

तो टीमचा हिरो होता. दिसायला चिकणा. स्टाईलिश. रणजी ट्रॉफी ज्यांच्या नावाने खेळली जाते त्या महाराजा रणजितसिंहांच्या राजघराण्यातला. त्यामुळे क्रिकेट रक्तात वाहात होत. डेथ ओव्हर्समध्ये पिटाई त्याच्यापासून सुरु झाली. फिल्डिंगमध्ये चित्त्यासारखी झेप घेत कच घ्यायचा. मधुरीसारख्या हिरोइन्स त्याच्यावर जीव ओवाळून टाकायच्या.

नाव जडेजा. आपला श्री श्री रविंद्र जडेजा नाही अजय जडेजा !

नव्वदच्या दशकाच्या पूर्वार्धात अझरूद्दीन आणि उत्तरार्धात गांगुली द्रविड यांनी राज्य केलं. सचिनचा तर तो सुवर्णकाळ होता. अशा वेळी हे सगळे तंत्रशुद्ध खेळाडू वरच्या ऑर्डरवर खेळायचे. त्यांची फेल जाण्याची वेळ खूप कमीवेळा यायची. पण दुर्दैवाने तस घडलच तर सगळी मदार असायची जडेजावरच. त्याचा एक सिग्नल ठरलेला असायचा. सुरवातीला सेट व्हायला काही वेळ घ्यायचा. पण एकदा बसला की मग समोरच्याची खैर नाही.

१९९६च्या वर्ल्डकप मध्ये खुद्द वकार युनुसची त्याने पिसे काढलेली. सचिननंतर वकारला रडवणारा तो एकमेव वाघ असेल.

पण ही आठवण त्याच्या बटिंगची नाही. त्याच्या बॉलिंगची आहे. वर्ष होतं १९९९. शारजा मध्ये भारत पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात कोकाकोला कप खेळवला जात होता. शारजाचा सुपरस्टार सचिन इन्ज्युअर्ड असल्यामुळे भारताची बटिंग जरा विक झालेली. पहिल्याच मॅचमध्ये पाकिस्तानने भारताला ११६ रनांनी हरवलेलं.

सिरीजमध्ये टिकायचं असेल तर इंग्लंडला हरवणे गरजेच होतं.

कप्तान अझरूद्दीनने टोस जिंकून पहिली बटिंग घेतली. सचिनच्या जागी आलेल्या सदागोपन रमेशने चांगली ओपनिंग केली. अझर सुद्धा फॉर्ममध्ये होता. त्याच्या बटिंग मूळ आपला स्कोर २२२ झाला. हा स्कोर त्याकाळाच्या मानाने खूप होता. कुंबळे, श्रीनाथ, वेंकटेश प्रसाद हे भारतीय बॉलर फॉर्ममध्ये होते.

इंग्लंड मात्र जिद्दीने खेळायला उतरली. नाईट आणि कप्तान अलेक स्टूअर्ट यांनी सुरुवात धडाक्यात केली मात्र श्रीनाथच्या एका बॉलवर स्टूअर्ट गंडला आणि बोल्ड झाला. त्याच्या पाठोपाठ नाईट सुद्धा आउट झाला. त्यानंतर आलेले हिक, थोर्प सुद्धा आधी आश्वासक खेळून नंतर नांगी टाकले. ८३ धावावर ४ आउट झालेल्या इंग्लंडचा पराभव नक्की वाटत होता.

पण एवढ्या सहज मॅच सोडतील तर त्याला कडू इंग्लिश खेळाडू कस म्हणायचं.

फेअरब्रदर आणि भारताचा कट्टर दुश्मन आंड्र्यू फ्लिन्टॉफची जोडी सेट झाली. एका मागोमाग रन्स जमायला लागल्या. आता ही दोघ भारताच्या तोंडातील घास काढून घेतील की काय असच वाटत होतं. अखेर प्रसादने फ्लिन्टॉफचा अडसर दूर केला पण फेअरब्रदर काही केल्या आईक्त नव्हता. शेवटच वळवळत शेपूट घेऊन तो लढतच राहिला. मॅच डेथ ओव्हर्सला गेली.

इंग्लंडला जिंकायला ४ ओव्हर मध्ये २७ रन हव्या होत्या. तीन विकेट हातात होते. शिवाय सेट झालेला फेअरब्रदर क्रीझवर होता. कुंबळे, प्रसाद, श्रीनाथ, सुनील जोशी यांनी जंग जंग पछाडूनही तो आउट होत नव्हता.

कॉमेंट्री करणार्यांनी डीक्लेर देखील केलं की मॅच आता इंग्लंडच्या साईडने झुकली आहे.

भारताचा कप्तान अझरूद्दीनच्या लक्षात आल की आता काही तरी वेगळी चाल केली पाहिजे नाही तर आपण ही मॅच हरणार.

श्रीनाथ कुंबळे,. रॉबिन सिंगची ओव्हर शिल्लक असताना त्याने बॉल जडेजाच्या हातात सोपवला. जडेजा बॉलिंग करायचा मात्र तो पार्टटाईमच्याही पार्टटाईम होता. गांगुली सारखा बरा मध्यमगतीचा बॉलर टीममध्ये असूनही अझरने काय विचार करून जडेजाला बॉलिंग दिली कळायला मार्ग नव्हता.

च्युईंगम चघळत निवांत मूडमध्ये बॉलिंग करणाऱ्या जडेजाने चमत्कार केला. दुसऱ्याच बॉलला रोबर्ट क्राफ्टला कानिटकरच्याकरवी कच आउट केलं. त्याच्या नंतरचा बॉलला तर सेट झालेल्या फ्लेअरब्रदरला चकवल आणि पार्टटाईम विकेटकीपिंग करणाऱ्या द्रविडकडे कच द्यायला केलं. जडेजा हटट्रिकवर होता.

अख्ख्या स्टेडियमला खूळ लागायची वेळ आली होती. 

 डॅरेन गॉफने तो बॉल खेळून काढला. जडेजाची हॅटट्रिक झाली नाही मात्र पुढच्या बॉलला मात्र त्याने गॉफच्या दांडक्या उडवल्या. जडेजाची ओव्हर सुरु होण्यापूर्वी ६ आउट १९६ वर असणाऱ्या इंग्लंडची स्थिती ९ आउट १९९ झाली.

मॅचला अनपेक्षित कलाटणी मिळाली होती. जडेजाने यावेळी बटने नाही पण बॉलने मॅच काढली होती. शेवटची विकेट म्हणजे फॉरमॅलीटी उरली होती. श्रीनाथच्या ओव्हरमध्ये जडेजाने त्याला सुद्धा रनआउट काढून ही विकेट सुद्धा आपल्या नावावर केली.

जडेजाने त्या पूर्ण मॅच मध्ये फक्त २१ धावा काढल्या. आणि एकच ओव्हर टाकली पण त्या एका ओव्हरने त्याला मॅन ऑफ दि मॅच केलं. 

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Blueeye says

    Jadeja was the captain….

Leave A Reply

Your email address will not be published.