बाल कलाकार असणारा सुरमा भोपाली त्या सीनमध्ये खरच दोन दिवस उपाशी होता… 

सुरमा भोपाली अर्थात सय्यद इश्ताक हुसैन जाफरी. त्याच दूसरं नाव जगदीप. या माणसाचा जन्म मध्यप्रदेशातला. आणि या माणसाचं कर्तृत्व म्हणजे अवघ्या दहा वर्षाचा असताना वडिल वारल्यानंतर तो आपल्या आईला घेवून मुंबईत संघर्ष करायला आला. 

इतक्या कमी वयात तो मुंबईत हमालीचं काम करायचा.

दिवसभर हमाली करायची, पडेल ते काम करायचे आणि चार पैसे मिळवायचे हेच त्याच्या डोळ्यासमोर असायचं. इतक्या लहान वयात त्याच्या अंगावर आईची जबाबदारी येवून पडली होती.. 

जगदीप साठी मुंबईचा हा संघर्ष रोजचा झाला होता. त्या काळात सिनेमात एक्स्ट्रा लागणारी मुलं, अभिनेते हे रस्त्यांवरूनच शोधून आणली जात. अनेक हिरो हिराईन तर रस्त्यांवरतीच सापडले होते. अशातलच नाव जगदीपच. झालेलं अस की बी.आर. चोप्रांना आपल्या अफसाना नावाच्या सिनेमात एक्स्ट्रा काम करण्यासाठी काही बालकलाकार पाहीजे होते. 

अशीच सिनेमाची मंडळी बालकलाकारांच्या शोधात बाहेर पडली होती. याच शोधात त्यातल्या एकाची नजर जगदीपवर पडली. बोलक्या डोळ्याचा दहा वर्षाचा मुलगा एक्स्ट्रा म्हणून अगदी परफेक्ट होता. 

दहा वर्षाच्या जगदीपला बी.आर. चोप्रांच्या समोर उभा करण्यात आलं. बी.आर. चोप्रांच्या समोर देखील जगदीपने आपली बडबड कायम ठेवलेली. त्याची ती बडबड ऐकून बी.आर. चोप्रा खूष झाले आणि त्यांनी जगदीपला दहा रुपयांची नोट दिली. 

दिवसभर राबून मिळालेले एक दोन पैसे आणि थेट मिळालेली इतकी मोठ्ठी रक्कम. जगदीपला कळालं या क्षेत्रात चांगले पैसे मिळतील. पण त्याचा हा अंदाज खूपच कमी काळ टिकला. कारण एक सिनेमा झाला किरकोळ काम संपल. आत्ता दूसऱ्या सिनेमात काम मिळण्याची शक्यता देखील नव्हती. पून्हा हमाली आणि पून्हा मजूरी हेच दिवस सुरू राहिले. तरिही वेळात वेळ काढून जगदीप दादरच्या रणजीत स्टुडियो बाहेर उभारत असे. 

अखेर एक क्षण आला. दिलीपकुमारची भूमिका असणाऱ्या फुटपाथ सिनेमाचं शूटिंग चालू होतं. या सिनेमात फुटपाथवर राहणारा एक मित्र दुसऱ्या मित्राच्या खांद्यावर डोकं ठेवून रडत असतो अन् तिथे 

 

https://youtu.be/qHoOEDcj6j4?t=3092

मुलाला विचारतो क्या बात मुन्ना जग्गू क्यू रो रहा हैं? मुन्ना सांगतो जग्गूने दोन दिवस जेवण केलेले नाही. तेव्हा दिलीपकूमार जग्गूकडे बोलतो. काहीही न बोलता त्याला आपण दोन दिवस जेवलो नाही हे दाखवायचं होतं. 

या सिनसाठी जगदिपची निवड करण्यात आली. प्रत्यक्ष शुटींगला सुरवात झाली. जग्गूने दोन दिवस उपाशी असल्याचा अभिनय ग्लिसरीनचा वापर न करता साकारला.

या सीनमध्ये जग्गूची एक्टिंग पाहून दिलीपकुमारांनी आपल्या खिश्यातून १०० ची नोट काढली आणि जग्गूला दिली. 

पुढे एकदा एका मुलाखतीत जगदिप यांना या सिनबाबत विचारण्यात आलं होतं तेव्हा त्यांनी सांगितलेलं, खरच तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते आणि मी दोन दिवस जेवलो नव्हतो. त्यामुळे खोटंखोटं रडायची वेळ माझ्यावर आली नाही. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.