जॅग्वार चालवणारा माणूस दरोडा टाकेल अशी कल्पनाही कुणी करत नसे……
रॉबिनहूड म्हणल्यावर आपल्या डोळ्यासमोर एकदम भला माणूस उभा राहतो जो गोरगरिबांना मदत करतो वैगरे, पोलिसांना गुंगारा देतात आणि सापडतच नाही परंतु सर्व ‘रॉबिन हूड’ भाग्यवान नसतात. गाझियाबादच्या कवी नगर पोलिसांनी अलीकडेच खऱ्या आयुष्यातील रॉबिन हूड, मोहम्मद इरफान उर्फ ’जॅग्वार चोर’ याला अटक केली. हा भिडू एका रॉबिन हुडला अटक केलीय. सध्या तो उत्तर प्रदेशच्या डासना तुरुंगात बंद असताना, सध्या सुरू असलेल्या बिहार पंचायत निवडणुकीत इरफान चर्चेत आला आहे. ह्या रॉबिनहूड इरफानचा विषय म्हणजे हा गडी जॅग्वार मधून चोरी करायचा आणि कुणाला संशयही यायचा नाही. त्याच्या नावावर त्याच्या बायकोने निवडणूक सुद्धा जिंकलीय.
भारतातील 12 राज्यांमध्ये किमान 40 दरोडे टाकल्याचा आरोप असलेल्या या सुपरचोराच्या भोवती अनेक गोष्टी फिरतात.
बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील रॉबिन हूड इरफान या गावात त्यांची पत्नी गुलशन परवीन यांनी ‘रॉबिन हूड’ इरफानच्या नावावर मते मागून सीतामढीच्या पुपरी ब्लॉक वॉर्ड क्रमांक 34 मधून जिल्हा पंचायत निवडणूक जिंकली. का? कारण इरफानने आपल्या बक्षीसाचा वापर करून जोगिया गावात आणि जवळपास 1 कोटी रुपये खर्चून सात रस्ते बांधले होते. तिच्या विजयानंतर, परवीनला आता इरफानने स्वतः विधानसभा निवडणूक लढवावी जेव्हा तो बाहेर पडेल तेव्हा अशी तिची इच्छा आहे.
गुलशन परवीन यांचा निवडणूक प्रचार पूर्णपणे त्यांच्या पतीच्या लिजेंड कार्यांवर आधारित होता. प्रचाराच्या प्रत्येक पोस्टरमध्ये इरफान आणि गुलशन एकत्र दिसत होते. तिने वॉर्ड क्रमांक 34 मधील तिची जागा 2,000 मतांनी जिंकली आणि जवळपास 50 टक्के मतांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव केल्याचा दावा केला. गुलशनच्या विजयाचे बहुतेक श्रेय इरफानच्या ‘उदारतेला’ जाते गुलशनला जेवढी मते गावकऱ्यांनी दिली.
आता एवढे कांड केले म्हणल्यावर सुरवात पण तशी जब्रि झाली असणार. गुलशन परवीन आणि तिचे पती मोहम्मद इरफान यांचीही सुरवात प्रेम प्रकरणापासून झाली. गुलशन सांगते की इरफानने तिला पहिल्यांदा त्याच्या मोठ्या मेहुण्याच्या घरी भेटीदरम्यान पाहिले होते. दोघे प्रेमात पडले आणि लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेतला. आम्ही गरीब होतो आणि आमच्या घरच्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न केले, असं ती सांगते.
या जोडप्याला गरिबीचा सामना करायचा होता, परंतु लहान हॉटेल उघडण्यापासून ते कापडाचे दुकान चालवण्यापर्यंत – वेगवेगळे प्रयत्न करूनही काहीही निष्पन्न झाले नाही. त्यांनी मुंबईपासून दिल्लीपर्यंत फेरफटका मारला, पण काही उपयोग झाला नाही. तेव्हाच इरफानने आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी दरोडे घालण्याचा निर्णय घेतला.
“मैं हमेशा मना करती थी ऐसे काम करने से असं गुलशन म्हणते. आता निवडणूक जिंकलेली गुलशन दुसऱ्या बाजूने आपल्या पतीचा बचाव करते. “इरफान कधीही कोणालाही रिकाम्या हाताने जाऊ देत नाही. त्याने आपल्या कुटुंबासाठी काहीही केले नाही, फक्त ज्यांना मदतीची गरज आहे आणि गरीब आहेत अशा लोकांसाठी तो धावून जायचा.
कवी नगर पोलिस स्टेशनच्या प्रेस नोटनुसार इरफानविरुद्ध दाखल करण्यात आलेला पहिला एफआयआर 2013 चा आहे आणि नवीन एफआयआर यावर्षी 4 सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आला होता. इरफानने 2010 मध्ये पहिला दरोडा टाकला आणि लुटमारीचा वापर आपल्या बहिणीच्या लग्नासाठी केला.
गाझियाबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिस्ट्रीशीटरने पंजाब, दिल्ली, कर्नाटक, केरळ, तेलंगणा, गोवा आणि उत्तर प्रदेशसह 12 राज्यांमध्ये दरोडे टाकले आहेत. तपास अधिकारी (IO) देवेंद्र सिंग, ज्यांच्या पथकाने इरफानला पकडले, म्हणतात की रॉबिनहूड असलेल्या इरफानने पश्चिम बंगाल आणि दिल्लीतील तुरुंगातही वेळ घालवला आहे.
इरफानची अटक गाझियाबादच्या एका घरात केलेल्या दीड कोटी रुपयांच्या घरफोडीप्रकरणी झाली. उजळे/ उजले टोळीचा भाग असलेला इरफान हा बहुतांशी गुन्हे स्वत:हून करत असे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी त्याला पकडण्यापूर्वीच टोळीतील अकरा जणांना अटक केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीची घोषणा केल्याच्या काही दिवस आधी ‘जॅग्वार चोर’ने दिल्लीतील एका न्यायाधीशाच्या घरातून 65 लाखांची रोकड चोरल्याचा खुलासा झाला. घर फोडा आणि जग्वारमध्ये निघून जा, ही गोष्ट इरफानच्या बाबतीत पोलिसांनाही माहिती होती. कारण हा जॅग्वार चोरच इरफान होता.
“जॅग्वार चालवणारा माणूस नुकताच दरोडा टाकणारा चोर आहे अशी कल्पना कोण करेल,” असं कवी नगर पोलिस स्टेशनचे अधिकारी म्हणतात.
आता रॉबिनहूड ही पदवी सुद्धा त्याला सहजासहजी लाभली नव्हती तर त्याचे पुरावे सुद्धा लोकं सांगतात.
“त्याने ज्याला गरज असेल त्याला तो नेहमी मदत करायचा,” एका स्थानिक महिलेने याविषयी सांगितलं होतं की “आमच्या गावात एक धोबी होता त्याला इरफान मदत करत असे. त्याची तब्येत बिघडली होती आणि त्याला महागडे ऑपरेशन करण्यासाठी पैशांची गरज होती. इरफानने प्रत्येक गोष्टीसाठी पैसे दिले.
गुलशनचा दावा आहे की इरफानने त्याच्या गावात आणि आजूबाजूच्या वंचित कुटुंबातील किमान 50 महिलांचे विवाह आयोजित करण्यात मदत केली आहे. खरं तर, गावकऱ्यांनीच इरफानला पहिल्यांदा आमदारकीची निवडणूक लढवायला सांगितली होती.
गुलशन आणि इरफान यांना 10 आणि 7 वर्षांच्या दोन मुली आहेत. गुलशन म्हणते की तिला तिच्या कुटुंबासोबत ‘सन्मानित’ जीवन जगायचे आहे, आता तिने निवडणूक जिंकली आहे. इरफानने आपल्या पत्नीला निवडणूक जिंकल्यास गुन्हेगारी जग सोडेन असे सांगितले होते.
हे ही वाच भिडू :
- वारणेच्या खोऱ्यात जन्म घेऊन दरी डोंगरांचे राज्य करणारा तो खराखुरा रॉबिनहूड होता
- ब्रिटिश सत्तेत या क्रांतिकारकांनी छत्रपतींच्या गडावर तिरंगा फडकवण्याचा पराक्रम गाजवला …
- त्या दिवशी कळलं सुपरस्टार राजेश खन्ना देखील शाहीर साबळेंचा मोठा फॅन होता
- लोकशाहीर अमरशेख म्हणजे धग, रग, धुंदी आणि बेहोशी यांची जिवंत बेरीज….!