ब्रुस लीच्या पिक्चर मध्ये मार खाणारा पोरगा त्याचे विक्रम मोडणारा वारसदार बनला..

मार्शल आर्ट ,कुंग फु आणि सिनेमे अशा तीन गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा फक्त एकच नाव डोळ्यासमोर येतं ते म्हणजे जॅकी चॅन.

जॅकी चॅन हा असा अभिनेता आहे कि ज्याने मार्शल आर्ट  आणि कॉमेडी असा संगम घडवून प्रेक्षकांना नवनवीन चित्रपट दिले. जॅकी चॅन चे पिच्चर कितीही वेळा पहा तो तुमचं हमखास मनोरंजन करतो याच प्रमुख कारण म्हणजे त्याची ऍक्शन आणि फायटिंग सीन्स. जगभर या माणसाने आपल्या अभिनयाने आणि ऍक्शनने करोडो चाहते कमावले. त्याचा आजवरचा प्रवास आपण पाहूया.

७ एप्रिल १९५४साली हॉंगकॉंग मध्ये झाला. चॅन काँग संग हे त्याचं मूळ नाव. पुढे पोटापाण्याच्या सोयीसाठी त्याचे आईवडील दुसऱ्या देशात स्थायिक झाले तेव्हा जॅकी चॅन हॉंगकॉंगमधेच राहिला आणि त्याने तिथेच एका बोर्डिंग शाळेत प्रवेश घेतला. या बोर्डिंगच्या दहा वर्षाच्या काळात जॅकी चॅन मार्शल आर्ट ,नाटक आणि गायन या क्षेत्रात तरबेज झाला. मार्शल आर्ट मध्ये त्याने ब्लॅक बेल्ट मिळवला.

बोर्डिंगमध्ये आधीच खूप कडक शिस्त होती, जो शिस्त पाळत नसे त्याला कठोरातली कठोर शिक्षा केली जय, याच शिस्तीच्या जोरावर जॅकी चॅनने स्वतःच्या शरीरावर आणि कामावर मेहनत घेतली. पुढे तीच शिस्त जॅकी चॅनच्या कारकिर्दीत बघायला मिळते.

जेव्हा जॅकी चॅन फक्त आठ वर्षाचा होता तेव्हा त्याने १९६२ साली आलेल्या बिग अँड लिटिल वोंग टिन बार या चित्रपटात काम केलं. पुढे बाल कलाकार म्हणूनही त्याने बरेच चित्रपट केले. पण त्याने केलेले सगळे चित्रपट हे संगीताशी संबंधित होते.

जॅक नावाच्या एका बिल्डरच्या हाताखाली काम करत असताना सगळे त्याला लिटिल जॅक म्हणून हाक मारायचे पुढे तेच नाव त्याच जॅकी चेन झालं.

१९७१साली पदवी मिळवल्यानंतर जॅकी चॅन एक स्टंटमन म्हणून काम करू लागला. १९७२ साली आलेल्या फिस्ट ऑफ फ्यूरी या चित्रपटात त्याने हॉंगकॉंगचा सगळ्यात मोठा सुपरस्टार असलेल्या ब्रूस ली साठी स्टंटमन म्हणून काम केले.

या चित्रपटात जॅकी चॅन एक असा स्टंट करणार होता कि ज्यात अतिशय उंचावरून खाली पडायचं होत , या स्टेण्ट मध्ये खूप मोठा धोका होता पण जॅकी चॅन ने अतिशय योग्य पद्धतीने तो स्टंट केला आणि इंडस्ट्रीमध्ये त्याच्याबद्दल आदर वाढला विशेषतः ब्रुसलीच्या नजरेमध्ये अधिक वाढला. सिनेमात बॅकग्राऊंड मध्ये आपल्याकडून मार खाणारा हा मुलगा टॅलेंटेड आहे याची त्याला खात्री बसली होती.

पुढे फक्त स्टंट करत न राहता त्याने अभिनयातही हात अजमावून पाहिले.

१९७३ साली जेव्हा ब्रूस ली चा मृत्यू झाला तेव्हा जॅकी चॅन हा एकमेव व्यक्ती होता कि जो ब्रुसली चा वारसा समर्थपणे पुढे नेऊ शकतो आणि हॉंगकॉंग सिनेमावर राज्य करू शकतो.

डायरेक्टर लू वि सोबत त्याने बरेच चित्रपट केले पण ते सगळेच फ्लॉप ठरले.पुढे जॅकी चॅनने लू वि सोबत चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला. ब्रुसली हा जॅकी चॅन साठी आदर्श होता, जॅकी चॅनला ब्रुसली सारखं बनायचं होत. जॅकी चॅनने त्याच्या करिअरच्या सुरवातीचे चित्रपट अनेक हे ब्रुसली ला डोक्यात ठेवूनच केले होते. शेवटी त्याने ठरवलं कि आता आपण आपली स्टाईल तयार करू.

हा जॅकी चॅन इतका बिनधास्त होता कि त्याने ठरवलं कि इथून पुढच्या माझ्या चित्रपटाचे सिन मी स्वतः करणार. त्याने कॉमेडी आणि कुंग फु असा सुपरहिट फॉर्मुला तयार करून चित्रपट बनवले आणि ते सगळे हिट झाले. ब्रुसली च्या चित्रपटात कुंग फु आणि विषय हा सिरीयस असायचा , त्यांच्या ऍक्शन सीनमध्ये एक टेन्शन असायचं पण याच्याच उलटचा फॉर्मुला वापरून विनोदी ढंगाने जॅकी चॅन जास्त फेमस झाला.

१९७८ सालचा जॅकी चॅनचा पहिला सुपरहिट सिनेमा आला तो म्हणजे स्नेक इन द इगल्स शॅडो….लोकांनी हा चित्रपट प्रचंड डोक्यावर घेतला. मोठ्या प्रमाणात जॅकी चॅन चा बोलबाला झाला. यावरून जॅकी चॅनने दाखवून दिल कि तो काही सामान्य हिरो नव्हता.

कुंफू कॉमेडी हा पॅटर्न जॅकी चॅनने जगभरात प्रसिद्ध केला. हाच फॉर्मुला वापरून त्याने बरेच चित्रपट बनवले आणि भरपूर हिट झाले. त्याच्या या यशाने तो हॉंगकॉंग मधला सगळ्यात जास्त मानधन घेणारा अभिनेता बनला. आत्मविश्वास वाढलेला जॅकी चॅन मग स्वतःच्या चित्रपटाची बरीचशी जबाबदारी स्वतःच घेऊ लागला, प्रोडक्शन, दिग्दर्शन त्याचबरोबर गाणीही तो स्वतःच म्हणू लागला.

१९८० साली जॅकी चॅनने बिग ब्रॉल या चित्रपटाच्या माध्यमातून हॉलिवूडमध्ये प्रवेश केला खरा पण तिथे त्याची जादू चालली नाही. परत हॉंगकॉंगला येऊन त्याने प्रोजेक्ट ए ,पोलीस स्टोरी,आर्मर ऑफ गॉड अशा सुपरहिट चित्रपटांची रांगच प्रेक्षकांसमोर उभी केली.

खरा खतरो का खिलाडी म्हणजे जॅकी चॅन. माझ्या शरीरातील असं एकही हाड नाही कि ज्याच्यावर सर्जरी झालेली नाही असं विधान तो करतो.

आर्मर ऑफ गॉड या चित्रपटाच्या शूटिंग वेळी चाळीस फुटांवरून पडून त्याच्या डोक्याला जबर जखम झाली होती.

तो पुन्हा हॉलिवूडमध्ये गेला आणि त्याच्या रम्बल ऑफ द ब्रॉन्क्स या चित्रपटाने विक्रमी १० मिलियन डॉलरची कामे चित्रपट रिलीज झाल्याच्या पहिल्याच आठवड्यात कमावले.

स्वतःच्या देशाचा अँटी ड्रग अँबेसिडर असताना त्याचाच मुलगा ड्रग्स घेतो असं कळल्यावर त्याला धक्काच बसला ,यावर त्याने मुलाची बाजू न घेता त्याला शिक्षा भोगायला लावली आणि आपल्या एकूण संपत्तीची अर्धी रक्कम त्याने चॅरिटी ट्रस्टला देऊ केली. मुलगा लायक असेल तर तो स्वतःच पोट भरेल असही तो म्हणाला.

स्वतःच्या चित्रपटाबद्दल त्याने एक महत्वाचं विधान केलं होतं ,

इतकी वर्ष आशियात काम केल्यानंतर आता मला फिल्मसाठी प्रमोशन करायची गरज भासत नाही. जॅकी छानच सिनेमा आहे इतकं जरी कळलं तरी लोकं तुफान गर्दी करतात.

जॅकी चॅनने कुंफू योगा या चित्रपटात सोनू सूद आणि दिशा पाटणी या भारतीय अभिनेत्यांसोबत झळकला होता. लहान मुलांमध्ये त्याची असलेली प्रचंड क्रेझ आणि त्याची ऍक्शन ह्यांचा उत्कृष्ट मेल त्याने बसवला आहे.

MOST STUNT BY A LIVING ACTOR असा गिनीज बुक रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.