पैशाच्या ओघात वाहत न जाता कसोटी क्रिकेटला अँडरसनने पहिलं प्राधान्य दिलं होतं…

क्रिकेट हा सगळा पैशाचा खेळ मानला जातो. अनेक जुन्या जाणत्या क्रिकेट समीक्षकांच्या मते अगोदर क्रिकेट हा जेंटलमॅनचा गेम होता पण तो मॅच फिक्सिंगमुळे पैसेवाल्यांचा खेळ बनत गेला. बऱ्याच खेळाडूंनी थोडक्या पैशापायी मॅच फिक्सिंग केली आणि करियर कायमच बरबाद केलं. पण आजचा किस्सा अशा एका खेळाडूचा आहे ज्याने वनडे, टी-२०, आयपीएल अशा खेळाला लाथ मारून फक्त कसोटी क्रिकेटवर फोकस केला.

जर तुम्ही हार्डकोर क्रिकेट प्रेमी असाल तर तुमच्या टॉप १० बॉलर मध्ये एक नाव हमखास असत ते म्हणजे जेम्स अँडरसन.

कसोटी क्रिकेट म्हणजे बोरिंग गेम कधीच नसतो, त्यात असतो थरार, बॉलर आणि बॅट्समनमध्ये चाललेलं शीतयुद्ध तेही माईंड गेम आणि विविध डावपेचांद्वारे खेळलं जाणारं.

इंग्लंडच्या क्रिकेट इतिहासातला आणि जागतिक दर्जाचा भेदक बॉलर म्हणून जेम्स अँडरसनला ओळखलं जातं. आजच्या क्रिकेटमध्ये अँडरसनच्या बॉलिंग रेकॉर्डच्या आसपाससुद्धा खेळाडू नाहीए. टेस्ट क्रिकेटमध्ये ६०० हुन अधिक विकेट घेण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड जेम्स अँडरसनच्या नावावर आहे. वनडे क्रिकेटमध्येसुद्धा सगळ्यात जास्त विकेट अँडरसनच्या नावावर जमा आहेत. 

एक दोन नाही तर तब्बल २८ वेळेस पाच विकेटचा हॉल अँडरसनने पूर्ण केलेला आहे. बॉलिंग तर बॉलिंग पण बॅटिंगमध्येसुद्धा अँडरसन नवीन विक्रम करून बसलेला आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त वेळा नॉट आउट राहण्याचा विक्रम सुद्धा अँडरसनकडे जातो. ८७ वेळा अँडरसन टेस्ट क्रिकेटमध्ये नॉटआऊट राहिलेला आहे.

लहानपणापासूनच क्रिकेटचं वेड अँडरसनला होतं. शाळेत आणि क्लब क्रिकेटमध्ये त्याची बॉलिंग सगळ्यांनाच हैराण करणारी होती. क्रिकेटमध्ये अँडर्सनची सतत बदलत राहणारी हेअरस्टाईल कायमी चर्चेत असायची. क्रिकेटव्यतिरिक्त  ड्रेसिंग सेन्स कमालीचा असल्याने अँडरसन इंग्लंडमध्ये अनेक जाहिरातीत दिसून येतो. 

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ज्यावेळी जेम्स अँडरसन खेळू लागला तेव्हा त्याची कामगिरी ऍव्हरेज होती. त्याच्याकडे असलेली स्पीड आणि स्विंग सगळीकडे चर्चेचा विषय ठरत असे. इंग्लंडच्या संघात सुद्धा त्याला लवकर स्थान मिळत नव्हतं. तो सतत संघाच्या आतबाहेर होत असायचा. पण आपल्या कामगिरीच्या जोरावर अँडरसनने संघात आपलं स्थान अशा प्रकारे बळकट केलं कि ते अभेद्य झालं.

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये थोद्याथीडक्या नाही तर तब्बल हजार आवकेत घेण्याचा विक्रम जेम्स अँडरसनच्या नावावर आहे. आजवर जुन्या काळातले आणि नवीन खेळाडू यांच्यापैकी कुणालाही हि कामगिरी जमली नाही ती अँडरसनने करून दाखवली. सध्यातरी हा विक्रम लवकर तुटेल असं दिसत कारण हजार विकेट हा मोठा पल्ला मानला जातो. 

एका दौऱ्यावर एकाच इनिंगमध्ये सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांना बाद उकरून अँडरसनने रेकॉर्ड केला होता. महेंद्रसिंग धोनी हि त्याची टेस्ट क्रिकेटमधली महत्वाची विकेट मानली गेली. कारण तेव्हा अँडरसनच्या बॉलिंगवर धोनीला स्ट्रगल करावा लागायचा. सचिन तेंडुलकरसोबत सुद्धा त्याची चांगली जुगलबंदी रंगायची. दोघांमधलं हे युद्ध पाहण्यासाठी लोकांची तुडुंब गर्दी व्हायची.

जसं जस क्रिकेटमध्ये ग्लॅमर येत गेलं तस तस अँडरसन क्रिकेटपासून दूर जात गेला. पैशांमुळे आणि मॅच फिक्सिंग प्रकरणांमुळे अँडरसनने वनडे आणि टी-२०, आयपीएल या क्रिकेट प्रकारात न खेळण्याचा निर्णय घेतला. यात असंही म्हटलं जात कि अँडरसन हा खेळाडू बनलाय ते फक्त टेस्ट क्रिकेट खेळण्यासाठी. अँडरसनच्या बॉलिंगमुळे खरतर लॉर्ड्सवर क्रिकेट बघायला गर्दी होऊ लागली. 

वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे, पाकिस्तान, श्रीलंका अशा देशांचे बॅट्समन अँडरसनला घाबरून खेळायचे. अनेक विक्रम आज अँडरसनच्या नावावर आहेत. सोशल मीडियावर फारसा ऍक्टिव्ह नसलेला अँडरसन क्रिकेटमधला मात्र लेजेंड खेळाडू म्हणून ओळखला जातो. टेस्ट क्रिकेटला खऱ्या अर्थाने जेम्स अँडरसनने सोन्याचे दिवस आणलेले आहेत.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.