जेम्स बॉण्डला चूनां लावणारी माणसं !!!

चूना लावणं हा आपला आवडता उद्योग. आज जगभरात असणाऱ्या चूना लावणाऱ्या भारतीयांची आकडेवारी पाहिली तर ललित मोदी, विजय मल्या, नीरव मोदी अशा लोकांचा बेसुमार भरणा जागतिक पटलावर असलेला दिसून येतो. चुना लावत करोडोंची माया जमवण्याचा हा उद्योग मार्केट घेत असताना भारतीयांनी थेट जेन्स बॉण्डला चूना लावतं पराक्रमाचा अत्युच्च कळस गाठला आहे.

पान बहार कंपनीनं जेम्स बॉण्डला चूना लावण्याचं हे महान काम केलं आहे. भारतीयांच्या तंबाखू खाण्याच्या स्टाईलवर प्रेरित होवून जेम्स बॉण्ड म्हणून ओळख निर्माण केलेला अभिनेता श्री. पियर्स ब्रॉसन याने पान बहार कंपनीची जाहिरात केली. पान बहार आणि जेम्स बॉण्ड हे समीकरण बघूनच अनेक जेम्स बॉण्ड भक्तांनी पान बहारचा आदरपुर्वक स्वीकार केला. पान बहार हा ब्रॅण्ड इंटरनॅशनल लेव्हलला घेवून जाण्याचं श्रेय पियर्स ब्रॉसन यांना देण्यात आलं. जाहिरात हिट ठरली आणि बराचं काळ लोटला. बऱ्याच काळानंतर आपल्या संस्कारी दिल्ली सरकारनं थेट जेन्स बॉण्डला नोटिस पाठवली व जगभरात पुन्हा चर्चेला उधाण आलं.

तेव्हा हा वीतभर चुना नेमकां कसा लावला गेला याचा बोल भिडू टिमने घेतलेला आढावा –

तर झालं अस संस्कार, असंस्कार आणि गर्भसंस्कारांचं भांडार असणाऱ्या या आपल्या देशातलं संस्कारी सरकार ही जाहिरात बघून तब्बल वर्षाभरानं जागं झालं. दिल्लीच्या आरोग्य विभागानं चक्क जेम्स बॉण्डला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्यासाठी बार मळलां.

त्यांनी जेन्स बॉण्डला नोटिस पाठवली,“हे बघ तू असशील मोठ्ठा पण आमच्या गल्लीत शहाणपणा करायचा नाय” “बाईमाणसं टिव्ही बघत्यात, शोभा होईल अस क्काय आमच्या हित्त करायचं नाय”. 

दिल्ली सरकारचा हाग्या दम ऐकताच जेम्स बॉण्डनं त्याला चक्क पुणेरी भाषेत प्रत्युत्तर दिल,“हे पहां मला ही नोटिस पाठवता येतात म्हणलं.

यावर दिल्ली सरकार म्हणलं,“ हं नोटिस पाठवतोय स्वस्तात सोडतोय ते उपकार समज, ही पाच हजाराची दंडाची पावती घे आणि दोन वर्ष आत बस.”

जेम्स बॉण्डनं गरिबासारखं तोंड करत विचारलं, “साहेब तेवढं बघा की काय तरी जुळणा करा”.

कधी नव्हे ती गोऱ्या माणसाकडून मिळणारी इज्जत पाहून दिल्ली सरकारच्या अंगात नैतिकता आली ते जेम्सला म्हणलं, “लाज वाटत नाय का तंबाखूची जाहिरात करायलां ? सांगू का पप्पांना ? जुळणा कर म्हणे.. असंस्कारी कुठचा.

पप्पाचं नाव ऐकताच जेम्स बॉण्डच्या बत्यागुलं झाल्या. तो म्हणाला, “पान मसाल्यात कुठं तंबाखू असते का ?” तसा दिल्लीचा आरोग्य विभाग हादरला. जमिन दूभंगून गेली. महाभारतातला “नमश्कार मैं काल” स्टॉप झाला. शिवसेनेचे राजीनामे उडून गेले. पुण्यात मेट्रो धावू लागली…
काय काय काय ???? तुला पान बहारमध्ये तंबाखू असते माहित नाही… आरं.. आरं.. आरं तू कसला जेम्स बॉण्ड तूझ्यापेक्षा तर आमचा इंन्पेक्टर महेश ज्याधव बरा की…

Leave A Reply

Your email address will not be published.