जम्मू- काश्मीरमधलं टार्गेट किलिंग रोखण्यासाठी नवीन रणनीती आखण्यात आलीय…

जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवादाचा नवा चॅप्टर सुरु झालाय. तो म्हणजे टार्गेट किलिंग. खोऱ्यात दहशतवादी सातत्याने सामान्य लोकांना टार्गेट करत आहेत. टार्गेट किलिंगच्या घटना घडवण्यासाठी दहशतवादी नवनवीन डावपेच आखत आहेत.

या टार्गेट किलिंग अंतर्गत आधी आपल्या टार्गेटची सगळी माहिती काढून, केव्हा आणि कोणत्या वेळी हल्ला करणे योग्य होईल हे ठरवले जाते आणि नंतर हत्या केली जात आहे. याच धर्तीवर जम्मू-काश्मीरमध्येही नॉन- काश्मिरी असलेल्यांची हत्या केली जात आहेत. या महिन्यात वेगवगेळ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये १२ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

खोऱ्यातील या टार्गेट किलिंगचा धसका तिथं राहणाऱ्या हिंदू आणि नॉन-काश्मिरींना मोठ्या प्रमाणात बसलाय. हे पाहता सरकारने नवीन पाकिस्तान पुरस्कृत कट मोडून काढण्यासाठी बहुआयामी रणनीती तयार केली आहे.

इथल्या स्थानिक नागरिकांना तर सुरक्षा कँपात हलवण्यात आलचं आहे. सोबतच या दहशतवाद्यांचं नेटवर्क तोडण्यासाठी सुरक्षा दलाचे जवान दहशतवादी आणि त्यांना मदत पुरविणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलणार आहे.

अत्यंत बारकाईने या देशद्रोह्यांचा शोध घेतला जाईल. एवढंच नाही तर सरकारी विभागातल्या सुद्धा त्यांना मदत पुरवणाऱ्यांचा शोध घेतला जाईल. सुरक्षा यंत्रणांच्या रणनीतीनुसार, संपूर्ण घाटीतील दगडफेक करणारे, ओव्हर ग्राउंड वर्कर आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना अटक केले जाईल. अश्या पद्धतीने टार्गेट किलिंग आणि त्यांना मदत पुरविणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जाईल.

महत्वाचं म्हणजे, अशा लोकांना राज्याबाहेरील कारागृहात पाठवून सीमापार नेटवर्क तोडले जाईल. त्याच वेळी, बंदी घातलेल्या जमात-ए-इस्लामी आणि तेहरिक-ए-हुरियत आणि स्थिर अलिप्ततावादी संघटनांच्या कारवायांवर बारीक नजर ठेवून, त्यांना कोणत्याही प्रकारच्या कार्यात सहभागी होण्यापासून रोखले जाईल.

सुरक्षा यंत्रणांच्या नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत, रणनीतीला अंतिम रूप देताना, टार्गेट किलिंगच्या घटनांवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या अंतर्गत, पोलिसांनी मोठ्या संख्येने छापे टाकताना दक्षिण आणि मध्य काश्मीरमधील एक हजाराहून अधिक लोकांना उचलले आहे. यापैकी अनेकांवर PSA लादण्यात आला आहे. रविवारी एक डझनहून अधिक दगडफेक करणाऱ्यांना राज्याबाहेरील कारागृहात पाठवण्यात आले आहे.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की,

टार्गेट किलिंग थांबवणे आणि लोकांमधील भीतीचे वातावरण कमी करणे याला प्राधान्य दिले जाणार आहे.

टार्गेट किलिंगच्या मागे पुरवल्या जाणाऱ्या निधीचीही तपासणी केली जात आहे. दगडफेकीसाठी ज्या प्रकारे निधी दिला गेला, त्याच प्रकारे टार्गेट किलिंगसाठी पैसे दिले जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुरक्षा यंत्रणांनी निधीची चौकशी सुरू केली असून यामध्ये जमात आणि तेहरिक-ए-हुर्रियतच्या संवर्गातील कारवायांची चौकशी केली जात आहे.

टार्गेट किलिंग थांबवण्यासाठी सुरक्षा रक्षकांकडून मोठ्या रणनीतीवर काम केलं जातंय. त्याचे निकाल लवकरच जाहीर होतील.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.