तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सनच्या त्या डिपार्टमेंटचे प्रमुख स्वामी विवेकानंद असते

सर जमशेटजी टाटा यांनी त्यांनी लिहिलेल्या ‘शोध स्वामी विवेकानंदांचा’ या आपल्या पुस्तकात सर जमशेटजी टाटा यांनी विवेकानंदांना २३ नोव्हेंबर १८९८ रोजी एक पत्र लिहिले होते.

पण याआधी सर जमशेदजी टाटा आणि स्वामी विवेकानंद यांच्या संबंधांची पार्श्वभूमी अशी आहे की, जपान ते शिकागो या प्रवासात जहाजावर जमशेटजींनी विवेकानंदांबरोबर काही काळ घालवला होता.

ही गोष्ट १८९३ ची आहे, जेव्हा विवेकानंद हे जागतिक धर्म परिषदेत भाग घेण्यासाठी अमेरिकेला जात होते आणि त्याच जहाजावर जमशेटजी टाटा देखील होते. जहाज बँकॉकला जात होते. तेथून विवेकानंदांना शिकागोला जाण्यासाठी ट्रेन पकडावी लागली.

त्यावेळी विवेकानंदांचे वय तीस वर्षांचे होते आणि जमशेटजी टाटा ५४ वर्षांचे होते, वयात इतका फरक असूनही स्वामी विवेकानंद आणि जमशेदजी टाटा यांच्यात अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. 

टाटा म्हणाले की, मला स्टील उद्योग भारतात आणायचा आहे. तेव्हा स्वामी विवेकानंदांनी त्यांना सुचवले की तंत्रज्ञानाचे हस्तांतरण केले तर भारत कोणावरही अवलंबून राहणार नाही, तरुणांनाही रोजगार मिळेल. 

त्यांच्यात झालेल्या चर्चेवरून टाटांना प्रेरणा मिळाली. यातून टाटा स्टीलचा पाया घातला गेला आणि जमशेदपूरमध्ये पहिला कारखाना सुरू झाला. टाटा बिझनेस हाऊसशी संबंधित वेबसाईटवर या गोष्टीचा उल्लेख आजही आढळतो. या संपूर्ण बैठकीची माहिती स्वामीजींनी त्यांचे भाऊ महेंद्रनाथ दत्त यांना पत्र लिहून दिली होती.

या प्रवासात विवेकानंदांनी जमशेटजी टाटा यांना आणखी एक महत्त्वाची प्रेरणा दिली. ते म्हणजे, भारताला आर्थिक क्षेत्रातच नव्हे तर शैक्षणिक क्षेत्रातही मजबूत कसे करता येईल यावर लक्ष दिलं पाहिजे.  भारतामध्ये एक उच्च-स्तरीय विद्यापीठ उघडणे जेथून जगभरातील जागतिक दर्जाचे विद्यार्थी बाहेर येऊ शकतील, ज्यामध्ये केवळ विज्ञान संशोधनच नाही तर मानवी मूल्य शिकलवली जातील.

त्यांची हीच इच्छा जमशेदजी टाटा यांनी गांभीर्याने घेतली आणि टाटांनी बंगलोर येथे इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स नावाची एक भव्य संस्था उभारायचे स्वप्न पाहिलं आणि पूर्णही केलं.

बंगलोर येथे इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स या संस्थेला आपला तिसरा पुत्र मानून आपल्या संपत्तीचा तिसरा वाटाही त्यांनी याच संस्थेसाठी देणगी म्हणून ठेवला होता. पुढे त्यांचे स्वप्न साकारही झाले आणि आजही ही भारतातील एक अग्रगण्य वैज्ञानिक संस्था म्हणून ओळखली जाते.

स्वप्न तर साकार झालं पण त्यानंतर टाटांनी विवेकानंद यांना एक पत्र लिहित एक इच्छा व्यक्त केलेली, 

इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स’ या संस्थेत धर्म आणि विज्ञान यांच्या परस्परसंबंधाचा खोलात जाऊन अभ्यास करण्यासाठी एक अध्यासन स्थापन करावे आणि त्याचे प्रमुखत्व विवेकानंदांनी भूषवाचे अशी इच्छा जमशेटजींनी त्यांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली होती.

जपान ते शिकागो या प्रवासात जमशेटजी आणि विवेकानंदांमध्ये झालेल्या चर्चेच्या आधारावर टाटांना वाटलं धर्म व विज्ञान यावर सर्वात कुणी प्रभावीपणे बोलू शकेल तर ते विवेकानंदच होते.

‘यातून धर्म व विज्ञान या दोघांचीही प्रगती होईल’ असेही पत्रात म्हटले होते. 

पण पत्राविषयी नरेंद्र दाभोलकरांनी एका लेखात असं लिहिल्याचं आढळतं कि, स्वामी विवेकानंदांनी टाटांच्या या पत्राला उत्तर दिले नव्हते. 

टाटांनी उभी केलेली संस्था भारतातील पहिली वैज्ञानिक संस्था होती. तिथे जर विज्ञान आणि धर्म किंवा अध्यात्म यांचा एकत्रित अभ्यास सुरू झाला असता तर आज, शे-सव्वाशे वर्षांनंतर ‘भारत जगाला काय देऊ शकेल?’ या प्रश्नाचे अधिक पटण्याजोगे असे उत्तर आपल्याला सापडले असते.  

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.