कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास ८ च असतील हे जगात पहिल्यांदा ठरवलं ते टाटांनी

करोनामुळं लॉकडाऊन लागलं आणि वर्क फ्रॉम होम देणं कंपन्यांना भाग पडलं. कंपनीचं लॉगिन करायचं आणि मग मस्त बाकीची कामं करायला सुरवात. लोकांनी टॉयलेटच्या सीटवर बसून मीटिंग अटेंड केल्या. पण बहुतेक एम्प्लॉयी सुखात काम करतायत हे काही कंपन्यांना बघवत नव्हतं. हळू हळू त्यांनी वर्किंग हावर्सची पद्धत बासनात बांधून ठेवली आणि मॅनेजर रात्री अकरा -बाराला पण कॉल करायला लागला. आमचा गण्या आता गप गुमानं सकाळी १०ला ऑफिसला जातोय. 

आता जरी तुम्ही हक्काने वर्किंग हवर्स मागू शकत असाल तरी कधीकाळी हा हक्क नव्हता. 

औद्योगिक क्रांतीच्या सुरवातीच्या कारखानदार सुरवातीला १५ तेय अगदी १८ तासापर्यंत राबवून घेत होते. पुढे मग कामगारांनी संपाच हत्यार उचलून, सरकारवर दबाव आणून कामाचे तास हळू हळू कमी करून आठ तासांवर आणले. 

प्रत्येकासाठी आठ तास कामाचा दिवस सुचविणारा पहिला रॉबर्ट ओवेन नावाचा एक ब्रिटिश माणूस होता, जो समाजवादाच्या संस्थापकांपैकी एक होता. 

ओवेनला वाटले की कामाच्या दिवसाची तीन  विभागणी केली पाहिजे. कामगारांना झोपायला आणि स्वतःसाठीही समान वेळ मिळावा असं त्याचं म्हणणं होता. मात्र नेहमीप्रमाणे ब्रिटिश कृती करण्यापेक्षा बातच मारण्यात पटाईत.

image

ब्रिटनमधल्या कपड्याच्या मिल त्याकाळी कामगारांचं शोषण करण्यासाठी कुख्यात होत्या. मात्र कारखानदारांच्या लॉबी पुढं सरकारही ह्या शोषणाकडं दुर्लक्षित करत होतं. मात्र सरकारच्या निर्णयाची वाट पाहत न बघता एका भारतीय उद्योगपतिनं कामगारांच्या कल्याणासाठी प्रयत्न करायचं ठरवलं आणि ते नाव होतं जमेशदजी टाटा.

हे सगळं सुरु झाला जमशेटजी नुसेरवानजी टाटा यांनी नागपूरच्या राजाकडून दहा एकर पाणथळ जमीन विकत घेतली आणि १८७७ मध्ये एम्प्रेस मिलची स्थापना केली तेव्हापासून.

जमशेटजींना त्यांच्या कर्मचार्‍यांनी लँकेशायरच्या सूतगिरणीत पाहिलेल्या बिकट परिस्थितीत काम करावं असं वाटत नव्हतं. 

म्हणून त्यांनी  एम्प्रेस मिल्समध्ये योग्य व्हंटीलेशन सुनिश्चित केले आणि हवेत गर्व राहावा म्हणून  एक उपकरनं बसवली. अपघाती आगीमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी स्प्रिंकलरसुद्धा बसवण्यात आले.पण  कामगार कल्याणाच्या नावाखाली नुसता वरवरचा मुलामा करून जमशेदजी थांबले नाहीत. 

जमेशदजींनी कामगारांचे कामाचे तास थेट आठ तासांवर आणले.

असं करणारी ती जगातील बहुदा पहिलीच कंपनी होती. युरोपातल्या कंपन्यांच्या खूप आधीच १९१२ मध्ये त्यांनी हा क्रांतिकारी निर्णय घेतला होता. ब्रिटनमध्ये तेव्हा कायद्यानं १२ तासाचा दिवस होता. अमेरिकेच्या सुप्रासिद्ध ‘फोर्ड मोटर्स’ या कंपनीनं असा निर्णय १९१४ मध्ये घेतला होता.

असाच अजून एक क्रांतिकारी निर्णय जो भारतातील पहिलाच होता तो म्हणजे कामगारांसाठी भविष्य निर्वाह निधीची टाटांनी सुरु केलेली योजना.  त्याचबरोबर मोफत वैद्यकीय मदत आणि कामगारांच्या अपघात नुकसान भरपाई योजना सुरु टाटा भारतातील पहिला उद्योगसमूह होता.

जमशेदजी टाटा यांना भारतीय उद्योगधंद्याचे पितामह म्हणून ओळखलं जात. देशातल्या पहिल्या पोलाद कंपनी पासून ताज या पंचतारांकित हॉटेल पर्यंत कित्येक उद्योगधंद्यांची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. टाटा उद्योगसमूहाच रोपट लावलं जे पुढे जाऊन स्वतंत्र भारताचे आधारस्थंभ बनललं. मात्र याचबरोबर त्यांनी कामगार कल्याणसाठी सुरु केलेलं प्रयत्नही लक्षात घेण्यासारखं आहे. बहुतेक यामुळंच कधीकाळी टाटा कंपनीमध्ये काम करणं सरकारी नोकरीच्या बरोबरीचं मानला जायचं.

हे ही वाच भिडू

WebTitle : Jamshedji tata was the first company to make working hours 8 a day

Leave A Reply

Your email address will not be published.