३०० वर्षांपूर्वी उभारलेलं जंतरमंतर ही भारताची खगोलशास्त्राला दिलेली देणगी आहे

दिल्लीतल्या कॅनॉट प्लेसमध्ये असलेलं ‘जंतर -मंतर’ हा वास्तुकलेचा अनोखा नमुना. जो दिल्लीतल्या प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. जंतर- मंतरची ही वास्तू कशी बांधली असावी, या बद्दल अनेकजण बुचकाळ्यात पडतात. पण तुम्हाला माहितेय, हे जंतर- मंतर बनवण्यामागं कोणाचं डोकं आहे.

सवाई जयसिंह दुसरा

जो भारतातील सर्वात गौरवशाली शासकांपैकी एक मानला जातो. आपल्या दूरदृष्टीने भारताला कलात्मकतेच्या शिखरावर नेण्याचं श्रेय सवाई जयसिंह यांनाचं जात. काशी, दिल्ली, उज्जैन, मथुरा आणि जयपूर ही शहरं बनवण्यात त्यांचाचं हात असल्याचं म्हंटलं जात.

तर जसं हे जंतर मंतर खास आहे, तसाच ते बनवण्यामागचा किस्साही जरा खास आहे.

तर १७१९ साली दिल्लीच्या लाल किल्ल्यात मुघल सम्राट महंमद शाह महाराजा सवाई जयसिंग दुसऱ्या सोबत बसले होते, खगोलशास्त्राशी संबंधित विषयावर मौलवी आणि पंडितांमध्ये जोरदार चर्चा सुरु होती. बादशहाने मौलवी आणि पंडितांना बोलावले आणि विचारले की, ते काही राज्यावर हल्ला करणार आहे आणि ज्योतिषांना विचारले की दिल्लीहून प्रवास केव्हा करावा?

आता बादशहाच्या या प्रश्नावर तोडगा काढण्याऐवजी मौलवी आणि पंडित एकमेकांशी भिडले, कारण त्यावेळी दिल्लीत अशी कोणतीही वेधशाळा नव्हती, ज्याच्यामदतीनं योग्य वेळ सांगता येईल. हे सगळं प्रमाणित वेधशाळेच्या अभावामुळे होते.

सवाई जयसिंग दुसरा हे सगळं पाहत आणि ऐकत होते. दुसऱ्या दिवशी ते जयसिंगपुरात पहाटेच्या वेळी असेचं फिरत होते. बादशाह मोहम्मद शाह सुद्धा त्याच वेळी आपल्या लवाजमासोबत तिथे पोहोचले.  बादशहाला पाहून ती पटकन बोलून गेला की, तो जयसिंगपुरा येथेच एक वेधशाळा स्थापन करेल. राजा खुश झाला.

यांनतर १७२४ मध्ये दिल्लीचं जंतर -मंतर बांधले गेले. यानंतर जयपुरातलं जंतर -मंतर बांधण्यात आलं. पुढे १५ वर्षाच्या आत  उज्जैन, बनारस आणि मथुरा इथलं जंतर -मंतर बांधण्यात आलं. 

यांनतर सवाई जयसिंग दुसरा याने १७२६ मध्ये आपल्या अजमेर संस्थानच्या पर्वतांवर गुलाबी शहराची स्थापना केली. जे आज जयपूरच्या नावाने जगभरात प्रसिद्ध आहे.

जयपूर ही आज राजस्थानची राजधानी आहे पण प्राचीन काळी ती संस्थानांची राजधानीही होती.

आधी हे शहर इतर शहरांसारखं साधचं होत, पण १८७६ ला जेव्हा वेल्सचे राजकुमार आले तेव्हा महाराजांच्या आदेशावरून संपूर्ण शहराला गुलाबी रंगाने सजवायला लावलं. तेव्हापासून हे शहर ‘गुलाबी शहर’ म्हणून प्रसिद्ध झाले

जयपूरच्या जंतर मंतरविषयी बोलायचे झाले तर १७२० ते १७३८ पर्यंत बांधले गेले. वेगवेगळ्या भौमितिक प्रकारांची १९ साधने आहेत. ज्याचा उपयोग वेळ, ग्रहणाचा अंदाज आणि नक्षत्रांची माहिती यासाठी केला जातो. हवा महलजवळ बांधलेल्या या जंतर -मंतरचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्येही समावेश करण्यात आलायं.  जंतर -मंतर अशा प्रकारे बांधण्यात आलेयं की, त्याचा वापर नेहमीच होत राहील.

आजही त्याचा वापर मान्सून, पूर, दुष्काळाच्या संभाव्यतेच्या तीव्रतेसाठी केला जाऊ शकतो.

हे ही वाचं भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.