म्हणून जपानच्या लोकांनी राधाविनोद पाल यांच्या नावाने मंदिरे उभारली आहेत..

आजच्या घडीत फार कमी भारतीयांना राधाविनोद पाल यांचे नाव माहित असेल. पण या माणसाने एकेकाळी जपानच्या लोकांची एवढी मदत केली होती की,

जपानच्या लोकांनी राधाविनोद पाल यांच्या नावाने मंदिरे उभारली आहेत.

टोक्यो ट्रायल या नेटफ्लिक्सच्या वेबसिरीजमध्ये इरफान खान ने त्यांचा रोल केला होता. २००७ साली जेव्हा जपानचे पंतप्रधान शिंझो आबे भारतात आले होते तेव्हा त्यांनी संसदेत बोलताना राधाविनोद पाल यांची आठवण काढली होती.

शिवाय कोलकात्यात राहणाऱ्या राधाविनोद पाल यांच्या मुलाला देखील ते भेटायला गेले होते. १९६६ साली जपानच्या सम्राटाकडून मिळणारा ऑर्डर ऑफ सॅक्रेड ट्रेजर फर्स्ट क्लास हा मनाचा किताब देखील पाल यांना दिला गेला.

टोकियो शहरात त्यांच्या स्मृतीनिमित्त बांधलेल्या यासुकूनी समाधीला जपानच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ लक्षात ठेवले जाते.

इंटरनॅशनल मिलिटरी ट्रिब्युनलच्या अतिपूर्वेकडील देशांसाठी नेमलेले न्यायाधीश होते. दुसऱ्या महायुद्धात जिंकलेल्या दोस्त राष्ट्रांनी जपानच्या बऱ्याच मोठ्या नेत्यांवर आणि सैनिकांवर खोटेनाटे आळ लावून त्यांना धडा शिकण्याचे ठरवलं होतं.

बाकीचे सगळे जज हे अमरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया अशा देशांमधले होते जे एकतर जपानच्या विरुद्ध आणि इंग्रजांच्या समर्थनात होते. त्याच्यामुळं ह्या खटल्यात जपानी सैनिकांना चांगलाच धडा मिळण्याची आणि त्यांना मोठमोठ्या शिक्षा दिल्या जाण्याची शक्यता होती.

जपानच्या बाजूच्या २५ मोठ्या अधिकाऱ्यांना यात दोषी धरण्यात आलं आणि सात जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. १६ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली तर २ जणांना २० वर्षाची कैद करण्याची शिक्षा झाली.

सगळे जज या शिक्षेशी सहमत होते मात्र त्या सगळ्यांना फाट्यावर मारून नडलेला एकमेव माणूस म्हणजे राधाविनोद पाल!

अटक केलेले सगळे आरोपी निर्दोष आहेत, त्यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही त्यामुळं त्यांना जबाबदार धरण्यात येऊ नये अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली.

बरं या माणसांवर लावलेले आरोपही साधेसुधे नव्हते.

तीन प्रकारच्या क्लासमधले A, B आणि C प्रकारचे कायदे त्यांच्याविरुद्ध लावले गेले होते. क्लास A चे कायदे म्हणजे जगाच्या शांतीला मुद्दाम डिवचण्यासाठी युद्धखोरी करणारे देश आहेत, त्यांच्याविरुद्ध लावले जाणारे आणि युद्धाच्या दरम्यान क्रूरपणे वागणाऱ्या सैनिकांविरुद्ध क्लास B व C कायदे लावले जातात ज्याचा अर्थ असतो की संबधित माणसाने माणुसकीला काळिमा फासला आहे.

आता लढणारे सगळे सैनिक आपल्या सम्राटासाठी, एका आशियाई देशाची अस्मिता अबाधित राखण्यासाठी लष्करशहा तोजो ह्यांच्या आदेशानुसार लढले होते. युद्धात नाही नाही ती अस्त्रे वापरून दोस्त राष्ट्रांनीच माणुसकीला काळिमा लावला होता मात्र सगळे जज त्यांच्याच बाजूचे असल्याने ह्या खटल्याचा निकाल काय लागणार आहे हे सगळ्यांनाच माहिती होते.

युद्धाचा इतिहास नेहमी युद्धात जिंकणारी लोकंच लिहितात असं म्हणतात ते काय खोटं नाय.

युद्धात दोस्त राष्ट्रांनी अक्ष राष्ट्रांना बेचिराख करून टाकलं होतं. राधाविनोद पाल ह्यांना जज लोकांच्या कमिटीत एवढ्यासाठी घेतलं होतं कि ब्वा परत कुणी म्हणू नाही कि एकपण आशियाई जज त्या बेंचवर नव्हता.

त्यांच्या राहण्याची व्यवस्थाही इतर जजांच्या बरोबर कारण्याऐवजी टोकियो मधल्या एका स्वस्तातल्या हॉटेलमध्ये करण्यात आली होती. पण नुसता खाली मुंडी पातळ धुंडी करायला

राधाविनोद पाल यांनी नकार दिला आणि इंडियन माणूस नडला की किती शाबूत नडतो हे पाश्चात्त्य लोकांना दाखवून दिलं.

त्यांनी आपल्या सोबतच्या जज मित्रांना फक्त धक्काच दिला नाही तर त्यांचा राग आणि द्वेषही ओढवून घेतला. त्यांनी सांगितलं कि,

ट्रिब्युनलला क्लास A व C चे शांतता आणि मानवताविरोधी कायदे ह्या २५ जणांविरुद्ध लावता येणार नाहीत. त्यांनी सांगितल की इतिहासाचा नीट अभ्यास करा त्यात तुम्हाला सापडेल कि जेव्हा हे नियम लिहिले गेले होते त्याच्या कितीतरी आधी जपान युद्धात उतरला होता.

ह्या नियमन आंतरराष्ट्रीय कायद्यात तेव्हा काहीच जागा नव्हती. त्यामुळं त्यांनी कोणताही माहित असलेला नियम अजिबात तोडलेला नाही. त्यामुळं त्यांना ह्या गुन्ह्यांमध्ये दोषी धरता येणार नाही. ह्या लोकांवर मुळात खटला चालवणं हाच मोठा गुन्हा आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं.

ज्या टोकियो चार्टरच्या नावाखाली आपण ह्या लोकांवर खटला चालवत आहोत ते चार्टरच मुळात आंतरराष्ट्रीय कायद्यात बसत नाही असा तडाखा त्यांनी जजांच्या बेन्चला लगावला. टोकियो चार्टरचं काम फक्त इंटरनॅशनल मिलिटरी ट्रिब्युनलच्या समोर गोष्टी मांडणं एवढंच त्यांनी रोखठोकपणे सांगितलं.

त्यांनी आपल्या परीने पूर्ण ताकद लावून पाहिली पण इंटरनॅशनल मिलिटरी ट्रिब्युनलच्या माणसांनी आपलं करायचं. 

आपल्या १२३५ पानी जजमेंट मध्ये राधाविनोद पाल यांनी सोबतच्या सगळे न्यायाधीशांचीच आणि एकूण ट्रिब्युनलची बिनपाण्याची केली.

“हि सगळे प्रक्रियाच बनावटी आणि दिखाऊगिरी करण्यासाठी केली जात असून मिलिटरी ट्रिब्युनलच्या माणसांनी फक्त हरलेल्या लोकांविरुद्ध सूड उगारण्याचं काम ह्यातून केलंय.”

असं म्हणत त्यांनी आपल्या जजमेंटच्या शेवटाला

“मी दोषी धरलेल्या प्रत्येक माणसाला निर्दोष म्हणून करार देतो आणि त्यांची लावलेल्या खोट्या आरोपांमधून तात्काळ निर्दोष मुक्तता व्हावी असा निर्णय देतो”

असं लिहिलं. 

इंग्रजांचं राज्य असलेल्या आशियाई देशातील एक जज एवढं नडू शकतोय बघून फ्रान्स आणि नेदरलँडच्या जज लोकांना चेव चढला आणि त्यांनीही मूळ खटल्यापेक्षा वेगळ्या डिसेंडिंग नोट्स लिहिल्या आणि खटल्यातल्या एकूण कारभाराविषयी रोष व्यक्त केला.

राधाविनोद पाल यांनी जपानच्या बाजूने विचार करूनही मिलिटरी ट्रिब्युनलच्या माणसांचंही म्हणणं ऐकून घेतलं. त्याकाळात त्यांनी जपानने चीनच्या  भागावर विशेषतः नानकिंग प्रांतात (सध्याचं नानजीयांग, हे शहर तेव्हा चीनची राजधानी ओळखलं जायचं) बऱ्याच अमानूष आणि किळसपूर्ण घटना केल्या होत्या. 

त्या सगळ्या कृत्यांचा राधाविनोद पाल यांनी “राक्षसी” म्हणून उल्लेख केला आहे.

पण “ह्या सगळ्यांनी केलेले गुन्हे हे अमेरिकेने १९४५ साली जपानवर टाकलेल्या अणुबॉम्बपेक्षा जास्त भयावह होते का” असा सवालही त्यांनी केला आहे.

२००५ साली पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी आपल्या जपान दौऱ्यात भारतीयांना जपानविषयी असणाऱ्या प्रेम आणि सद्भावाचे राधाविनोद पाल हे प्रतीक असल्याचे म्हटले होते. भारत आणि जपान नेहमीच एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतात असेही ते म्हणाले होते.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.