जपानच्या युनिट ७३१ मध्ये प्रयोगशाळेऐवजी कत्तलखाना चालवला जात होता…
युद्धात सगळं काही माफ असतं असं उगीच म्हटलं जात नाही. युद्ध जिंकण्यासाठी जे काही करता येईल ते सगळं करण्याची मुभाच असते. आता पर्यंत दोन महायुद्ध झालीत. त्यात काय-काय घडलं याची कल्पना सुद्धा करू शकत नाही एवढ्या विध्वंसक गोष्टी या काळात घडून गेल्या आहेत.
कुठल्या ना कुठल्या कारणामुळे दुसऱ्या महायुद्धाचा उल्लेख केला जात असतोच. सहा वर्षांच्या दुसऱ्या महायुद्धाने संपूर्ण जग शेकडो वर्षे मागे ढकलले असल्याचे म्हटले जाते. त्याच दुसऱ्या महायुद्धात हिरोशिमा आणि नागासाकीचा विध्वंसही जगाने पाहिला. युद्ध जिंकण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जातात. यात मग शस्त्रांऐवजी जैविक गोष्टी वापरण्यात येते.
तर ही गोष्ट्य आहे प्रयोगशाळेच्या नावाखाली चालविण्यात येणाऱ्या एका कत्तलखान्याची.
यात जिवंत माणसावर असे काही प्रयोग केले की ज्यावेळी हे सगळं बाहेर आले तेव्हा सगळे हैराण झाले होते. ही प्रयोगशाळा जरी चीनच्या पिंगफांग शहरात होती. ही प्रयोगशाळा जपानच्या इम्पीरियल आर्मीने तयार केलेली होती. याला काही जण टॉर्चर हाउस सुद्धा म्हणायचे.
जपानच्या आर्मीत एक वैद्यकीय अधिकारी होते. त्यांचे नाव होते जनरल शिरो इशी. लष्करासाठी लागणारी शस्त्रे आणि उपकरणे याबाबत संशोधन करण्याची जबाबदारी इशी यांची होती. शिरो इशी यांना रासायनिक आणि जैववैद्यकीय वस्तूंचा नवीन शोध लावण्यात तसेच संशोधन करण्यात माहीर होते. त्यांना जपानकडून रासायनिक आणि वैद्यकीय शस्त्रे तयार करण्याची परवानगी दिली होती.
१९३१ मध्ये जपानने चीनवर हल्ला केला होता आणि चीनमधील मंचुरिया प्रदेशावर ताबा मिळविला. तर १९३२ मध्ये जपानने चीन वर जैविक हल्ला केला होता. विमानातून प्लेगचा विषाणू चीन मध्ये सोडण्यात आला होता. यामुळे चीन मध्ये अनेक भागात प्लेगची महामारी पसरली होती.
एक जपान सरकारच्या आदेशानुसार जनरल शिरो इशी यांनी मंचुरियन भागातील प्रयोगशाळा ताब्यात घेतली आणि त्यांना हवे तसे बदल करून घेतले. त्याला युनिट ७३१ असे नाव देण्यात आले. काही दिवसांनी ही प्रयोगशाळा सुरु झाली.
तिथे तयार करण्यात आलेल्या रसायनाच्या वापर करण्यासाठी शिरो इशी जिवंत माणसे हवी होती. त्यानी जपान सरकारडे लोकांची मागणी केली तेव्हा चीन, अमेरिका, ब्रिटन देशातील युद्धकैद्यांना जनरल शिरो इशी यांच्याकडे सोपवण्यात आले.
जनरल शिरो इशीने यांनी अनेक माणसांचा छळ करून ठार मारले.
रसायनामुळे ज्यांच्या मृत्यू झाला नाही वाचवण्यासाठी शरिरातील कोणते अवयव मदत करत होते पाहण्यासाठी त्यांची चिरफाड केली जात होती. जनरल शिरो इशीच्या या प्रयोगात पाच लाखांहून अधिक माणसांना ठार मारण्यात आल्याचे सांगितले जाते.
तसेच प्रयोगशाळेत शरीर बधिर करण्यासाठी चाचणीच्या नावाखाली जिवंत माणसांना अत्यंत थंड पाण्यात बुडवले जात होते. ते पाणी इतके थंड असायचे कि त्यात संपूर्ण शरीर गोठायचे. यानंतर हे थंड पाणी आग लावून उकळण्यात यायचे. यानंतर पाण्याचे तापमान वाढल्यानंतर मानवाच्या शरीरावर काय परिणाम होतात हे पाहिलं जातं होत.
तर अनेक महिलांच्या शरीरात रसायन सोडले जात होते. त्यानंतर त्यांना गर्भवती केले जात. बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याच्यावर रसायनाच्या काय परिणाम झाला ते पाहिलं जात होते. हा प्रयोग करताना अनेक गर्भवती महिलांचा मृत्यू सुद्धा झाला.
१९४५ मध्ये अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकी शहरावर अणुबॉम्ब टाकले. तर सोव्हियत लष्कराने मंचुरियन शहरावर हल्ला केला होता. यामुळे जपानी सेनेला माघर घ्यावी लागली. युनिट ७३१ ला बंद करावं लागलं. ही प्रयोगशाळा जाळून टाकण्यात आली. १२ वर्ष ही प्रयोगशाळा सुरु होती. यामुळे अनेक गोष्टी यात नष्ट झाल्या आणि ते रहस्ययच राहिले.
हे ही वाच भिडू
- दीड वर्ष क्राईम पेट्रोल बघून मगच बायकोचा खून केला, पण गडी दीड महिन्यातच घावला…
- शर्टाच्या बटणावरुन १० हजार जणांचा तपास करत महाराष्ट्र पोलिसांनी आरोपी शोधून काढलेला
- सेम टू सेम तात्या विंचूसारखा या सिरीयल किलरचा गेम झालेला…