नगरसेवक, मुख्यमंत्री ते काळजीवाहू राष्ट्रपती अशी लोकशाहीतली सगळी पदं मिळवणारे बी. डी. जत्ती

सध्या नगरसेवकाला सुद्धा रोज पेपर मध्ये, टिव्ही चॅनलवर झळकायचे असते. त्यासाठी हवे ते करायला तयार असतात. आमदार, खासदारांची पण याच लाईन मध्ये आहेत. मात्र, भारतात असे एक राजकीय नेते होऊन गेले ज्यांनी नगरसेवक, मुख्यमंत्री ते काळजीवाहू राष्ट्रपती असे लोकशाहीतील सगळ्या पदरावर काम केले. एवढ्या मोठ्या पदावर काम करूनही ते शेवटपर्यंत साधेपणानेच राहिले. 

ते म्हणजे भारताचे माजी उपराष्ट्रपती बासप्पा दानप्पा जत्ती (बी.डी जत्ती). ज्यांनी, नगरसेवक, मुख्यमंत्री, राज्यपाल, उपराष्ट्रपती आणि काळजीवाहू राष्ट्रपती अशी लोकशाहीतील सगळी पदे सांभाळली.

बी. डी. जत्ती यांचा जन्म १० सप्टेंबर १९१३ मध्ये कर्नाटकातील बिजापूर जिल्ह्यातील सवालागी येथे झाला.

त्यांचे वडिलांचे सवालागी गावात किराणा मालाचे दुकान होते. इतर खेड्याप्रमाणे जत्ती यांच्यागावात कुठल्याच सुविधा नव्हत्या. त्यांच्या जन्म गाव सवालागी हे महाराष्ट्राच्या सीमेलगत आहे. त्यामुळे त्यांच्या भागात कन्नड ऐवजी मुख्य भाषा ही मराठी होती. 

त्यांच्या गावात एक मुलीची आणि दुसरी मुलाची शाळा होती. बहिण मुलींच्या आहेत जात असल्याने जत्ती यांना सुद्धा मुलींच्याच शाळेत जाऊ लागले होते. मात्र दुसऱ्या वर्षीपासून बी. डी. जत्ती मुलांच्या शाळेत जाऊ लागले.  

प्राथमिक शिक्षणानंतर त्यांनी बाँम्बे युनिव्हर्सिटीशी संलग्न असणाऱ्या कोल्हापूरच्या राजाराम कॉलेज मधून लॉचे शिक्षण घेतले. लॉ झाल्यानंतर त्यांनी परत कर्नाटकातील आपले गाव गाठले आणि शेजारील जमाखंडी येथील कोर्टात वकिलीला सुरुवात केली. 

बी. डी. जत्ती हे धार्मिक स्वभावाचे होते. थोड्याच दिवसात बी. डी. जत्ती यांचे जामखंडीत कायद्याचे चांगली जाण असणारे वकील म्हणून नाव घेण्यात येऊ लागले होते. एकीकडे वकिली आणि दुसरीकडे जमेल तशी गरजू लोकांना मदत ते करत.    

जत्ती यांची जमाखंडीतील सामाजिक, राजकीय लोकांमध्ये उठबस वाढली होती. १९४० मध्ये जमाखंडीच्या महानगर पालिकेची निवडणूक झाली त्यात जत्ती उभे राहिले. जमाखंडीच्या लोकांनी मोठ्या फरकाने निवडून दिले आणि इथून बी. डी. जत्ती यांचा राजकीय प्रवासाला सुरुवात झाली.      

१९४२ च्या भारत छोडो आंदोलनात जत्ती यांनी प्रजा समाजवादी पक्षाचे प्रतिनिधित्व केले. १९४७ ला देशाला स्वातंत्र्य मिळाले. १९५२ साली झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुक जत्ती यांनी काँग्रेसच्या तिकिटावर जामखंडी विधानसभेची निवडणूक लढविली आणि ते आमदार झाले. 

जामखंडी सलग तीन वेळा आमदार झाल्यावर त्यांच्या पदरात मंत्री पदाची माळ पडली आणि त्यांना अर्थ मंत्री करण्यात आले.

१९५८ ते १९६२ सलग चार वर्ष बी. डी. जत्ती म्हैसूर राज्याचे मुख्यमंत्री होते. 

म्हैसूर राज्यात मध्ये  १९६२ मध्ये झालेल्या राजकीय उलथापालथीत बी. डि. जत्ती यांचे मुख्यमंत्री पद गेले. त्याजागी आलेल्या एस. के. कांथी फक्त ९९ दिवस मुख्यमंत्री राहिले. १९६८ ला त्यांना पॉण्डेचेरीचे उपराज्यपाल करण्यात आले. पॉण्डेचेरीचा कार्यकाळ संपताच त्यांना १९७३ मध्ये ओडिसाचे राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली. इथून पुढे ते राष्ट्रीय राजकारणात आले.

बी. डी. जत्ती हे पॉण्डेचेरी आणि ओडिसाचे राज्यपाल राहिल्यानंतर १९७४ मध्ये ते देशाचे उपराष्ट्रपती झाले. ते १९७४ ते १९८० असे ६ वर्ष उपराष्ट्रपती होते.  

देशाचे पाचवे राष्ट्रपती फखरुद्दीन अहमद यांचे निधन झाले. त्यामुळे बी. डी. जत्ती यांना काळजीवाहू राष्ट्रपती करण्यात आले. जत्ती हे ११ फेब्रुवारी १९७७ ते  २५ जुलै १९७७ दरम्यान काळजीवाहू राष्ट्रपती होते. 

लोकसभा निवडणुकीत जनता पक्षाने काँग्रेसचा पराभव केल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी ९ राज्यातील विधानसभा बरखास्तीचा निर्णय घेतला होता. बी. डी. जत्ती हे काळजीवाहू राष्ट्रपती असतांना त्यांनी हा निर्णय मान्य केला नव्हता. मात्र पक्षाकडून दबाव आल्यानंतर त्यांना हा निर्णय मान्य करावं लागला होता.   

एवढ्या मोठ्या पदावर काम करणारे बी. डी. जत्ती शेवटपर्यंत ते साधेपणानेच राहिले. त्यांच्या वागण्या बोलण्यात कधी आपण देशाचे उपराष्ट्रपती होऊन गेलो असे त्यांनी जाणवू दिले नव्हते. 

बी. डी. जत्ती यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी ७ जून २००२ मध्ये मृत्यू झाला.

हे ही वाच भिडू

     

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.