जावेद अख्तरनीं आपल्या खासदार फंडातली सगळी रक्कम मुंबईच्या नाल्यांवर खर्च केली होती.

जावेद अख्तर हे नेहमीच चर्चेत असणारं व्यक्तिमत्वं. त्यांच्या कवितांंसाठी तर ते ओळखले जातातचं पण त्यांच्या हजरजबाबी उत्तरांसाठी ही ते प्रख्यात आहेत. मध्यंतरी एका जाहीर मुलाखतीत त्यांनी पत्रकार अंजना कश्यप चि बोलती बंद केली होती.

ते कोणतीही भीडभाड ना बाळगता सर्व तत्कालीन विषयांवर आपली परखड मते मांडत असतात.

अख्तर मुळचे मध्य प्रदेश मधील ग्वाल्हेरचे. त्यांचे वडील निसार अख्तर व आजोबा दोघेही नावाजलेले कवी व गीतकार होते. आजोबांचा तर १८५७ च्या बंडात सहभाग ही होता. आई पण गायिका व लेखक होत्या. तर एकंदरीतच सर्व साहित्यिक पार्श्वभूमी.

जावेद अख्तर मुस्लिम आहेत पण ते नास्तिक आहेत. त्यांचा मानवतेवर विश्वास आहे. जावेद ही भविष्यात तेच करतील या बद्दल शंका नव्हती. जावेद अख्तर यांचं बालपण लखनौमध्ये गेलं प्राथमिक शिक्षण ही तिथेच झालं. त्यानंतर भोपाळच्या सीफिया कॉलेज मधून ते ग्रॅज्युएट झाले. 

पुढे ते मुंबईत आले. हळूहळू स्क्रिप्ट रायटर, पटकथाकार म्हणुन नवा रूपाला आले. पुढे त्यांना एक साथीदार भेटला. तो ही मध्ये प्रदेशचाच नाव सलीम खान. दोघांची चांगली जोडगोळी जमली. दोघांना सलीम- जावेद म्हणुन लोक बोलावू लागले. या जोडीने अनेक सदाबहार सिनेमे लिहले. त्यात मग जंजीर, यादौं की बारात, सीता और गीता, मजबूर, दीवार, क्रांती, मिस्टर इंडिया, अणि शोले सारखे सुपर हिट सिनेमे आहेत.

जावेद अख्तर यशस्वी होते. पुढे काही कारणांमुळे सलीम खान अणि जावेद अख्तर यांनी एकत्र काम करणे बंद केले. त्याचं खरं कारण आजही कोणाला माहित नाही. सलीम खान त्यानंतर जवळपास रिटायरच झाले. अख्तर मात्र त्यांच्या गीतांनी लोकांना भुरळ घालत राहिले. त्यांनी बॉर्डर, लगान, तेजाब, येस बॉस अणि अलीकडेच आलेल्या ‘ जिंदगी ना मिलेगी दुबारा’ सारख्या सिनेमांची सदाबहार गाणी लिहीली. त्यांचा पेन आजही थांबलेला नाही.

त्यांची निवड, राज्यसभेवर ही झाली तर भिडूनों हा किस्सा तेव्हाचा आहे. 

जावेद अख्तर आपल्याला मिळालेल्या यशात महाराष्ट्राचा अणि मुंबईचा आमूलाग्र वाटा आहे असे नेहमीच म्हणतात.

तर मुंबईत एका ठिकाणी एका नाल्याचे काम पैसे नसल्याने अनेक वर्ष थांबले होते. सामान्य लोकांचे त्यामुळे बरीच अडचण होत होती. जावेद अख्तरांना हे कळताच त्यांनी त्यांच्या खासदार फंडातील सर्वच्या सर्व म्हणजे २५ कोटी रक्कम त्या कामासाठी देऊ केली.

पुढे त्या नाल्याचे काम ही पूर्ण झाले. ही गोष्ट कुठूनतरी राज ठाकरे यांना कळली त्यांना आश्चर्य वाटले एखादा बाहेरच्या राज्यातून आलेला माणूस मुंबईसाठी एवढी मोठी रक्कम देतो ह्याचं त्यांना कुतूहल वाटले. त्यांनी लगेच जावेद अख्तर यांना फोन केला. राज म्हणाले,

” जावेद साहेब तुम्ही नाल्याच्या कामासाठी २५ कोटी रुपये कस काय दिले ?तुम्हाला ते आणखी कुठे ही वापरता आले असते ?”

जावेद अख्तर म्हणाले,

“राज, अहो या शहराने या राज्याने मला इतकं दिलंय की त्यासमोर ही रक्कम काहीच नाही. मुंबईने मला पद, प्रतिष्ठा, सन्मान सर्व काही दिले. या शहरात मी काहीच घेऊन आलो नव्हतो आज माझं संपूर्ण जगच इथे आहे.”

राज ठाकरेंना जावेद अख्तरांची ही भूमिका आवडली. पुढे एका कार्यक्रमात राज ठाकरेंनी ही गोष्ट जाहीर रित्या बोलून दाखवली.

अनेकांनी यशाच्या शिखरावर असताना आपली मातृभूमी आठवती पण कर्मभूमीचे पांग एखादाच फेडतो. त्यातलेच एक जावेद अख्तर.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.